सूर्याचे कन्या राशीमध्ये संक्रमण - 16 सप्टेंबर 2020
वर्ष 2020 मध्ये सूर्य देव 16 सप्टेंबर 2020 ला 19:07 मिनिटांवर सिंह पासून कन्या राशीमध्ये संक्रमण करेल 17 ऑक्टोबर 07:05 वाजेपर्यंत सूर्य देव याच राशीमध्ये राहतील आणि त्यानंतर तुळ राशीमध्ये संक्रमण करतील. चला तर मग, विस्ताराने जाणून घेऊया सूर्याचे कन्या राशीमध्ये संक्रमण सर्व राशींवर कसा प्रभाव असेल.
जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा
ज्योतिष मध्ये सूर्य ग्रहाला राजाचा दर्जा प्राप्त आहे. याच्या संक्रमणाचे ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाचे मानले गेले आहे. सूर्य एका राशीमध्ये जवळपास एक महिना स्थित राहतो आणि त्यानंतर पुढील राशीमध्ये संक्रमण करते. सूर्याच्या संक्रमणाला सूर्य संक्रांतीच्या नावाने ही जाणले जाते, याच प्रकारे पूर्ण वर्षात 12 संक्रांति असतात. सप्टेंबरच्या महिन्यात सूर्य देव सिंह राशीतून निघून कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. या दिवसाला कन्या संक्रांतीच्या नावाने ही जाणले जाते.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष
मेष राशीच्या षष्ठम भावात सूर्य देवाचे संक्रमण होईल . या भावला रिपु भाव म्हणूनही ओळखले जाते आणि या भावमधून आपले रोग, ऋण आणि शत्रू यांचा विचार केला जातो . तुमच्या षष्ठम भावात सूर्य विराजमान असणे तुमच्यासाठी शुभ चिन्हे घेऊन येईल. या काळात मेष राशीच्या लोकांचा त्यांच्या शत्रूंवर विजय होईल.
जर आपण कामाच्या संबंधात प्रवास करीत असाल तर या संक्रमण दरम्यान आपल्याला त्या कामात यश मिळेल. या राशीचे लोक जे स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत किंवा परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत त्यांना या काळात शुभ परिणाम मिळतील. दुसरीकडे, जे लोक नोकरीपेशा संबंधित आहेत त्यांना देखील या संक्रमण काळात लाभ होईल.
या राशीच्या व्यापाऱ्यांविषयी बोलले तर, त्यांनी त्यांचा व्यवसाय यावेळी पसरविण्याबद्दल विचार करू नये, जर तुम्ही वर्तमान स्थितीलाच सुधारण्याचा प्रयत्न केला तर हा संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. आपल्या प्रेम जीवनाबद्दल बोलले तर, आपल्या नात्याबद्दलचा आपला दृष्टीकोन उदासीन होऊ शकतो ज्यामुळे जोडीदारासोबत आपले मतभेद होऊ शकतात. या संक्रमण दरम्यान, मेष राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तथापि, या संक्रमण काळात आपले आरोग्य चांगले राहील.
उपाय- दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या पाचव्या घरात सूर्य ग्रह संक्रमण करेल. पाचवा भाव आपल्या शिक्षण आणि आपल्या जीवनाचा असतो, म्हणून या कालावधीत आपल्याला या क्षेत्राशी संबंधित फळे मिळतील. तथापि, या काळात ज्यांचे शिक्षण काही कारणास्तव मधेच सुटल्या गेले होते, ते पुन्हा एकदा शिक्षण मिळविण्यासाठी पुढे जाऊ शकतात. यासह, प्रारंभिक शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी देखील ही वेळ अनुकूल असण्याची शक्यता आहे.
तथापि, या राशीच्या लोकांना जे प्रेम संबंध आहेत त्यांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे शक्य आहे की आपण आपल्या जोडीदाराचे शब्द समजण्यास असमर्थ असू शकता आणि ते आपल्याला समजू शकत नाहीत. त्याचबरोबर विवाहित लोकांनाही या कालावधीत अत्यंत विचारपूर्वक पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्यास मुले असल्यास, त्यांच्या वागणुकीमध्ये चिडचिडेपणा येऊ शकतो आणि ते काहीतरी वस्तू मिळविण्याचा आग्रह धरू शकतात, जर आपण त्यांची हट्टी पूर्ण करू शकत नसाल तर त्यांना प्रेमाने पटवून देण्याचा प्रयत्न करा.
सूर्याच्या या संक्रमणामुळे आपल्या वागण्यात अधिक अहम देखील येऊ शकते, म्हणूनच आपल्याला सल्ला देण्यात आला आहे की वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अहम अधिक होऊ देऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
उपाय- दररोज सूर्यष्टकमचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ असेल.
मिथुन
मिथुन राशीच्या चौथ्या घरात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. हा भाव आपल्या कुटुंबाचा भाव आहे, म्हणून सूर्याच्या या संक्रमणादरम्यान आपल्याला आपल्या पालकांची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषत: हे संक्रमण आपल्या वडिलांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते, म्हणून त्याच्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करू नका आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरांद्वारे त्याच्यावर उपचार करा.
या संक्रमण दरम्यान आपल्या भाऊ-बहिणींना फायदा होऊ शकतो. जर ते नोकरी करत असतील तर त्यांचे उत्पन्न वाढू शकते. यावेळी मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी, तुम्हाला एखादी मालमत्ता खरेदी करायची किंवा विकायची असेल तर या वेळी थांबा.
या राशीचे नोकरीपेशा लोकांच्या एकाग्रतेत घट दिसून येऊ शकते, यामुळे उच्च अधिकारी नाराज होतील. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण अनावश्यक विचार करणे टाळले पाहिजे. यावेळी आपण अधिकाधिक अनुभवी लोकांशी बोलले पाहिजे, आपण त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकू शकता. या राशीच्या काही लोकांना कुटुंब आणि समाजातून अलिप्त वाटू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले निकाल मिळण्यासाठी या राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.
उपाय- शुभ परिणाम मिळवण्यासाठी सूर्य बीज मंत्राचा जप करा.
कर्क
कर्क राशीच्या जातकांच्या धैर्य आणि पराक्रमाच्या तृतीय भावात सूर्य देव संक्रमण करीत आहे. हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल आणेल. आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलले, तर यावेळी तुम्हाला घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमची बरीच कामे पूर्ण होतील. तथापि, एखाद्याबद्दल भावंडांशी तणाव असू शकतो, म्हणून त्यांच्याशी सुज्ञपणे बोला आणि गैरसमज दूर करा.
या राशीच्या जातकाची आर्थिक बाजू देखील या संक्रमण दरम्यान सुधारली जाईल आणि आपल्याला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकेल. कार्यक्षेत्र आणि सामाजिक जीवनात आपण आपल्या भाषणाने लोकांवर प्रभाव टाकू शकता. आपण व्यवसाय करत असाल तर आपण आपल्या वाणीद्वारे चांगली डील मिळवू शकता.
या राशीतील लोकांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. तथापि, आपण यावेळी एकापेक्षा जास्त काम करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपण गुंतागुंतीत पडू शकता. प्रथम आपण हातात घेतलेले कार्य पूर्ण करा आणि त्यानंतरच कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करा.
उपाय- आपल्या वडिलांची किंवा वडिलधाऱ्यांची सेवा करा.
सिंह
सिंह राशीच्या जातकांच्या दुसर्या घरात सूर्य ग्रह संक्रमण करेल. हे संक्रमण आपल्यासाठी बर्याच मार्गांनी शुभ ठरू शकते. सिंह राशीच्या जातकांमध्ये नैसर्गिकरित्या नेतृत्व करण्याची क्षमता असते आणि आपल्या दुसर्या घरात सूर्याचे संक्रमण या क्षमतेत आणखी सुधारणा करेल. जर आपण उच्च पदावर असाल तर आपण आपल्या वाणीच्या बळावर आपल्या अधीनस्थांवर प्रभाव टाकू शकता.
या संक्रमणादरम्यान या राशीचे लोक त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी बचत करतील. सूर्य हा एक शुष्क ग्रह आहे आणि तो आपल्या वाणीच्या दुसर्या घरात विराजमान आहे, जर आपल्यानुसार कोणतेही कार्य झाले नाही तर आपल्या बोलण्यामध्ये कठोरपणा या दरम्यान येऊ शकतो. आर्थिक प्रगतीच्या या काळात या राशीच्या लोकांच्या जीवनात बर्याच संधी येऊ शकतात, फक्त काळजी घ्या की तुम्ही तुमचे अहमला तुमच्यावर अधिराज्य गाठू देऊ नका. जर आपण अहमच्या भावनेने पीडित असाल तर आपण संधींचा फायदा घेऊ शकणार नाही.
यावेळी सिंह राशीच्या लोकांनी लहान गुंतवणूकीपेक्षा दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या आरोग्याबद्दल बोलले तर, आपल्याला आपले खानपान सुधारावे लागेल अन्यथा आरोग्य बिघडू शकते. यावेळी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्या.
उपाय- रविवारी आपल्या वडिलांना एखादी भेटवस्तू द्या.
कन्या
कन्या राशीच्या लोकांच्या लग्न भावात सूर्य ग्रह संक्रमण करेल. लग्न भावामध्येआपले चारित्र्य, व्यक्तित्व, आरोग्य, स्वभाव इत्यादीचा विचार केला जातो. या भावामध्ये सूर्याचे संक्रमण आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकते. आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर आपण जास्त शारीरिक श्रम करत नसाल तर या काळादरम्यान चालू करा, सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम, योग इ. करणे चांगले राहील. मानसिक त्रास टाळण्यासाठी ध्यान करा. या वेळी आपला स्वभाव देखील चिडचिडेपणा दिसून येईल आणि आपल्या भाषणात कठोरता येऊ शकते.
या राशीचे लोक प्रत्येक कार्यात परिपूर्णतेचा शोध घेतात आणि म्हणूनच बर्याच वेळा कामाबद्दल इतकी चिंता होते की आजूबाजूच्या लोकांची देखील त्यांना काळजी नसते, आपण या काळात असे करणे टाळावे, अन्यथा संबंध बिघडू शकतात. या राशीच्या लोकांच्या विवाहित जीवनाबद्दल बोलले तर जीवनसाथीसोबत एखाद्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतो ज्यामुळे कौटुंबिक वातावरण खराब होऊ शकते. अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही मोकळेपणाने बोलायला हवे.
उपाय- रविवारी गुळ दान करा, तुम्हाला शुभ फळ मिळेल.
तुळ
तुळ राशीच्या जातकांच्या द्वादश भावात सूर्य ग्रह संक्रमण करेल. परदेशी संस्थेत काम करणार्या किंवा परदेशी देशांशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्या या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण फलदायी ठरेल.
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलताना या काळात तुम्हाला मोठ्या भाऊ-बहिणींकडून पाठिंबा मिळेल, यामुळे तुम्हाला फायदा होईल, तर तुमच्या बहिणींनासुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुळ राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या खर्चाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, तसेच या काळात अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. जमा धन वापरावे लागेल अशी कोणतीही कामे या काळादरम्यान करू नका.
या राशीचे जे लोक शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी हे संक्रमण मध्यम प्रमाणात फलदायी ठरेल, परंतु जे विद्यार्थी परदेशात जाऊन ज्ञान मिळवू इच्छितात अशा विद्यार्थ्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. या संक्रमण काळात लोकांना आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, पोट आणि डाव्या डोळ्याशी संबंधित समस्या होऊ शकतात.
उपाय- सूर्य देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी वडील किंवा वडीलधाऱ्या लोकांची सेवा करा.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील जातकांच्या एकादश भावात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. हा भाव लाभ भाव म्हटला जातो आणि यामुळे तुमच्या मनोकामना, मोठ्या भाऊ बहीण इत्यादींच्या बाबतीत ही विचार केला जातो. सूर्य देवाचे तुमच्या एकादश भावात असणे हे दर्शवते की, तुम्ही या काळात जीवनातील बऱ्याच क्षेत्रात लाभ मिळवाल.
या राशीतील जे जातक नोकरी पेशा आहे त्यांच्या कमाई मध्ये या काळात वाढ होऊ शकते तसेच, व्यपाऱ्यांना ही लाभ मिळवण्याची पूर्ण संधी सूर्य देव देईल. या सोबतच, जे जातक राजकारणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना ही या संक्रमणाच्या वेळी शुभ फळ मिळतील. तुमच्या गोष्टींचे कौतुक ही होईल तसेच, या राशीतील जे जातक बऱ्याच काळापासून जॉब करत आहे आणि त्यांना आता व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना ही या काळात नवीन दिशा मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहे तर, ही वेळ तुमच्यासाठी सर्वात शुभ सिद्ध होईल.
तथापि, या काळात तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. जर असे काम केले ज्यात बरेच लोक शामिल आहे तर, तुम्हाला सर्वांसमोर योग्य सिद्ध करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष दिले पाहिजे. लक्षात ठेवा चांगला टीम मेट तोच आहे जो एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जातो. या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या वडिलांचे पूर्ण सहयोग मिळेल.
उपाय- रविवारच्या दिवशी गरजू लोकांना वस्तू दान करा.
धनु
धनु राशीतील जातकांच्या दशम भावात सूर्य ग्रहाचे संक्रमण होईल. ह्या भावात सूर्य मजबूत अवस्थेत असतो आणि त्याला दिशा बळ प्राप्त होते. सूर्याच्या या भावातील संक्रमण धनु राशीतील जातकांसाठी शुभ राहील. या काळात नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना कार्य क्षेत्रात उच्च पदाची प्राप्ती होऊ शकते. या काळात कामाच्या प्रति तुम्ही खूप घनिष्ट असाल यामुळे तुमचे सहकर्मी ही तुमच्याने प्रभावित होतील.
सरकारी क्षेत्राने ही या राशीतील लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामे केल्याने तुमचा समाजात मान या काळात वाढू शकतो. जर अतीत मध्ये काही कारणास्तव तुमचे काम आटकलेले आहे तर, ते ही या काळात तुम्ही पूर्ण करू शकतात. तथापि, या काळात धनु राशीतील जातकांना अत्याधिक अधिकारात्मक दृष्टिकोन टाळला पाहिजे. तुम्ही लोकांवर अधिकार ठेवण्याच्या प्रयत्न करतात म्हणून, लोक तुमच्यापासून दूर जातात.
या राशीतील विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे जे विद्यार्थी प्रशासकीय सेवेची तयारी करत आहे त्यांना या क्षेत्रात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सूर्याच्या या संक्रमण काळात वडिलांसोबत तुमच्या संबंधात निखार येईल तसेच, वडिलांना काही आजार असेल तर, तो ही या काळात दूर होऊ शकतो. तुम्हाला या संक्रमण काळात अत्याधिक आलोचना करणे आणि लोकांच्या कामात कमी काढण्यापासून वाचले पाहिजे.
उपाय- रविवारी अनामिका बोटात माणिक रत्न धारण करा.
मकर
मकर राशीतील जातकांच्या नवम भावात सूर्य ग्रहाचे संक्रमण होत आहे. या भावाने भाग्य, धर्म, चरित्र, यात्रा इत्यादींच्या बाबतीत विचार केला जातो. या संक्रमण काळात मकर राशीतील लोकांना करिअर क्षेत्रात खूप सांभाळून राहावे लागेल. असा कुठला ही निर्णय या काळात घेऊ नका ज्यामुळे तुमचे भविष्य प्रभावित होईल. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात थांबून जा.
जे लोक व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे त्यांनी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे गेले पाहिजे. उच्च अधिकारी किंवा गुरुजनांसोबत या राशीतील लोकांचे मतभेद होऊ शकतात परंतु, तुम्हाला सल्ला दिला जातो मर्यादेत राहून आपल्या वरिष्ठ आणि गुरुजनांसोबत बोला.
या काळात तुम्ही कुठली ही यात्रा करू नका. सूर्य देवाच्या या संक्रमणाच्या कारणाने तुम्हाला यात्रेचा योग्य लाभ मिळणार नाही. या संक्रमणाच्या वेळी तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तीसोबत चांगला व्यवहार करा आणि त्यांची सेवा केल्यास तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने गंभीर राहा आणि स्वतःला फीट ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम करा.
उपाय- सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्काराचा अभ्यास करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
कुंभ
सूर्य देव कुंभ राशीतील जातकांच्या अष्टम भावात संक्रमण करतील. या भावाने जीवनात येणारे व्यत्यय आणि बाधा या बाबतीत विचार केला जातो. या भावात सूर्याच्या संक्रमणाने तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. यामुळे तुमची चिंता ही वाढेल. या सोबतच, तुमचे आरोग्य ही या काळात खराब होऊ शकते. तुम्ही जे काम करत आहे त्यात या काळात व्यत्यय येऊ शकतो म्हणून, या काळात तुम्ही धैर्याने काम करा आणि आशावादी राहा.
कौटुंबिक जीवनात काही गोष्टींना घेऊन वडिलांसोबत दुरी होऊ शकते. जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करतात तर, काही लहान कारणामुळे तुमचे तुमच्या भागीदारासोबत वाद किंवा नाराजी होऊ शकते यामुळे तुमच्या व्यवसायात घाटा होऊ शकतो. अश्यात आपल्या भागीदारासोबत तुम्ही स्पष्ट बोलण्याची आवश्यकता आहे.
आपल्या आर्थिक पक्षावर ही तुम्ही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या काळात कुठल्या ही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करा. या राशीतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण चांगले राहील जे शोध करत आहे तसेच, इतर जातकांना या संक्रमणाच्या वेळी एकाग्रता ठेवण्यासाठी योग ध्यान केले पाहिजे.
उपाय- रविवारी सूर्योदयाच्या वेळी मंदिरात जाऊन दान करा.
मीन
मीन राशीच्या लोकांच्या विवाह आणि भागीदारीच्या सातव्या घरात सूर्य ग्रह संक्रमण करेल. या घरात सूर्याच्या संक्रमणामुळेआपल्या विवाहित जीवनात काही अडचणी येऊ शकतात. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल राग येऊ शकतो ज्यामुळे तुमचा जोडीदार अस्वस्थ होईल. आपण आपल्या शब्द जोडीदारासह स्पष्टपणे शेर केल्यास, बर्याच अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडचणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण आपल्या गोष्टी स्वतःपुरती मर्यादित ठेवतात त्या गोष्टी शेर करत नाही, म्हणून असे करू नका. रागाचा अतिरेक आपल्यामध्ये दिसून येतो ज्या दरम्यान लोक आपल्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. या दरम्यान आपले विरोधक आपल्याला अडचणीत आणू शकतात, म्हणून सावध रहा. यावेळी आपल्याला आपल्या इच्छे शक्तीवर कार्य करण्याची आवश्यकता आहे. या राशीच्या बर्याच लोकांना या वेळी आवश्यक निर्णय घेण्यास अडचण येऊ शकते. यावेळी आयुष्यात उतार-चढ़ाव येतील परंतु तुम्हाला संयमाने पुढे जावे लागेल आणि प्रत्येक परिस्थितीला ठामपणे सामोरे जावे लागेल.
उपाय- रविवारी तांब्याची वस्तू दान करा, तुम्हाला शुभ फळ मिळेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025