Vrishabh Rashi Bhavishya 2020 in Marathi - वृषभ राशि भविष्य 2020 मराठीत
वृषभ राशि भविष्य 2020 (Vrishabh Rashifal 2020) च्या अनुसार वृषभ राशीतील जातकांना या वर्षी आव्हानांच्या मध्ये एक चांगल्या वर्षाचा अनुभव प्राप्त होईल. या वर्षी तुम्हाला पूर्वी केल्या गेलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ प्राप्त होतील आणि जर तुम्ही मेहनत कायम ठेवली तर, नि:संदेह हे एक उत्तम वर्ष सिद्ध होऊ शकते. तुम्हाला जीवनात स्थिरता आवडते आणि या वर्षी जर तुम्ही या दिशेमध्ये प्रयत्न केले तर, तुम्हाला यश मिळेल आणि जीवनात विश्राम येईल.
वृषभ राशि 2020 मध्ये पूर्व अनुमान हे आहे की, या वर्षी तुम्हाला आपल्या मार्गात येणाऱ्या विभिन्न विकल्प शोधावे लागतील आणि योग्य वेळी चांगल्या संधीला कॅच करावे लागेल तेव्हाच तुम्ही एक चांगल्या वर्षाचा आनंद घेऊ शकाल. महत्वाचे हे असेल की, तुम्ही कश्या प्रकारे निर्णय घेतात कारण, तेच निर्णय तुमच्या कौटुंबिक आणि पेशावर जीवनाला मुख्य रूपात प्रभावित करेल.
प्रेम राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृषभ राशीतील जातकांना या वर्षी आपल्या अहंकाराला आणि आपल्या लालसेला नियंत्रणात ठेवावे लागेल कारण, तुमच्या चिंतेचे हेच कारण असू शकते. जर तुम्ही यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले तर, हे वर्ष तुमचे आहे. वृषभ राशीतील लोक प्रेमाच्या बाबतीत खूप रोमँटिक असतात आणि कुणासोबत ही प्रेम केल्यास आत्मीयतेने प्रेम करतात. हे जाणून घ्या की, जर प्रेमाला मिळवायचे आहे तर, तुम्हाला त्यांच्या काही कमींकडे दुर्लक्ष करावे लागेल म्हणून, आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून आणि आपल्या साथीवर प्रेम करा.
वृषभ राशि 2020 च्या अनुसार वृषभ राशीतील जातकांना कुठल्या प्रकारच्या वित्तीय गुंतवणुकीसाठी खूप विचार करून पुढे वाढवले पाहिजे. जर या क्षेत्रातील जाणकार किंवा विशेषज्ञ कडून सल्ला घेऊन काही कार्य केले तर यश प्राप्ती होईल.
तुमच्या सामाजिक जीवनासाठी हे एक चांगले वर्ष सिद्ध होईल आणि याच्या अतिरिक्त तुम्ही आपल्या व्यक्तिगत संबंधांना ही अधिक अनुकूल बनवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, प्रेम आणि नात्यामध्ये आपलेपणा, स्नेह आणि प्रेमाने चालते म्हणून, कुठल्या ही नात्यामध्ये आयडियल मत ठेऊ नका आणि हवेचा झोका पाहून काही कार्य करा. आपले सर्व लक्ष आपल्या आजूबाजूंना चांगले वातावरण ठेवण्यात लावा. इतरांसोबत स्वतःच्या स्वतंत्रतेला ही महत्व नक्कीच द्या. यामुळे तुम्ही चांगल्या जीवनाचा आनंद अनुभव करू शकाल.
आपल्या चार ही बाजू लक्ष ठेवा कारण, काही लोक असे आहेत जे तुम्हाला नुकसान पोहचवण्याच्या विचारातच आहे त्यांच्या पासून सावध राहा आणि कुठले ही नवीन कार्य करण्याच्या आधी त्यांच्या सर्व पैलूंवर विचार करा. जर तुम्ही काही कॉन्ट्रैक्ट साइन करण्यास जातात तर, त्यांच्या प्रत्येक विषयाला वाचून घ्या आणि कुठली ही ग्यारंटी घेऊ नका. तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण, अधून-मधून कुठल्या कारणास्तव तुम्ही कुणाशी वाद किंवा भांडण करू शकतात आणि जर तुम्ही अख्या कार्यात लिप्त राहिले तर, त्याच्या कारणाने तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या वर्षी तुम्हाला काही कठीण निर्णय ही घ्यावे लागतील जे संभवत तुम्हाला दुःख देऊ शकतात परंतु, तुमच्यात ती क्षमता आहे की, तुम्ही आपल्या मनोबलाने प्रत्येक दुःखी वेळेतून बाहेर निघू शकतात आणि स्वतःला सक्षम बनवू शकतात. जर असा निर्णय घ्यावा लागला तर, घाबरू नका कारण, हे तुमच्या भविष्यासाठी खूप चांगले सिद्ध होईल.
एकूणच, वर्ष 2020 वृषभ राशीतील लोकांना मिश्रित परिणाम देईल आणि तुम्ही आपले मनोबल आणि मेहनतीच्या बळावर अनेक उद्दिष्टांना मिळवू शकाल. आपल्या काही कामींना दूर करून तुम्ही एक यशस्वी व्यक्ती म्हणून वरती याल. या वर्षी तुमच्यासाठी ऍडव्हेंचर असेल आणि प्रेम ही असेल, आणि आपल्या लोकांचा साथ ही असेल. तुम्हाला आपल्या क्षमतेचा प्रयोग करावा लागेल आणि या वर्षी उपलब्धी प्राप्त करण्यासाठी तयार राहावे लागेल.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला आपली चंद्र राशी माहिती नसेल तर येथे क्लिक करा - चंद्र राशि कॅलक्युलेटर
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृषभ राशीतील लोक करिअर साठी बरेच महत्वाचे राहणारे आहे कारण, कर्म भावाचा स्वामी शनी जानेवारी महिन्यात अष्टम भावातून निघून नवम भावात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या करिअर मध्ये प्रगती होण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमचे दुसऱ्या स्थानावर स्थानांतरण होऊ शकते परंतु, तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण, हे स्थानांतरण ही तुमच्या हित मध्ये असेल आणि तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात उन्नती प्राप्त होईल. परंतु ज्या लोकांना आत्तापर्यंत कुठल्या ही नोकरीसाठी नियुक्त केलेले नाही त्यांना काही वेळ वाट पाहावी लागेल.
मार्च पासून जून पर्यंतची वेळ काही समस्यांनी भरलेली राहू शकते आणि या वेळी शक्यता आहे की, तुमचे मन आपल्या कामाने थकून जाईल परंतु, जर तुम्ही हिम्मत ठेवली आणि धैर्याने काम करत राहिले तर, तुम्ही जून नंतर खूप चांगले सकारात्मक बदल आपल्या करिअर मध्ये पहायला मिळेल. तथापि, शनी एक मंद ग्रह आहे म्हणून, मुख्य रूपात मार्च पासून सप्टेंबर पर्यंतची वेळ तुमच्या कडून मेहनत करवून घेईल. परंतु, त्यानंतर तुम्ही उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हाल आणि ही उन्नती लांब वेळेपर्यंत सोबत राहील म्हणून, तुम्ही प्रसन्न राहाल आणि आपले प्रयत्न कायम ठेवाल. तुम्ही या वर्षी अनेक असे कार्य कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल जे तुम्ही मागील वर्षांपासून चालू ठेवलेले आहे. तुम्हाला बऱ्याच प्रकारे प्रेरणा मिळेल ज्या कारणाने तुम्ही कार्पोरेट जगात उंच शिड्या चढू शकाल. नवीन परियोजनेला सुरु करण्यात आणि आपल्या कार्य स्थळी नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा एक खूप अनुकूल काळ आहे. वर्षाचा मध्य भाग तुम्हाला आज पर्यंत केलेल्या कार्यासाठी पर्याप्त प्रतिफळ देईल.
जानेवारी, मे आणि जून या महिन्यांच्या वेळी तुम्हाला विदेशी संपर्कांनी लाभ होईल. जर तुम्ही कुठल्या मल्टीनेशनल कंपनी मध्ये काम करतात तर, यावेळी तुमच्यासाठी शक्यता उत्पन्न होईल आणि तुम्ही आपल्या प्रदर्शनाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना प्रसन्न करण्यात सक्षम व्हाल. याच्या परिणाम स्वरूप, तुम्हाला पद उन्नती प्राप्त होऊ शकते म्हणून, तुम्हाला यावेळी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि कुठले ही असे कार्य करू नये ज्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी नाराज होतील आणि तुम्हाला मिळणारी पद उन्नती थांबून जाईल किंवा पुढे ढकलली जाईल.
फेब्रुवारी ते मार्चच्या मध्ये तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, कार्यस्थळावर तुम्ही कुणासोबत ही वाद करू नका आणि कुठल्या ही षड्यंत्राचा हिस्सा बनू नका अन्यथा तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते. तुमचे राजनायिक कौशल्य तुम्हाला आपल्या कामाच्या क्षेत्रात सर्वात कठीण लोकांपासून निपटण्यात मदत करेल. भाग्य तुमचा पूर्णतः साथ देईल आणि तुम्ही आपल्या हिम्मतीच्या बळावर आपल्या स्वप्नांना खरे करण्यात यशस्वी व्हाल. मेहनत करणे कायम ठेवा यामुळे वर्षाच्या शेवट पर्यंत तुम्ही आपल्या शक्तीचा सदुपयोग करू शकाल आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला वर्षाच्या शेवट पर्यंत आनंद मिळेल. या वर्षाच्या शेवटी काही कायद्याच्या गोष्टींमुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो तथापि, तुम्ही सहजरित्या समाधान शोधाल तरी ही तुम्हाला सावधान राहणे आवश्यक असेल. या वेळी तुमच्यावर काही आरोप लागू शकतात किंवा मानहानी होण्याची शक्यता ही आहे.
तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध स्थापित करावे लागतील कारण, त्यांचे पूर्ण लक्ष तुमच्यावर राहू शकते. अश्यात तुमची थोडी ही चूक तुम्हाला समस्येत टाकू शकते. तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, या वर्षी तुम्हाला कठीण मेहनत करून सन्मान आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. काही लपलेले दुश्मन तुमच्या ऑफिस मध्ये समस्या आणि बाधा उत्पन्न करू शकतात म्हणून, तुम्हाला विशेष रूपात कुणावर अधिक निर्भरता ठेवली नाही पाहिजे आणि आपल्या क्षमतेच्या अनुसारच काम केले पाहिजे. सप्टेंबर नंतर वेळ बराच शुभ असेल. वृषभ राशी 2020 (Vrishabh Rashi 2020) च्या अनुसार वृषभ राशीतील लोक आपल्या मेहनतीच्या बळावर आपले वर्चस्व बनवण्यात सक्षम होतील आणि याच्या परिणाम स्वरूप, वर्ष 2020 तुमच्या करिअरमध्ये मागील वर्षापेक्षा अधिक प्रगती आणि उन्नती घेऊन येईल. तुम्ही रागतीच्या नवीन शिखरावर पोहचाल आणि आपल्या जीवनात विशेष करून आपल्या करिअर मध्ये स्वयं दृढ रूपात स्थित मिळवाल. वर्षाच्या शेवटी तुम्ही आपल्या करिअरला घेऊन आश्वस्थ व्हाल आणि तुमची प्रसन्नतेचे कारण हे असेल की, तुम्हाला वाटेल की आत्तापर्यंत जे आपल्या करिअर मध्ये मिळवले आहे त्याचे वास्तवात तुम्ही खरे अधिकारी आहे.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार आर्थिक जीवन
जर वृषभ राशीसाठी वर्ष 2020 च्या आर्थिक पक्षाला पहिले असता हे सांगितले जाते की, यांच्यासाठी वृषभ राशि भविष्य 2020 अनुसार काही आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरवातीमध्ये अचानक लाभाचे योग बनतील परंतु, दुसरीकडे धन हानी ही होण्याची शक्यता आहे म्हणून, धन गुंतवणूक खूप विचारपूर्वक करा. या वर्षी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर, आपल्या सासरच्या पक्षाकडून ही आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते परंतु, त्यांच्याकडून मदत तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला त्यांची अति आवश्यकता वाटेल.
आर्थिक दृष्टिकोनाने वर्षाची सुरवात तसेच सप्टेंबर ते डिसेंबरची वेळ बरीच सांभाळून चालण्याची असेल कारण, यावेळी तुम्हाला आर्थिक रूपात समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि या वेळी जिथे कमाई कमी राहील तर, दुसरीकडे खर्च अप्रत्यशित रूपात वाढतील तथापि, धन खर्च आणि गुंतवणूक दोन्ही खूप विचार-पूर्वक करा. घरात काही शुभ कार्य होऊ शकते परंतु, बुद्धिमान राहून वित्ताचा प्रयोग करा. आपल्या घरात सुधारणा, जीवनशैलीची स्थिती यामध्ये ही वृद्धी इत्यादींवर व्यय होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी चांगली वित्तीय प्रभावाची शक्यता आहे. आपल्या चांगल्या वित्तीय प्रबंधनासाठी सुरक्षित खर्चाला प्राथमिकता देणे शिका.
या वर्षी 2020 मध्ये एप्रिल, जून तसेच सप्टेंबरचा पूर्वार्ध बराच चांगला राहणार आहे कारण, या वेळी तुम्हाला अनेक प्रकारचा आर्थिक लाभ होण्याची स्थिती उत्पन्न होईल आणि जर तुम्ही सांभाळून चालले तर, या वेळी तुम्ही धन संचय करण्यात यश मिळवाल. या पूर्ण वर्षाच्या वेळी तुम्ही पहाल की, तुम्ही आपल्या वित्तीय लक्ष्याच्या तुलनेत आधीपेक्षा जास्त उत्साहित आहे. वर्षाच्या मध्यात अवांछित व्यय येईल जॆ वर्षासाठी बजेट कमी करेल तथापि, गंभीर विचार आणि दृढ प्रयत्नाच्या कारणाने तुम्ही काही महिन्यात ट्रॅकवर परत येऊ शकतात. याच्या अतिरिक्त, फेब्रुवारी तसेच मे महिन्यात विशेष रूपात आर्थिक लाभ देणारा सिद्ध होईल.
जर तुम्ही काही व्यवसाय करतात तर, लक्षात ठेवा की, वर्षाच्या सुरवातीमध्ये अजिबात मोठी गुंतवणूक करू नका. जर काही व्यवसाय प्रारंभ करण्याची इच्छा आहे तर, त्यासाठी ही वर्षाच्या सुरवातीचा त्याग करा कारण, यावेळेत तुम्ही काही असे काम केले तर, तुम्हाला आर्थिक लाभाच्या स्थानावर हानी होण्याची शक्यता अधिक राहील. अचल संपत्ती, घर, वाहन आणि दागिने इत्यादी प्राप्त करण्यासाठी मजबूत संकेत दिसत आहे. तुम्ही कुटुंबात कुणाचा विवाह अथवा शुभ कार्यात व्यय करू शकतात. सप्टेंबरच्या नंतर अचानक लाभाचे संकेत आहे आणि तुम्ही आपले जुने ऋण फेडण्यास सक्षम व्हाल. जे कुणी व्यवसाय अथवा शेअर बाजारात लागलेले आहे त्यांना मनासारखे लाभ प्राप्त होण्याची शक्यता राहील. मार्च नंतर राहूचे संक्रमण होण्याने तुमच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये जबरदस्त परिवर्तन येईल आणि तुम्ही आपल्या उपायांच्या द्वारे आपल्या कमाईमध्ये वाढ करण्याकडे लक्ष द्याल.
धर्म, अध्यत्म, गूढ विषय तसेच सुखी गोष्टींवर तुम्ही अधिक खर्च कराल गुरु बृहस्पतीच्या प्रभावाने ही धनाचे आगमन चांगले होईल परंतु, या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या खर्चावर अंकुश लावणे सर्वात गरजेचे असेल कारण, किती ही कमाई झाली तरी खर्च नियंत्रणात राहिले नाही तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार शिक्षण
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनेक गोष्टी घेऊन येऊ शकतो तथापि, मध्ये अश्या बऱ्याच संधी अश्या ही येतील जेव्हा त्यांचा शिक्षणाच्या प्रति मोह भंग होईल आणि एकाग्रतेच्या कमतरतेतून जावे लागू शकते परंतु, या सर्वांच्या व्यतिरिक्त हे वर्ष शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेमध्ये एक चांगले वर्ष सिद्ध होईल.
मार्च पासून जून शेवट पर्यंतची वेळ आणि त्यानंतर नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंतची वेळ उत्तम राहील. यावेळी न फक्त शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या बाधा दूर होतील तर, तुम्ही परदेशातील युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन ही शिक्षण प्राप्त करू शकाल. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होईल परंतु, कारण बृहस्पती मकर राशीचा असेल म्हणून, त्यांना अनेक आव्हानांचा सामना ही करावा लागेल आणि या आव्हानांना तोंड देऊनच त्यांना यश प्राप्त होईल.
वर्षाची सुरवात, ऑगस्टचा महिना विशेष रूपात ध्यान देण्या-योग्य असेल कारण, यावेळी तुम्हाला विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात विभिन्न प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात विशेष यश प्राप्त होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त, नोव्हेंबर महिना ही त्यांच्यासाठी बराच चांगला सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायची इच्छा ठेवतात तर, तुम्हाला पूर्ण वेळ कठीण मेहनत करावी लागेल. उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मार्गात बांधलेले उत्पन्न गरजेचे असेल परंतु, तुमची मेहनत ही नक्कीच दिसेल.
मध्य एप्रिल पासून मे च्या मध्ये शिक्षणाच्या हेतूने विदेश गमन होण्याची शक्यता दिसत आहे. अतः जर तुम्ही या दिशेत प्रयत्न करत आहे तर, तुम्ही आपला प्रयत्न कायम ठेवा यश नक्कीच मिळेल. या वर्षी तुम्हाला आपल्या प्राद्यापकांसोबत चांगले संबंध बनवून ठेवण्याची आवश्यकता असेल कारण, अशी शक्यता आहे की, ते तुमच्याशी नाराज होतील आणि त्यांचा प्रभाव तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात समस्या देऊ शकतो.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार इंजीनियरिंग, मेडिकल आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी विशेष रूपात यश मिळू शकते तथापि, इनफार्मेशन टेक्नोलॉजी, मैनेजमेंट और बायोटेक्नोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना कठीण मेहनत करूनच यश प्राप्ती होईल.
वृषभ राशि भविष्य 2020 के अनुसार कौटुंबिक जीवन
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल न राहण्याची शक्यता आहे. दुसरा भाव स्थित राहू तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अधिक अनुकूल राहू शकत नाही. याच्या उपस्थितीने कौटुंबिक सदस्यांमध्ये मानसिक चिंता आणि एकमेकांच्या प्रति असहिष्णु दृष्टिकोन राहिल्याने कुटुंबात अशांती राहू शकते. कुटुंबात काही सदस्यांचा व्यवहार ही जास्त चांगला राहणार नाही.
जर तुम्ही धनामागे खूप पळत आहेत तर, कुटुंबात समस्या वाढेल आणि जर तुम्ही कौटुंबिक समस्यांचा सामना कराल तर, धन संबंधित काही समस्या येऊ शकतात परंतु, जर तुम्ही आपल्या व्यापार किंवा कुठल्या अन्य कामासाठी कुटुंबापासून दूर राहतात तर, बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या समस्यांनी मुक्ती मिळू शकते. तुम्ही आपल्या वाणीच्या बलावर लोकांना आपले बनवाल आणि त्यांच्याशी मनातील मळ दूर करून शांती आणि सद्भाव स्थापित करू शकतात.
तथापि, तसेच सप्टेंबर मध्य नंतर जेव्हा राहू वृषभ राशीमध्ये येईल तेव्हा कुटुंबात सामंजस्य स्थापित होईल आणि परस्पर सद्भाव आणि बांधिलकीची भावना विकसित होईल. तुमच्या कुटुंबाची सामाजिक स्थिती मजबूत होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त करेल. या वेळी तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकतात ज्यामुळे तुमच्या मान सन्मानात अत्याधिक वृद्धी होईल.
ऑक्टोम्बर मध्य पासून नोव्हेंबरची वेळ तुमच्या आईच्या स्वास्थ्याच्या प्रति प्रतिकूल राहू शकते या वेळेत त्यांच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घ्या आणि जर शक्य असेल तर, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला वेळोवेळी भाऊ बहिणींचे सहयोग मिळत राहील. मध्य मे पासून घेऊन सप्टेंबरच्या शेवटी वडिलांचे आरोग्य काही प्रमाणात कमजोर राहू शकते तथापि, या वेळी काही मोठी समस्या दिसत नाही.
तुम्हाला विशेष रूपात मे, जून तसेच ऑक्टोम्बर आणि नोव्हेंबर महिन्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जर काही कौटुंबिक वाद चालत आहे तर, ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचे समाधान तुमच्या पक्षात येण्याची शक्यता कायम राहील. परंतु तरी ही कुठला ही वाद वाढू नये याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी आई-वडील तुम्हाला आपल्या आशीर्वादांनी पूर्ण करतील आणि कौटुंबिक जीवन सुचारू रूपात चालत राहील.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृषभ राशीतील लोकांच्या दांपत्य जीवनासाठी ह्या वर्षाची सुरवात अधिक उत्तम राहणार नाही. त्यांना आपल्या जीवनसाथीचा राग आणि अहंकार यापासून बचाव करावा लागेल अन्यथा तुमच्या दांपत्य जीवनात समस्या येऊ शकतात. तुम्हाला खूप धैर्याने काम करावे लागेल आणि प्रत्येक पाऊल विचार-पूर्वक पुढे टाकावे लागेल तेव्हाच तुम्ही एक सुखात दांपत्य जीवनाचा आनंद घेण्यात सक्षम व्हाल.
मार्च महिन्यामध्ये तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल कारण, या वेळेत तुमचे सासरच्या पक्षातील लोकांसोबत वाद होऊ शकतो अथवा तुमच्या जीवनसाथी द्वारे आपल्या माहेरचा पक्ष घेण्याच्या कारणाने तुम्हाला दोघांमध्ये वाद होऊ शकतो. यानंतर डिसेंबर महिन्यानंतर तुमच्या जीवनसाथीचे स्वास्थ्य बिघडण्याने समस्या वाढू शकते.
फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि डिसेंबर महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी श्रेष्ठ राहील आणि या वेळेत तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीचे मध्य आकर्षण, प्रेम, रोमांस आणि समर्पण भाव विकसित होईल. एकमेकांच्या प्रति तुम्हा दोघांची समज विकसित होईल आणि यामुळे तुमचे दांपत्य जीवन मधून बनेल.
जर संतान विषयी बोलायचे झाल्यास त्यांच्यासाठी वर्षाची सुरवात खूप शुभ नसेल. अष्टम भावात बृहस्पतीची उपस्थितीच्या कारणाने तुमच्या मुलांचे स्वास्थ्य प्रभावित राहू शकते आणि त्यांच्या शिक्षणा विषयी समस्या आणि बाधा उत्पन्न होऊ शकतात परंतु, एप्रिल पासून जुलैच्या प्रारंभ पर्यंतचा काळ मुलांसाठी खूप शुभ आहे. या वेळेत असे संकेत दिसतील की, काही नवविवाहित लोकांना संतान प्राप्तीचा आनंद मिळेल. जर तुमची एकापेक्षा जास्त मुले आहेत तर, सप्टेंबर नंतर तुमच्या दुसऱ्या संतानचे स्वास्थ्य बिघडू शकते म्हणून, त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल.
सप्टेंबर नंतर तुमच्या संतानला उच्च शिक्षणासाठी प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळू शकतो ज्या कारणाने तुम्ही संतृष्टीचा अनुभव कराल एकूणच, तुमच्या संतान साठी हे वर्ष ठीक ठाक राहील परंतु, तुम्हाला त्यांच्या व्यवहार आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार प्रेम जीवन
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या प्रेम जीवनासाठी बरेच अनुकूल सिद्ध होईल आणि तुम्ही आपल्या प्रियतम सोबत चांगल्या वेळेचा आनंद घ्याल. तुम्ही आपल्या साथीच्या प्रति समर्पित आणि निष्ठावान राहाल तसेच त्यांच्या द्वारे काही गोष्टी आणि सल्ला याचे खुल्या मनाने ग्रहण कराल.
तुम्हाला फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, अहंकार नात्यामध्ये कधी ही आणू नका कारण, जिथे अहंकार असेल तिथे प्रेम राहू शकत नाही. जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झाले तर, तुमच्या प्रेमात पारदर्शकता येईल जी की, तुमच्या प्रियकर/ प्रियसीला खूप आवडेल. वर्ष 2020 च्या मध्य भागात तुम्ही आपल्या प्रेम जीवनात पुढे जाल आणि तुमच्या जीवनात शांतता, सद्भाव, रोमान्स इत्यादींचा समावेश होईल आणि या वेळी तुमच्या मध्ये कामुकता भाव येईल. या वेळी तुम्हाला एकमेकांच्या प्रति अत्याधिक आकर्षण ही वाटेल परंतु, लक्षात ठेवा, मर्यादित आचरण करणे हे सर्वथा उचित असेल.
वर्षाच्या या वेळी स्वतःला आपल्या परिजनांच्या विशेष रूपात जीवनात आपल्या साथीच्या गरजांना अनुरूप ठेवा. तुम्ही आपल्या प्रेमाकडे ओढले जाल आणि तुम्हाला अद्भुत शांतीचा अनुभव होईल. या वर्षाच्या शेवटी तुम्हाला आपल्या प्रेम जीवन आणि त्यांच्या भविष्याच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही सिंगल आहे तर, तुमच्या जीवनात कुणी येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही एक नवीन नात्याची सुरवात कराल. जर तुम्ही आधीपासून नात्यामध्ये आहेत तर, तुम्ही आपल्या नात्यामध्ये स्थिरतेला महत्व देऊन आपल्या साठी सोबत सर्व नाराजी दूर करून आपल्या प्रेम जीवनाला मधुर बनवू शकाल.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी फेब्रुवारीचा महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहणारा आहे आणि या वेळात तुम्ही रोमँटिक जीवनाचा आनंद घ्याल. तुमचा आपल्या प्रियकर/ प्रियसी च्या प्रति आकर्षण वाढेल आणि तुम्ही एकमेकांच्या भेटीचे आदान-प्रदान ही कराल. सोबतच, कुठे फिरायला जाण्याचा ही प्लॅन करू शकतात. याच्या व्यतिरिक्त, जून, जुलै तसेच सप्टेंबर प्रेम जीवनासाठी खूप चांगले राहू शकतात.
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार स्वास्थ्य/ आरोग्य
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमच्या आरोग्या संबंधित चढ-उतार राहण्याची शक्यता आहे परंतु, तरी ही अधिकांश वेळ तुम्ही चांगल्या स्वास्थ्याचा आनंद घ्याल. तुम्ही भौतिक आणि मानसिक दोन्ही पक्ष्यांची प्रबळ राहाल आणि ऊर्जेसोबत तुम्ही एक उत्तम आणि स्वस्थ जीवनाचा आनंद घेऊ शकाल. तुम्हाला नेहमी भीती वाटण्याची तक्रार राहील म्हणून, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे तुम्ही आपल्या चांगल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकाल.
काम आणि आराम यामध्ये संतुलन स्थापित करा. या वर्षाची सुरवात तुमच्या आरोग्यासाठी खूप शुभ नाही. आठव्या भावात उपस्थितीच्या कारणाने काही मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात ज्यामुळे तुमचे स्वास्थ्य बऱ्यापैकी प्रभावित राहू शकते. जर तुम्ही लांब वेळेपासून आजाराने पीडित आहे तर, खूप सावधान राहण्याची आवश्यकता आहे. मार्च पासून जून च्या मध्यात जेव्हा बृहस्पती राशी परिवर्तन करेल तर, ती वेळ तुमच्या आजारांना संपवण्यास मदत करेल आणि यावेळी तुम्ही चांगले स्वास्थ्य लाभ मिळवाल. मानसिक रूपात तुम्ही संतुलित असाल. या वेळी तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये आणि दैनिक जीवनशैली मध्ये सुधारणा होईल.
तुम्हाला आपल्या मानसिक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण, तुमची मनोदशा काही प्रमाणात खराब राहू शकते. कामामध्ये वेळ काढून तुम्हाला आराम करण्याची आवश्यकता आहे कारण, हा अथवा तुम्हाला शारीरिक रूपात अनेक समस्यांमध्ये टाकू शकतो म्हणून, वेळ पाहताच यापासून बचाव करणे तुमच्यासाठी आवश्यक असेल. तुम्हाला नस आणि मांसपेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता दिसत आहे. तुम्हाला आपल्या भोजन आणि दिनचर्येवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे तसेच हेल्दी डाइट घ्या ज्यामुळे तुमच्या शारीरिक गोष्टींमध्ये बदल येईल.
तुम्ही आपल्या ऊर्जा शक्तीचा प्रयोग खूप सावधानतेने केला पाहिजे कारण, जर हे विभिन्न स्थानांवर लावले तर, यापासून तुम्हाला नुकसान होईल तर, बुद्धीने याचा प्रयोग करा म्हणजे तुम्हाला शारीरिक रूपात चिंता होणार नाही आणि जीवन ऊर्जेचा ऱ्हास ही होणार नाही. वर्षाच्या मध्यात तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्ही खूप थकाल आणि तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला मानसिक रूपात तयार राहावे लागेल म्हणजे, तुम्ही ही वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकाल. हे वर्ष पूर्ण रूपात तुमच्यासाठी आहे फक्त तुम्हाला आपले चांगले प्रदर्शन प्रत्येक क्षेत्रात द्यावे लागेल म्हणजे तुम्ही त्याच्या परिणाम स्वरूप, प्राप्त प्रत्येक सुखाला चांगल्या प्रकारे भोगू शकाल आणि याच कारणाने तुमचे मनोबल वाढेल.
वर्ष 2020 मध्ये केले जाणारे विशेष ज्योतिषीय उपाय
- या वर्षी शुक्रवारच्या दिवशी 11 वर्षाच्या लहान कन्यांना सफेद रंगाची मिठाई, तांदळाची खीर, मिश्री किंवा बत्ताशे खाऊ घाला आणि त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या तसेच, नियमित स्वरूपात गायीला पिठाचा पेढा खाऊ घाला.
- याच्या व्यतिरिक्त तुम्ही अनंत मूळ ही धारण करू शकतात जे तुम्हाला बुधच्या दोषांपासून दूर करण्यास, अल्सर, अपचन आणि रक्त संबंधित विकारांपासून वाचण्यात मदत करेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025