सूर्याचे सिंह राशीमध्ये संक्रमण (16 ऑगस्ट, 2020)
वैदिक ज्योतिष मध्ये सूर्याला आत्माचे कारक ग्रह मानले जाते आणि नवग्रहांमध्ये याला राजाचा दर्जा प्राप्त आहे. कुंडलीमध्ये जर सूर्य मजबूत अवस्थेत आहे तर, ह्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची क्षमता देतो आणि उर्जावान बनवतो आणि प्रबंधनाने जोडलेल्या कार्यात दक्षता प्रदान करते. याच सूर्य ग्रहाचे संक्रमण 16 ऑगस्ट 2020 ला आपली स्वराशी सिंह मध्ये होत आहे.
जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा
सूर्याच्या सिंह राशींमधील संक्रमणाच्या दिवसाला सिंह संक्रांतिच्या नावाने ही जाणले जाते. सूर्य संक्रांतिच्या दिवसाला शुभ मानले जाते म्हणून, या दिवशी श्रद्धाळू पवित्र नदीमध्ये स्नान करतात आणि दान-पुण्य करतात. सूर्य ग्रहाचे सिंह राशीमध्ये संक्रमण 16 ऑगस्ट ला 18:56 वाजता होईल आणि या राशीमध्ये हे 16 सप्टेंबर 2020, 18:52 मिनिट पर्यंत राहील. सूर्याच्या संक्रमणाच्या काळात सर्व राशीतील जातकांना वेगवेगळे फळ मिळतील. चला तर मग जाणून घेऊया की, सूर्य ग्रहाचे सूर्य राशींमधील संक्रमण तुमच्यासाठी कसे फळ घेऊन येईल.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या आपली चंद्र राशि
Read Here In English: Sun Transit in Leo
मेष
ग्रहांचा राजा सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीमध्ये पंचम भावात होईल. हा भाव संतान, प्रेम, शिक्षण, पद, प्रतिष्ठा इत्यादींचे असते. सूर्याचे ह्या भावात संक्रमणाच्या वेळी तुमच्या प्रेम जीवनात समस्या येऊ शकतात. तुमचा प्रेमी तुमच्यकडून खूप अपेक्षा ठेवेल आणि त्यांची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही यामुळे तुमच्यात वाद होऊ शकतो. अश्या वेळात तुम्हाला आपल्या प्रिय सोबत मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि खोटे वचन देणे टाळले पाहिजे. लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले असेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी सूर्याची पंचम भावात स्थिती लाभदायक आहे जर कुठल्या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला होता तर, तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असेल. दांपत्य जीवन सामान्य राहील परंतु, संतान पक्षाकडून काही समस्या येऊ शकतात. या राशीतील जे लोक नोकरी पेशा आहे त्यांना कार्य क्षेत्रात सांभाळून राहावे लागेल आणि प्रत्येक काम सतर्क राहून करावे लागेल अथवा तुम्ही प्रश्नांच्या विळख्यात येऊ शकतात. ऑफिस मध्ये होणाऱ्या राजकारणापासून दूर राहा. व्यावसायिकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. जर तुम्ही आपला व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यासाठी वेळ अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत या राशीतील लोकांना या काळात चांगले फळ मिळतील.
उपाय- नियमित सूर्योदयाच्या वेळी सूर्य देवाला जल अर्पण करा.
वृषभ
सूर्य ग्रहाचे संक्रमण तुमच्या चतुर्थ भावात होईल. हा भाव तुमचे सुख, माता, वाहन, भूमी, आवास इत्यादींचे असते. सूर्य देव तुमच्या चतुर्थ भावात होईल तुमच्या आईला कष्ट देऊ शकतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची या काळात तुम्ही विशेष काळजी घ्या. जर अत्याधिक मानसिक परिश्रम करतात तर, पर्याप्त झोप नक्की घ्या यामुळे तुमचे बरेच रोग दूर होऊ शकतात. आपल्या माता सोबत वेळ घालवा आणि त्यांच्या मनातील विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा. या राशीतील काही जातकांना सूर्याच्या या संक्रमणाच्या वेळी सरकारी भवन किंवा वाहन मिळू शकते. या संक्रमण काळात तुमचा संतृष्टी भाव राहील आणि तुम्ही ते काम कराल जे तुम्हाला आवडतात. तुम्ही लोकांसोबत कमीत कमी भेट कराल. तुमच्या वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता ही वेळ तुमच्यासाठी चांगली राहील. सूर्याच्या या संक्रमणामुळे तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्य क्षेत्रात चांगले फळ मिळतील आणि त्यांची पद उन्नती ही होईल यामुळे त्यांच्या जीवनात आनंद ही वाढेल. या राशीतील विद्यार्थ्यांना पूर्ण मेहनती सोबत या काळात पुढे गेले पाहिजे, अधिक मैत्रीच्या चक्कर मध्ये या काळात पडू नका तेच तुमच्यासाठी चांगले असेल.
उपाय- सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी पिता किंवा पितातुल्य लोकांचा आशीर्वाद घ्या.
मिथुन
बुधाच्या स्वामित्वाची मिथुन राशीतील जातकांच्या तृतीय भावात सूर्याचे संक्रमण होईल. या भावाने लहान भाऊ बहीण, संबंधित लेखन इत्यादींचा विचार केला जातो. या राशीतील जातकांना या काळात सरकार लाभ होईल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर, यशस्वी होण्याची प्रबळ शक्यता आहे. कौटुंबिक जीवन ही चांगले राहील परंतु, तुम्हाला आपल्या रागावर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे अथवा लोक तुमच्या कडून नाराज होऊ शकतात. सामाजिक स्तरावर या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही लोकांची मदत करण्यासाठी पुढे याल. जर तुम्ही राजकारणात आहे तर, आपल्या वाणीला प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या भाऊ बहिणींच्या आरोग्याची तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल कारण, ते आजारी होण्याची शक्यता आहे. या राशीतील जे जातक मीडिया किंवा लक्षण क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना चांगले फळ प्राप्त होऊ शकतात. जर तुम्ही फिल्म जगताने जोडलेले आहे आणि लक्षण काम करतात तर, तुमच्या द्वारे लिहिलेल्या गोष्टींचे या काळात कौतुक केले होऊ शकते.
उपाय- गरजू लोकांना त्यांच्या अवशकतेचे सामान दान करा.
कर्क
कर्क राशीतील जातकांसाठी द्वितीय भावात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. हा भाव आपली वाणी , मालमत्ता, कुटुंब, अन्न, कल्पनाशक्ती इत्यादी दर्शवतो . कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्यचे हे संक्रमण फलदायी असेल. या संक्रमण दरम्यान आपल्याला कौटुंबिक जीवनात चांगले फळ मिळेल आणि घरातील लोकांसह अधिकाधिक वेळ घालवाल. यावेळी कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे आपले प्राधान्य असेल. आर्थिक बाजू बघितली तर या काळात त्यातही चांगले बदल होतील. घरातील सदस्याच्या नोकरीमुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते किंवा आर्थिक भार कमी होऊ शकतो. या राशीतील लोक बचत करण्यास सक्षम असतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ त्यासाठी अनुकूल आहे. यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू शकते, कदाचित आपण विवाह करू शकता किंवा तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येऊ शकतो. या संक्रमण दरम्यान आपल्याला चांगले भोजन करण्याची अनेक संधी देखील मिळतील. तथापि, सूर्य हा एक उग्र ग्रह मानला जातो, म्हणून आपल्यामध्ये अहमची वृद्धी दिसून येईल. जर आपण जमिनीशी जोडलेले राहून पुढे जाल तर हे संक्रमण आपल्यासाठी पूर्णपणे शुभ ठरू शकते.
उपाय- गाईला गव्हाच्या पिठाची पोळी खाऊ घाला.
सिंह
सूर्य देवाचे संक्रमण आपल्या स्वत:च्या राशीमध्ये असेल म्हणजेच आपल्या लग्न भावात असेल. या भावामध्ये आपल्या व्यक्तित्त्व, आरोग्य, चारित्र्य, बुद्धिमत्ता आणि चांगले भविष्य याबद्दल विचार केला जातो. सूर्य संक्रमणाच्या परिणामी, तुमची नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल, जर तुम्ही उच्च पदावर असाल तर तुम्ही तुमच्या कामाच्या पध्दतीने अधीनस्थांवर प्रभाव टाकू शकता. व्यवस्थापन क्षमता देखील सुधारेल. या राशीतील काही लोकांना कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. या संक्रमण दरम्यान आपण स्वत: उत्साही व्हाल आणि आपले ज्ञान वाढविण्यासाठी नवीन कार्य शिकण्याचा प्रयत्न कराल. आपली क्रियाशीलता आपल्याला आत्मविश्वास देईल. आपल्या सामाजिक स्तरावर आपल्या वर्तनामुळे लोक प्रभावित होतील. जर कोणतेही काम अडकले असेल तर आपण या दरम्यान ते पूर्ण करू शकता. जरी सूर्याच्या या संक्रमणामुळे या राशीच्या काही लोकांमध्ये राग येऊ शकतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही रागावू शकता. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांवर जोरजबरदस्तीने आपले शब्द लादण्याचा प्रयत्न देखील करू शकता, असे करणे आपल्यासाठी चांगले नाही, यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्याला आपला राग नियंत्रित करावा लागेल. जर आपण मानसिक शांतीसाठी ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यासाठी अधिक चांगले होईल.
उपाय- रविवारी सूर्य बीज मंत्राचा जप करावा.
कन्या
कन्या राशीच्या जातकांच्या द्वादश भावात सूर्याचे संक्रमण होईल. या भावात विदेश, खर्च, दान इत्यादींचा विचार केला जातो. हे संक्रमण आपल्यासाठी आव्हाने आणू शकतो, यावेळी आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर आपण घराबाहेर असाल तर, तळलेले पदार्थ आणि जंक फूड आजारपणास कारणीभूत ठरू शकतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करून अधिकाधिक पाणी प्यावे. आपल्याला डोळ्यांच्या संबंधित त्रास होऊ शकतो, धुळीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. आपल्याला आपल्या आर्थिक बाजूबद्दल देखील खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अनावश्यक खर्च आपल्या समस्येस कारणीभूत ठरू शकतात. चांगली बजेट योजना बनवा आणि जमा केलेले पैसे खर्च न करण्याचा प्रयत्न करा. वाहन चालवताना रहदारीच्या नियमांचे अनुसरण करा, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. आळशीपणा सोडून आपण या वेळी सक्रिय असणे आवश्यक आहे. जे परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात किंवा परदेशात व्यवसाय करतात अशा लोकांसाठी हे संक्रमण फलदायी सिद्ध होईल. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना उच्च शिक्षण मिळविण्यासाठी परदेशात जायचे आहे, त्यांचे स्वप्नसुद्धा सूर्याच्या या संक्रमणकाळात पूर्ण होऊ शकते.
उपाय- प्रात:कालच्या वेळी सूर्याकडे नग्न डोळ्यांनी पहा.
तुळ
शुक्राच्या स्वामित्व वाली तुळ राशीच्या जातकांच्या लाभ भाव म्हणजेच एकादश भावमध्ये सूर्याचे संक्रमण होईल . या भाव मध्ये मोठा भाऊ-बहीण , इच्छा विचारात घेतल्या जातात. या संक्रमण दरम्यान आपल्याला आपल्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आपण एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रमात असाल तर एखाद्या मित्राकडून महत्त्वपूर्ण सल्ला मिळू शकतो. त्याचबरोबर नोकरी पेशा संबंधित लोकांनाही कार्यक्षेत्रातील सहकर्मिचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुमची प्रतिमा तुमच्या उच्च अधिकाऱ्यांसमोर चांगली असेल तर तुम्हाला या कालावधीत त्याचा लाभ मिळू शकेल. त्याच वेळी, नोकरी शोधत असलेल्या लोकांना देखील नोकरी मिळू शकते. सूर्य हा वडिलांचा कारक ग्रह मानला जातो, म्हणून या संक्रमणादरम्यान आपल्याला आपल्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा देखील मिळेल. कौटुंबिक आणि विवाहित जीवनाचा विचार केल्यास वेळ अनुकूल आहे, परंतु आपल्या स्वभावात रागाची अधिकता असू शकते आणि यामुळे संबंध खराब होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, या काळात आपल्याला आपल्या स्वभावात लवचिकता आणण्याची आवश्यकता असेल. जर आपण रागावर मात केली तर हे संक्रमण आपल्याला बरेच शुभ परिणाम देईल.
उपाय- सर्या ग्रह बळकट करण्यासाठी एक मुखी रुद्राक्ष धारण करा.
वृश्चिक
आपल्या दहाव्या घरात सूर्य संक्रमण करेल. या भावामध्ये व्यवसाय, कार्यक्षेत्र, सत्ता, आदर इत्यादींचा विचार केला जातो. हे संक्रमण आपल्यासाठी आनंददायी असेल. आपण आपल्या कार्याशी निष्ठावान रहाल जेणेकरून उच्च अधिकारीसुद्धा आपल्याशी आनंदी असतील. या काळात आपल्याला कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते, तर काही लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलले तर, या काळात आपल्या वडिलांशी आपले संबंध सुधारतील. कोणताही आवश्यक सल्ला आपल्या वडिलांकडून तुम्हाला दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, सूर्याच्या संक्रमण दरम्यान या राशीचे व्यापारी देखील सक्रिय असतील आणि त्यांच्या व्यवसायात सकारात्मक बदल घडवून आणतील. आपल्याला धन लाभ देखील अपेक्षित आहे. जे बर्याच काळापासून स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करीत होते, त्यांची स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना या सामाजिक पातळीवरही मान-सम्मान मिळेल. विद्यार्थ्यांची एकाग्रता मजबूत होईल, जेणेकरून त्यांना कठीण विषय सहजपणे समजतील. या संक्रमणकालीन काळात आपली दूरदृष्टी देखील आश्चर्यकारक असेल. आपण भविष्याबद्दल अचूक दृष्टीकोन ठेवाल जेणेकरून आपण उद्या येत्या काळात सुखद आयुष्य जगू शकाल.
उपाय- सूर्य देवाला संतुष्ट करण्यासाठी घर किंवा ऑफिसमध्ये सूर्य यंत्र स्थापित करा.
धनु
सूर्य धनु राशीच्या नवव्या घरात संक्रमण करेल. या भावामध्ये भाग्य, धर्म, लांब प्रवास इत्यादीचा विचार केला जातो. सूर्याचे सिंह राशीमधील संक्रमण दरम्यान भाग्य आपले समर्थन करेल. यावेळी आपण कोणतीही कामे सुरू कराल, त्यात यशस्वी होण्याची पूर्ण आशा आहे. चांगल्या संस्थेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या राशीच्या विद्यार्थ्यांनाही या काळात यश मिळू शकते. धनु राशीच्या लोकांमध्ये ज्ञान संपादन करण्याचा नैसर्गिक गुण दिसून येतो, म्हणून आपण सूर्याच्या या संक्रमणादरम्यान मनोरंजक पुस्तके वाचू शकता. तथापि, आपण अध्यात्म आणि धर्म यांच्यापासून थोडे विमुख होऊ शकता. त्याच वेळी, जीवनास योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्याला आवश्यक सल्ला मिळू शकेल, आपल्या जीवनात चांगले मार्गदर्शक येतील. कोणतेही काम करण्यापूर्वी आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि अनुभवी लोकांचा सल्ला देखील घ्यावा. आपण विचार न करता कोणतेही कार्य केल्यास आपण अस्वस्थ होऊ शकता. या संक्रमण दरम्यान आपण घराच्या वडीलधाऱ्यांची सेवा करावी आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी, योग आणि ध्यान यांचा अवलंब करणे आपल्यासाठी चांगले असेल.
उपाय- केसरी रंगाचे कपडे परिधान करा.
मकर
सूर्य ग्रहाचे संक्रमण आपल्या आठव्या घरात असेल. या भावला आयुर्भाव असेही म्हणतात आणि या भावमध्ये त्रास, चिंता, अडथळे, शत्रू इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातात. सूर्याचे हे संक्रमण आपल्यासाठी खूप चांगले असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, कारण या संक्रमणाचा परिणाम आपल्या आयुष्यात आव्हानांना कारणीभूत ठरू शकतो. आपण इच्छित नसले तरीही आपणास आपले कार्यक्षेत्र किंवा निवासस्थान बदलावे लागू शकते, यामुळे आयुष्यात हालचाल निर्माण होईल. जर आपण त्यानुसार बदल घडवून आणला तर आपल्याला अडचणी येणार नाहीत परंतु आपण परिस्थितीशी जुळवून नाही घेतले तर अडचणी येऊ शकतात. या राशीचे लोक जे विवाहित आहे त्यांना या काळात त्यांच्या सासर पक्षकडून फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, आपल्या जीवनसाथीस त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती देखील मिळू शकेल. यात्रेमध्ये तुमचे सामान चोरले जाण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा. या संक्रमण काळात या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, आपल्याला डोळे आणि पोट संबंधित समस्या होऊ शकतात. आपण व्यायाम किंवा योगास आपल्या जीवनात स्थान दिल्यास आरोग्यामध्ये सकारात्मक बदल येतील. या संक्रमण दरम्यान मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळा.
उपाय- सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी माणिक्य रत्न धारण करा.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या सातव्या घरात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. हा भाव आपल्या जोडीदाराबद्दल आणि जीवनातील भागीदारीबद्दल दर्शवते. या काळात कुटुंबातील आपली परिस्थिती अधिकच बिघडू शकते. इतरांना हुकूम देण्याची आपली वृत्ती आपल्याला लोकांपासून दूर करू शकते. यासह, विवाहित जीवनात आपल्या जोडीदाराबरोबर तुम्हाला काही समस्या येऊ शकतात, कदाचित तुमच्या दोघांमध्ये एकाच गोष्टीबद्दल वेगळी मते असतील ज्यामुळे मतभेद होऊ शकतात. यावेळी प्रवास करणे आपल्यासाठी खूप सुखद ठरणार नाही, म्हणून प्रवास करू नका आणि आवश्यक असल्यास या वेळी आपल्या आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या. या संक्रमण दरम्यान आपल्याला सामाजिक स्तरावर चांगले फळ मिळेल. जर आपण राजकारणात असाल तर लोक तुमच्या शब्दावर प्रभावित होतील आणि तुमच्या बाजूने येतील. त्याच वेळी, या राशीतील जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात किंवा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर त्यांना या कालावधीत यश मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण प्रतिकूल आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. योग्य दिनचर्या बनवा आणि अधिक द्रव पदार्थाचे सेवन करा, हे बर्याच रोगांना प्रतिबंधित करते.
उपाय- सूर्योदय होण्यापूर्वी उठावे आणि सूर्य बीज मंत्राचा जप करावा.
मीन
आपल्या राशीच्या षष्ठम भावात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. हा भाव अरि भाव म्हणून देखील ओळखला जातो आणि याद्वारे आपले शत्रू, रोग, मातृ पक्ष इत्यादीचा विचार केला जातो. मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहील. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल, यामुळे समाजात तुमच्या पालकांचा आदर वाढेल. जर आपण कोर्टाच्या एखाद्या खटल्याची चिंता करीत असाल तर त्यात यशस्वी झाल्यामुळे या दरम्यान आपल्याला मानसिक शांती मिळू शकते. जर नोकरी पेशासंबंधित या राशीतील लोक जर नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळू शकेल. त्याचबरोबर बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. सातव्या घरात सूर्याची स्थिती या वेळी मीन राशीच्या लोकांना उत्तेजन देईल आणि आपण सर्व कामे उत्साहाने कराल. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला प्रत्येक क्षणाचा वापर करायचा असेल. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा.अधिक भोजन खाण्यापासून वाचा तुम्हाला पाचक तंत्रासंबंधित समस्या होऊ शकतात. जर आपण असे कार्य करत असाल ज्यासाठी बराच वेळ बसून रहाणे आवश्यक असते तर आपण व्यायाम करणे आवश्यक आहे,यामुळे आपल्याला कंबर आणि मागील भागासंबंधित समस्या उद्भवणार नाहीत.
उपाय- रविवारी गहू दान करा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025