वक्री गुरु चे धनु राशि मध्ये संक्रमण, 30 जून 2020
गुरु महाराज आपल्या नीच राशीतून निघून आपल्या मूळ त्रिकोण राशी धनु मध्ये 30 जून 2020 ला 16:30 वाजता प्रवेश करतील. या वेळी गुरु महाराज वक्री गतीमध्ये राहतील आणि ज्योतिष मध्ये हे मानले जाते की, शुभ ग्रह आपल्या विक्री अवस्थेत अधिक शुभ फळ देतात. धनु राशीमध्ये गुरु महाराज 20 नोव्हेंबर 2020 सकाळी 06:26 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर ते मकर राशीमध्ये जातील. चला जाणून घेऊया कसे राहील गुरु महाराजांचे संक्रमण विभिन्न चंद्र राशींसाठी -
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
या राशीसाठी गुरुचे विक्री संक्रमण खूप शुभ राहील. तुम्ही नकारात्मक विचारांपासून मुक्ती प्रपत्र करून सकारात्मकतेच्या दिशेने पुढे जाल.
जे प्रोफेशनल क्षेत्रात जातक आहेत त्यांना नवीन संधी मिळतील, त्याच बरोबर तुमची व्यवस्थापन क्षमताही वाढेल. ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा कोणताही गतिरोध असेल तर ते समाप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. आपला स्वतःवरील आत्मविश्वास दृढ होईल जो आपल्याला स्वतः निर्णय घेण्यास सक्षम बनवेल. जो मेष राशीच्या लोकांच्या स्वभावाचा हा एक निहित गुण आहे, जो गुरूच्या निम्न स्थितीमुळे प्रभावी होत नव्हता.
वक्री गुरूच्या या स्थितीमुळे तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल जो तुम्हाला स्वतःशी जोडण्यास मदत करेल आणि तुमच्या भूतकाळाच्या ज्या भावना तुम्हाला त्रास देत आहे त्यामधून बाहेर पडण्यास मदत करेल. हे आपल्याला आरोग्याला फायदे देखील देईल आणि आपली विचार प्रक्रिया देखील स्पष्ट होईल जी नवीन दिशेने जाण्यासाठी मदत करेल. प्रवासामध्येही लाभ मिळेल.
विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हे वक्री संक्रमण चांगली बातमी घेऊन येईल, उच्च शिक्षणात येणारे अडथळे संपत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच, जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिक राहिलात तर यश मिळविण्यात वेळ लागणार नाही.
उपाय - गुरुवारी उपवास ठेवणे आणि गुरुवारी कपाळावर आणि नाभीवर केशरचा टिळक लावणे खूप शुभ असेल.
वृषभ राशि
या राशीसाठी, गुरूचे संक्रमण मिश्रित परिणाम आणेल. गुरु आपल्या नवम भावातून परत आपल्या अष्टम भावात संक्रमण करेल.
हे संक्रमण परिवर्तना सोबतच अनिश्चितता देखील दर्शवित आहे. यामुळे आपल्याला थोडी अस्वस्थ आणि चिंता वाटेल, भविष्याबद्दल थोडेसे भीती निर्माण होईल कारण हा गुरु ग्रहाचा मूळभूत गुण आहे, जे गोष्टी थोड्या मोठे करून दाखवतात. म्हणून, होऊ शकतेकि सुरुवातीला जे काही परिवर्तन होईल ते आपले लक्ष विचलित करेल, परंतु आपणास हे समजून घ्यावे लागेल की ही वेळ आपल्यासाठी चांगली आहे कारण यामुळे आत्मनिरीक्षण करण्यात आणि स्वतःला समजण्यात मदत होईल.
या वेळी तुम्हाला हे जाणण्यास मदत मिळेल कि, तुमची काही कमी राहिलेली आहे का? आणि तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. यामुळे तुम्हाला आपल्या प्रोफेशन आणि कौटुंबिक नात्याला समजण्यात मदत मिळेल. प्रोफेशनल ला हा शोध कार्य करण्यात आपल्या अभ्यासात, आपल्या कौशल्याला वाढवण्यात आणले पाहिजे यामुळे त्यांच्यासाठी नवीन रस्ते उघडतील. आकस्मिक लाभ ही प्राप्त होऊ शकतो.
परस्पर नात्यामध्ये थोडा तणाव राहू शकतो परंतु, हे वक्री गुरुचे संक्रमण तुम्हाला हे शिकवण्यास आला आहे कि, जे ही विषय, व्यक्ती तुमच्या आयुष्यात गरजेचे नाही ते स्वतःच तुमच्यापासून दूर होऊन जातील. ही वेळ गूढ विषयांना जाणून घेण्यात तुमची रुची वाढवेल. कुठल्या ही विषयाला त्यांच्या मुळापासून समजण्यासाठी ही चांगली वेळ राहील. जे विद्यार्थी असे करतील त्यांना पुढे जाण्यास मदत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडे तुम्हाला सजग राहण्याची आवश्यकता राहील. पोट किंवा त्या खालील भागा संबंधित समस्या येऊ शकतात.
उपाय - ललिता सहस्त्रनामाचे प्रातः काळी जप करणे अत्याधिक शुभ परिणाम देईल.
मिथुन राशि
हे संक्रमण या संक्रमण मिथुन राशीतील लोकांसाठी बरेच शुभ राहील, वक्री गुरु तुमच्या अष्टम स्थानापासून तुमच्या सप्तम स्थानावर परत संक्रमण करेल जो की, हे दर्शवते की, नात्यामध्ये सामंजस्य बसवण्यात बरीच मदत मिळेल. ज्या व्यक्तींच्या प्रेम संबंधात आव्हाने येत होती त्यांची नाते सुधारण्यास मदत मिळेल. जे जातक विवाहाची वाट पाहत होते त्यांना अनुकूल संधी प्राप्त होईल.
व्यवसाय किंवा प्रोफेशन मध्ये येणाऱ्या समस्यांवर मार्ग मिळणे सुरु होतील, नवीन रस्ते मिळणे सुरु होतील. कार्य क्षेत्रात स्थिरतेकडे जाईल. शौर्य आणि साहस वाढेल यामुळे अनश्चिततेमधून बाहेर येण्यास मदत मिळेल. मिथुन राशीचा स्वाभाविक गुण चांगले विचार आणि सूचनांचे आदान प्रदान करणे आहे म्हणून, या संक्रमणात तुम्ही जितक्या लोकांसोबत भेटाल तितक्याच तुम्हाला उत्तम संधी मिळतील. तितिकच तुम्हाला आपली कमाई वाढवण्याची संधी मिळेल. हे वक्री संक्रमण तुम्हाला बरीच चांगली संधी देईल. आपले कौशल्य दाखवण्यासाठी कुठली ही संधी सोडू नका.
वडिलांसोबत संबंधात मजबुती येईल. प्रोफेशन मध्ये तुमची कुणी मोठ्या व्यक्तीसोबत भेट आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात नवीन दिशा घेऊन येऊ शकतो. आरोग्याच्या संबंधित हे संक्रमण तुम्हाला शुभ राहील तरी ही आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या अन्यथा वजन वाढण्याची शक्यता असू शकते. मिथुन साठी हे वक्री संक्रमण बरेच अनुकूल परिणाम घेऊन येईल म्हणून, आपले प्रयत्न कायम ठेवा.
उपाय - विष्णु सहत्रनाम वाचणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील.
कर्क राशि
हे गुरु चे वक्री संक्रमण कर्क राशीतील लोकांसाठी मिश्रित परिणाम देईल. हे संक्रमण कर्क राशीतील लोकांसाठी व्यवधान उत्पन्न करेल परंतु सोबतच, तुमची साहस वृत्ती तुम्हाला खूप सहायक असेल.
जे जातक जॉब करत आहे, प्रबंधन, टिचिंग किंवा कंसल्टेंसी च्या प्रोफेशन मध्ये आहे त्यांच्यासाठी हे गुरुचे वक्री संक्रमण अनुकूल राहील जे आपल्या कौशल्य संबंधित काही काम करत आहे त्यांना उत्तम यश मिळेल. जे जातक आपला व्यवसाय करत आहे त्यांना आपल्या संसाधनांच्या अनुरूप निर्णय घ्यावे लागतील. कुठल्या ही प्रकारचे कर्ज घेऊ नका अन्यथा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या संक्रमणाचा मुख्य संदेश हा आहे की, तुम्हाला भाग्याची मदत न घेता आपल्या कौशल्यावर भरोसा ठेवला पाहिजे.
कौटुंबिक नात्यामध्ये थोडे सामंजस्य वाढवण्यात मदत मिळेल. कुणी नवीन पाहुण्यांचे आगमन कुटुंबात होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी ही गुरुची वक्री स्थिती अनुकूल राहील खासकरून, त्यांच्यासाठी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही हे संक्रमण थोडे चिंतीत करू शकते. खासकरून चरबी संबंधित समस्या असेल म्हणून, खाण्या-पिण्याची योग्य काळजी घ्या आणि या पेक्षा गरजेची गोष्ट नकारात्मकतेपासून जितके दूर राहाल तितकाच स्वास्थ्य लाभ होईल. व्यायाम योगा आपल्या दिनचर्येत आणणे तुम्हाला खूप चांगल्या परिणामांची प्राप्ती देईल.
उपाय - देवीची पूजा तुम्हाला चांगले फळ प्रदान करेल.
सिंह राशि
हे गुरुचे वक्री संक्रमण सिंह राशीतील जातकांसाठी अनुकूल परिणाम घेऊन येईल. ही वेळ नवीन योजना बनवण्यात आणि त्यांना कार्यान्वित करण्यासाठी खुप शुभ राहील कारण, या वेळी तुमची प्रबंधन क्षमता तुमच्यावर असेल. तुमची बुद्धी क्षमता, निर्णय घेण्यात स्पष्टता राहील. यामुळे लोक तुमच्याकडून महत्वाचा सल्ला घ्यायला येतील आणि तुमचे समाजात वर्चस्व वाढेल. या वेळी तुम्ही सकारात्मकतेने भरलेले आणि गतिशील राहाल म्हणून, या वेळी जे ही तुमचे अपूर्ण कार्य आहे त्यांना पूर्ण करून घ्या. जितके ही व्यवधान येत होते ते सर्व दूर होतील नवीन संधी प्राप्त होईल. जे जातक नोकरी करत आहे आणि परिवर्तन करण्याची इच्छानठेवतात त्यांना चांगल्या ठिकाणी संधी प्राप्त होऊ शकते.
प्रेम जीवनासाठी हे वक्रीचे संक्रमण खूप शुभ राहील मग तुम्ही नवीन संबंधात जायची इच्छा ठरवता किंवा जुन्या नात्यामध्ये सुधारणा करण्याची इच्छा ठेवतात स्थिती तुमच्या अनुकूल राहील. संतान संबंधित विषयात येणारी चिंता दूर होईल. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी ही शुभ वार्ता घेऊन येईल. उच्च शिक्षणात येणाऱ्या समस्या दूर होतील. जे विद्यार्थी शोध कार्य करत आहे त्यांना चांगले यश मिळण्यात यश प्राप्ती होईल. अध्यात्म किंवा गूढ विषय जसे ज्योतिष मध्ये तुमची बरीच रुची असेल काही नवीन शिकण्याची जिज्ञासा कायम राहील.
आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ खूप चांगली राहील. वक्री गुरुची लग्न वर दृष्टी एक रक्षा कवचाचे काम करेल, फक्त थोडी काळजी घ्याची आहे ती आपल्या खाण्यापिण्याची घ्या आणि व्यायाम करा कारण वजन वाढण्याची शक्यता अधिक आहे परंतु, या वेळात तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल तो आहे अहंकार कारण तुम्हाला असे वाटेल की, तुम्हाला सर्व माहिती आहे आणि तीच चूक तुम्ही करू शकतात.
उपाय - सूर्याला अर्घ्य देणे आणि सूर्याष्टकम पाठ करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
कन्या राशि
कन्या राशीसाठी हे वक्री गुरु संक्रमण तुम्हाला चांगले परिणाम घेऊन येईल. हे संक्रमण तुम्हाला तुमच्या पंचम भावातून तुमच्या चतुर्थ भावात होईल जिथे पंचम भावात हे शनी महाराजांसोबत विराजमान होते.
गुरु आपला वक्री स्थितीमध्ये तुमच्यासाठी आराम घेऊन येईल, हे असे दर्शवते की, आता तुम्ही आपल्या प्रयत्न मग ते सरळ आयुष्य असो किंवा तुमचे कार्यक्षेत्र तुम्ही त्याच जागी कराल जिथून तुम्हाला मनाची शांती मिळेल. जिथे तुम्हाला सुखद आणि सहज वाटेल. हे संक्रमण तुमच्या सुख सुविधेत वृद्धी करेल. नवीन वाहन, घर प्राप्ती शक्य आहे. जुन्या जमीनीच्या कामाचे काम जे लांबलेले होते ते पूर्ण होतील.
गुरुचे हे वक्री संक्रमण अध्यात्म, ध्यान, योग द्वारे स्वतःने जोडण्यासाठी खूप चांगले आहे, यामुळे ज्या भावनात्मक समस्यांमधून तुम्ही जात आहे त्यांच्यापासून तुम्हाला सुटका मिळवण्यात मदत मिळेल. आईला स्वास्थ्य लाभ मिळेल त्यांच्या संबंधित मजबुती येईल. जीवनसाथी सोबत संबंधात गोडवा येईल. त्यांचे काम-काज किंवा प्रोफेशन मध्ये ही समस्या येत होत्या त्या दूर होतील.
नवीन संबंधात जे लोक जोडण्याची इच्छा ठेवतात ते भावनिक होऊ शकतात आणि तुम्हाला हे समजावे लागेल की, प्रेमात कुठली ही सुरक्षितता नसते. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे परंतु, बऱ्याच वेळा तुम्ही आळशी आणि आराम करणारे होऊ शकतात यामुळे तुमची समस्या वाढू शकते. ही काळजी घेण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही गुरुचे वक्री होणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील ज्या काही लहान मोठ्या समस्या चालत आहे त्यापासून तुम्हाला सुटका मिळण्यात मदत होईल.
उपाय - प्रत्येक बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करणे आणि पन्ना रत्न धारण करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
तुळ राशि
तुळ राशीच्या लोकांसाठी गुरुचे वक्री होऊन या राशीचे परिवर्तन चतुर्थ भावातून तृतीय भावात होईल. जे सामर्थ्य, धैर्य, इच्छा आणि रुचि असलेले स्थान मानले जाते, जे दर्शविते की आपण ठरविलेल्या मर्यादांपेक्षा वर जाण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे आपल्याला नवीन संधीची प्राप्ती होईल. आपण नवीन कल्पना आणि प्रयोगांपासून मागे हटणार नाही, ज्यामुळे लाभाची शक्यता वाढेल. आपले कम्युनिकेशन स्किल्स देखील वाढेल जेणेकरून आपण आपल्या भावना प्रत्येकास अधिक चांगल्या प्रकारे सादर करण्यास सक्षम असाल ज्यामुळे आपल्या व्यवसाय आणि संबंध दोघांनाही चांगले परिणाम मिळतील.
आपल्या कौशल्यांना निखारण्याची ही वेळ आहे, कारण ही वेळ आपल्याला आपल्या कौशल्यांना अनुरुप करण्याची संधी देईल. ही वेळ आपल्यासाठी स्वतःला शोधण्याची, आपणास आवडत असलेल्या गोष्टी करण्याचीही वेळ आहे कारण आपल्या आवडीनिवडी गोष्टी तुम्ही जितके जास्त कराल तितके जास्त तुम्हाला स्वत:ला मोकळे वाटेल, जेणेकरून तुमची निर्णय घेण्याची शक्ती चांगली होईल. तुमच्या प्रयत्नांनाही योग्य ती दिशा मिळेल.
भाऊ-बहीण व भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य देखील आपल्या प्रगतीत योगदान देईल. भाग्यचा पूर्ण साथ मिळताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी, विशेषत: जे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ असेल. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे, परंतु तुम्ही इतरांना संतुष्ट करण्यासाठी बराच वेळ घालवाल, जर तुम्ही या प्रक्रियेमधून वाचून राहिलात तर तुम्हाला गुरुच्या वक्री संक्रमणाने तुम्ही अधिकाधिक लाभ घेण्यास यशस्वी व्हाल.
उपाय - शिक्षकांकडून किंवा ज्यांना आपण आपला गुरू मानता त्यांच्याकडून आशीर्वाद मिळविणे फार चांगले राहील. तुळशीवर दररोज पाणी अर्पण करणे देखील आपल्यासाठी शुभ ठरेल.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हे वक्री होऊन धनु राशीमध्ये संक्रमण खूप शुभ राहील. गुरु महाराज तुमच्या तिसर्या स्थानाहून, जे प्रयत्नाचे स्थान आहे ,त्यातून दुसर्या भावात विचरण करेल, जे संचित संपत्ती आणि कुटुंबाचे स्थान आहे. हे दर्शवित आहे की ही वेळ आराम देणार आहे, अथक प्रयत्नानंतरही आपल्याला काही काळ योग्य दिशा मिळत नव्हती, ती दिशा आता सापडणे सुरू होईल. उत्पन्न देखील वाढविणे शक्य आहे असे दिसत आहे, व्यवसाय, नोकर्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्याला कदाचित नवीन जबाबदारी किंवा नवीन पद दिले जाऊ शकते.
ज्या जातकांना दीर्घकाळापासून त्यांच्या व्यवसायात जायचे होते त्यांच्यासाठी हे गुरू चे वक्रीत जाणे आहे आणि जे आधीपासून आपला व्यवसाय करीत आहेत त्यांच्या संसाधनांचा योग्य वापर करण्यास सक्षम असतील, ज्याचा अधिक लाभ होईल अशी अपेक्षा आहे. यावेळी आपले सर्व लक्ष धन संचयाकडे असले पाहिजे.
आपण कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे कौटुंबिक संबंधात सुसंवाद देखील आणेल. कुटुंबामध्ये वाढीचेही चांगली संकेत आहे. जे जातक बर्याच काळपासून परिणय सूत्रमध्येबांधू इच्छित आहे त्यांच्यासाठी शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी शुभ संकेत असतील, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळेल, अडथळे दूर होताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गुरुचे भ्रमण चांगले असेल.
उपाय - चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आणि पुखराज रत्न परिधान करणे आपल्यासाठी खूप शुभ असेल.
धनु राशि
गुरुचे हे वक्री संक्रमण तुमच्या दुसर्या भावातून जिथे गुरु नीच भावात विराजमान होता तेथून आता तुमच्या प्रथम भावात असेल जे तुमच्या चांगल्या फळांकडे इशारा करत आहे. सर्वात पहिले जे परिवर्तन होईल ते तुमच्या स्वभावात होईल. काही काळापासून आपण थकल्यासारखे, सुस्तपणा जाणवत होता, ते आता निघून जाईल आणि तुम्हाला स्वतःला ऊर्जावान वाटेल.
आपण सकारात्मकतेसह पुढे जाल जे आपल्या आरोग्यमध्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये देखील दिसून येईल. धर्म, अध्यात्म यांतही रस वाढेल, तुम्हाला समाजात योगदान देण्याची भावनाही निर्माण होईल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशीलही रहाल. आपणास भाग्याचा बराच साथ मिळेल, म्हणून तुमच्यासमोर ज्या संधी उपलब्ध आहेत त्या घेण्यास विसरू नका.
गुरु तुमच्या राशीसाठी चतुर्थ भावाचा स्वामी आहेत, म्हणून तुमच्या जमीन-मालमत्तेशी संबंधित बाबी चालू होते, ते गतिशील होतील आणि नवीन घर वगैरे यांचे मार्ग उघडतील. जे जातक परिणय सूत्रच्या बंधनात अडकण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी, गुरुची राशी परिवर्तनाने एक चांगली बातमी घेऊन येईल, तर आधीच विवाहित किंवा नातेसंबंधात आहे त्यांना थोडीशी समस्या उद्भवू शकते, काळजी घ्या कारण कधीकधी आपण आपल्या साथीदाराचे मित्र कमी सल्लेदार होण्यासाठी अधिक प्रयत्न कराल.
हे परिवर्तन संतति बाबतीत चांगली बातमी घेऊन येईल. विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या दिशेने जाताना देखील दिसत आहे, कुटूंबाचा देखील चांगला पाठिंबा मिळेल. हे संक्रमण प्रत्येक दृष्टिकोनातून चांगले असेल असे म्हणणे देखील चुकीचे नाही.
उपाय - गुरुवारी उपवास करुन केळीच्या झाडाची पूजा करावी.
मकर राशि
गुरुचे हे वक्री संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभता घेऊन येईल, तुमच्या लग्न भाव गुरु राशी परिवर्तन करून तुमच्या द्वादश भावात आपल्या राशीमध्ये विराजमान होईल. हे संक्रमण खासकरून, त्या जातकांसाठी खूप शुभ राहील ज्याचा इम्पोर्ट-एक्स्पोर्ट चा व्यवसाय आहे आणि जे लोक परदेशातील कंपनीमध्ये काम करतात. हे संक्रमण परदेशात जाणार्यांसाठीही चांगली बातमी घेऊन येईल. आपला स्वतःवरचा विश्वास वाढण्यास सुरवात होईल आणि इतरांवर अवलंबून राहणे कमी होईल जे आपल्याला योग्य निर्णय घेण्यात मदत करेल.
तुम्ही जितका प्रवास कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल, परंतु आधीच प्रवासासाठी चांगल्या बजेटची योजना आखणे योग्य राहील. अध्यात्मिक, धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल, तुम्ही त्यामध्ये खूप सहभाग घ्याल. परंतु आरोग्याच्या बाबतीत, हा काळ थोडा कमज़ोर असू शकतो, काही अवांछित परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते, म्हणून खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक असेल. योग, प्राणायाम, आणि क्रीडा प्रकारात भाग घेणे आपल्यासाठी चांगले राहील.
नात्यात नवीनता देखील येईल, वाईट संबंध किंवा असा संबंध ज्यामध्ये आपल्याला भावनात्मक अडचणी येत होत्या, त्यातून बाहेर येण्यास मदत होईल. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास इतर सर्व दृष्टीकोनातून हे संक्रमण आपल्यासाठी शुभ असेल.
उपाय - मकर राशीच्या जातकांसाठी शनि मंत्राचा जप करणे खूप शुभ राहील.
कुंभ राशि
वक्री गुरुचे हे परिवर्तन कुंभ राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खोलेल. तसेच खर्च नियंत्रणात ठेवण्यात यश येईल. आपल्या ज्यापण योजना होत्या, त्या अंमलात आणण्यास सुरूवात होईल. हे संक्रमण दर्शविते की आपण जितक्या लोकांना भेटाल तेवढे आपल्याला अधिक लाभ होईल, एखादा जुना मित्र आपल्यासाठी नवीन संभाव्यता आणू शकतो.
सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. आपण आता जरा अधिक महत्वाकांक्षी व्हाल आणि ध्येयाकडे जास्तीत जास्त जाणीवपूर्वक प्रयत्न कराल जेणेकरून बरेच फायदे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हे परिवर्तन व्यापारी वर्गासाठी व्यवसाय पुढे नेण्याच्या संधी देखील प्रदान करेल.
मोठ्या भावंडांसोबतचे वाद संपतील, वक्री गुरुचीही परिस्थिती मुलांबद्दल देखील अतिशय शुभ असेल, कुटुंब वाढवणे शक्य आहे. आपण या राशीचे पालक असल्यास, आपल्या मुलाच्या उन्नतीमुळे आपल्याला खूप आनंद मिळेल. प्रेम संबंध ताजेतवाने होतील, नवीन उर्जेने भरले जातील जेणेकरून आपला जोडीदारही तुमच्याबरोबर आनंदी होईल.
या वेळी आपली अंतर् दृष्टी खूप चांगली असेल, जी आपल्याला नवीन दिशा मिळविण्यात मदत करेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये कुटुंबाचे पूर्ण सहकार्य देखील मिळेल जेणेकरुन ते प्रगतीच्या मार्गावर जाताना दिसतील. जे शिक्षण संपल्यानंतर नोकरी शोधत आहेत त्यांनाही चांगल्या संधी मिळतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही वेळ चांगला असेल, फक्त थोडेसे खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, तेलकट पदार्थ न खाणे चांगले राहील.
उपाय - पितांबरी रत्न माध्यमा बोटात धारण करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
मीन राशि
मीन राशीसाठी, वक्री गुरुचे हे परिवर्तन लाभ भावातून जिथे गुरु नीचमध्ये होते आणि शनी सोबत विराजमान होते तिथुन दशम भावात आपल्या मुळ त्रिकोण राशी मध्ये असेल जो नोकरीतील प्रगती आणि बदल दर्शवित आहे . हा बदल आपणास अधिक कार्य उन्मुख बनवेल, आता आपले लक्ष टारगेटपासून दूर जाऊन किंवा स्तुतीपासून दूर होऊन फक्त कामाला सुचारू ,रूपाने नवीनताने आणि सर्जनशीलने कशी करावी यावर आपले लक्ष असेल आणि यामुळे यश मिळू शकेल तसेच उच्च अधिकाऱ्यांना सन्मान आणि प्रोत्साहनही मिळेल.
वडिलांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच त्याच्या नात्यात गोडपणा देखील येईल, त्याच्याकडून आपणास बरेच प्रोत्साहन व समर्थन देखील मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुमची बोलण्याची शक्ती देखील वाढेल, म्हणून बरेच लोक तुमच्याकडून सल्ला घेतील. सरकारी क्षेत्राकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. घर किंवा गाडीत वाढ किंवा नवीन कामाची योजना आखली जाईल.
शत्रु पक्षवर विजय मिळेल, कोर्ट-कचेरी प्रलंबित असलेले खटले वेगवान होतील. प्रेमाच्या बाबतीत, हा संक्रमण थोडासा मिश्रित परिणाम देईल, यासाठी आपल्याला आपला व्यवसाय आणि कुटुंब समायोजित करावे लागेल. तुमचा आत्मविश्वास यावेळी वाढेल, म्हणून निर्णय घेताना वेळ घालवू नका, कारण मीन लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे निर्णय घेणे.
आपण आपल्या नैतिकतेमुळे कधी कधी तुम्ही स्वत: आत्मग्लानिला बळी पडू शकता, ज्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या निर्णयावरील विश्वास देखील गमावतात, हे परिणाम या गुरूच्या वक्र स्थितीमळे होऊ शकतात. म्हणूनच, या प्रक्रियेपासून आपण जितके स्वत: ला वाचवाल तेवढेच आपल्यासाठी चांगले राहील.
उपाय - भगवान विष्णुच्या मत्स्य अवताराची कथा वाचन करणे खूप शुभ असेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025