मंगळचे कुंभ राशीमध्ये संक्रमण आणि प्रभावी उपाय (4 मे, 2020)
मंगळ ग्रह 4 मे, सोमवारी रात्री 19:59 वाजता आपल्या उच्च राशी मकर मधून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. हे मंगळचे शत्रू शनीच्या स्वामित्वाची राशी आहे. मंगळ एक अग्नी तत्व प्रधान ग्रह आहे आणि कुंभ एक वायू तत्व राशी आहे. या प्रकारे एक अग्नी तत्व प्रधान ग्रह ग्रह आहे आणि कुंभ एक वायू तत्व राशी आहे. या प्रकारे एक अग्नी तत्व प्रधान ग्रहाचा प्रवेश वायू तत्व प्रधान राशीमध्ये होईल तेव्हा वातावरणात गरम हवेची वृद्धी होईल. चला मग आता जाणून घेऊया की, मंगळाच्या कुंभ राशीमध्ये संक्रमणाचे फळ सर्व बारा राशीतील लोकांना कश्या प्रकारे प्रभावित करणार आहे.
जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुमच्या अकराव्या भावात संक्रमण करेल. हे तुमच्या राशीच्या आठव्या भावाचा स्वामी ही आहे. मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूलतेचे द्वार खोलेल आणि तुम्हाला अनेक संधी प्राप्त होईल. या संक्रमण काळात मंगळ तुमच्यासाठी अनेक प्रकारची आर्थिक योजना फलिभूत करेल, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही धन गुंतवणूक करण्यात चांगला नफा मिळवाल. प्रॉपर्टीतुन ही लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे यामुळे तुमचा दबदबा वाढेल.
कार्य क्षेत्रात तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपा पात्र बनाल आणि तुम्हाला विशेष सुविधा मिळू शकतात. या संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव हा होईल की, तुमच्या प्रेम जीवनात आव्हाने येतील आणि शक्यता आहे की, एकमेकांचे विचार न मिळाल्याने मत भिन्नता होण्याच्या कारणाने तुमच्या दोघांमध्ये खिचातनी वाढू शकते.
जर तुम्ही विवाहित आहेत तर, संतान साठी हे संक्रमण सामान्य राहील तथापि, त्यांचे आरोग्य खराब होऊ शकते आणि जर तुम्ही विद्यार्थी आहेत तर, तुम्हाला या संक्रमणाचे चांगले परिणाम प्राप्त होतील. तुम्ही आपल्या धनाची बचत करण्यात यशस्वी राहाल आणि आपल्या विरोधींवर भारी पडाल. या काळात केलेले प्रयत्न तुम्हाला प्रत्येक प्रकारचा लाभ मिळेल आणि हे सांगितले जाऊ शकते की, तुम्ही जे काम करण्यास घ्याल त्यात तुम्ही चमकाल.
उपायः तुम्ही मंगळ ग्रह मंत्र "ॐ अं अंगारकाय नमः" चे नियमित जप केले पाहिजे.
वृषभ राशि
वृषभ राशीतील लोकांसाठी मंगळचे संक्रमण दशम भावात होईल आणि हे तुमच्यासाठी कार्य क्षेत्रात यशाचे झेंडे गाडणारे असेल. मंगळ तुमच्या राशीसाठी सातव्या सातव्या तसेच बाराव्या भावाचा स्वामी आहे. मंगळाची ही स्थिती संक्रमण काळात तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात उत्तम बनवेल आणि तुमच्या अधिकार आणि कर्तव्यासोबतच वेतनात ही वृद्धी पाहायला मिळेल. तुमचा तुमच्या कार्यालयात दबदबा राहील आणि तुमचे अधिकार वाढतील. यामुळे तुमच्या सोबत काम करणारे काही लोक तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचू शकतात आणि तुमच्या प्रतिमेला खराब करण्याचा प्रयत्न करतील.
या पासून बचाव करण्यासाठी तुम्हाला अभिमान आणि अति आत्मविश्वास पासून बचाव कारणे गरजेचे आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्ही आपल्या कामाला जास्त महत्व द्याल परंतु, शरीराला कमी महत्व देण्याने आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. या संक्रमणाच्या प्रभावाने कुटुंबात काही उथळ होऊ शकते आणि घरातील लोकांच्या आरोग्याच्या प्रति तुम्ही थोडे चिंतीत राहाल.
प्रेम जीवनाच्या दृष्टिकोनाने हे संक्रमण अधिक अनुकूल राहील म्हणून, या काळात आपल्या प्रियकराला भेटण्याचा प्रयत्न कमी करा म्हणजे तुमच्या मध्ये काही वाद होणार नाही.
उपायः मंगळ ग्रहाचे अनुकूल प्रभाव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मंगळवारी हनुमानाला लवंगाच्या गोड पान अर्पण केला पाहिजे.
मिथुन राशि
मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीच्या नवव्या भावात होईल. हा भाव तुमच्या सहाव्या तसेच अकराव्या भावाचा स्वामी आहे. या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुम्हाला कार्य क्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमचे वडिलांच्या संबंधात वाईट प्रभाव पडू शकतो आणि त्यांचे आरोग्य बिघडू शकते याच्या अतिरिक्त, हे संक्रमण तुम्हाला सामान्यतः आर्थिक लाभ पोहचवले यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधृढ होईल.
कमाई वाढवण्याच्या दिशेत तुम्ही अधिक प्रयत्न कराल आणि नवीन संधी शोधाल. या काळात तुम्हाला लांब यात्रा करण्याची संधी मिळेल जी की, तुम्ही त्या विचारपूर्वक कराल. संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या भाऊ-बहिणींच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु, यामुळे तुमची निर्णय घेण्याची शक्ती प्रबळ होईल आणि तुमच्या आत्मबलात वाढ होईल यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल.
कौटुंबिक दृष्ट्या हे संक्रमण अधिक अनुकूल नाही आणि तुमच्या कुटुंबात विशेष रूपात आईचे आरोग्य खराब होऊ शकते आणि त्यात समस्या वाढू शकतात. मंगळाचे हे संक्रमण कठीण प्रयत्ना नंतर यश दर्शित करते म्हणून, तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. विरोधींच्या दृष्टिकोनाने हे संक्रमण कमजोर राहील आणि तुम्ही त्यावर भारी पडाल.
उपायः तुम्ही मंगलवारी स्वेच्छेने रक्त दान करा.
कर्क राशि
कर्क राशीतील अष्टम भावात मंगळचे संक्रमण होईल. मंगळ तुमच्या पंचम भावात अर्थात त्रिकोण तसेच दशम भावात अर्थात केंद्र भावाचा स्वामी होऊन तुमच्यासाठी योगकारक ग्रह आहे म्हणून, याचे संक्रमण बरेच महतवाचे असेल. मंगळाच्या अष्टम भावात संक्रमण करण्याने तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकते. अनियमित रक्तदाब, दुर्घटना, जखम, अश्या समस्या होऊ शकतात म्हणून वाहन अतिशय सावकाश चालवा.
गुप्त पद्धतींनी धन प्राप्तीचे रस्ते तुम्हाला सापडतील आणि आंशिक दृष्ट्या तुम्हाला त्यात यश ही ,हळू शकते. मंगळाच्या संक्रमणाच्या वेळी काही यात्रा अश्या कराव्या लागतील ज्यांच्या बाबतीत तुम्ही कधी ही विचार केला नव्हता. यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान उचलावे लागू शकते. तुमच्या कुटुंबात या संक्रमणाने शांततेचे वातावरण राहू शकते तसेच, कुटुंबात भाऊ बहिणींना आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
तुमच्या कार्य क्षेत्रात काही समस्यानंतर यश दायक वेळ प्राप्ती होईल. तुम्हाला काही ही बोलण्याच्या आधी विचार करणे गरजेचे आहे कारण, सासरच्या पक्षाकडून नाते बिघडू शकतात. या संक्रमणाच्या प्रभावाने जीवनसाथीचे आरोग्य पीडित होईल आणि तुम्हाला मानसिक चिंता होऊ शकतात यामुळे काळजी घ्या.
उपायः तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यात तीन मुखी रुद्राक्ष मंगळवारी धारण केले पाहिजे.
सिंह राशि
सिंह राशीतील लोकांसाठी मंगळ एक योगकारक ग्रह आहे कारण, हे तुमच्या चौथ्या (केंद्र भावात) तसेच नवव्या (त्रिकोण भावाचा) स्वामी आहे. मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीच्या सातव्या भावात होईल जे की, तुमच्यासाठी अधिक अनुकूल मानली जात नाही. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या दांपत्य जीवनात तणाव आणि वाद होण्याची शक्यता वाढेल आणि तुमच्या दोघांचे नाते सामान्य राहू शकणार नाही.
तुमच्या जीवनसाथीच्या व्यवहारात ही तुम्हाला बदल पाहण्यास मिळेल आणि काही रागीट स्वभावाला घेऊन पुढे जाल ज्यामुळे छोट्याश्या गोष्टीवरून तुमचे नाते बिघडू शकते. या संक्रमणाचा प्रभाव सकारात्मक पक्षात राहील की, व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला उत्तम लाभ प्राप्ती होईल. तुमचे वडील ही या वेळी आपल्या जीवनात चांगली प्रगती प्राप्त करतील आणि तुमच्या कार्यक्षेत्रात ही तुम्हाला प्रगती मिळेल.
जर तुम्ही व्यवसाय करतात तर, तुम्हाला उन्नती मिळू शकते याच्या अतिरिक्त तुमचे आरोग्य ही मजबूत बनेल आणि आरोग्य संबंधित समस्यांनी मुक्ती मिळेल. संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला आंशिक दृष्ट्या धन लाभ होण्याची शक्यता राहील.
उपायः तुम्ही मंगळवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावून सुंदरकांडचे पाठ केले पाहिजे.
कन्या राशि
तुमच्या राशीसाठी मंगळ तिसऱ्या तसेच आठव्या भावाचा स्वामी असून अधिक अनुकूल ग्रह नाही आणि हे तुमच्या राशीच्या भावात संक्रमण करेल यामुळे तुमच्या प्रयत्नात यश मिळेल परंतु, आरोग्य कमजोर राहील. या वेळात तुम्ही रक्त संबंधित कुठल्या ही शारीरिक समस्यांनी ग्रसित होऊ शकतात. या संक्रमणाचा अनुकूल पक्ष हा असेल की, तुम्हाला आर्थिक दृष्ट्या काही फायदा प्राप्त होईल आणि तुम्ही आपल्या कर्जाला फेडण्यासाठी लोन किंवा कर्ज चुकवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला मुक्ती मिळू शकते.
या वेळात तुम्ही आपल्या शत्रूंवर भारी पडाल तसेच जर काही कोर्ट केस चालू आहेत तर, त्या ही तुमच्या पक्षात येऊ शकतात परंतु, तुम्हाला दुसऱ्यांच्या बाबतीत पडण्यास बचाव केला पाहिजे ज्यामुळे तुमचे काही संबंध खराब होऊ नये. जर तुम्ही नोकरी करत आहे तर, मंगळ ग्रहाचे संक्रमण तुम्हाला चांगले परिणाम देईल आणि तुमच्या नोकरीमध्ये स्थिती मजबूत होईल. तुम्हाला अत्याधिक तळलेले पदार्थ आणि थंड पेय पिणे टाळले पाहिजे यामुळे शरीरात पित्त प्रकृती शांत राहून तुम्ही आजारी पडणार नाही.
उपायः तुम्ही मंगळवारी गहू आणि गुळाचे दान केले पाहिजे.
तुळ राशि
मंगळाचे संक्रमण तुळ राशीतील पाचव्या भावाचा आकार घेईल. मंगळ तुमच्या राशीसाठी दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी होण्याच्या कारणाने मारक ही आहे तसेच पंचम भावात मंगळचे संक्रमण अनुकूल नसते. यालाच लक्षात घेऊन सांगितले जाऊ शकते या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुमच्या नोकरी मध्ये काही बदल येतील आणि तुम्ही आपल्या नोकरीला सोडून दुसरी नोकरी करण्यासाठी प्रयत्नरत राहाल.
या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील परंतु, तुमच्या मुलांना शारीरिक कष्ट होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे संक्रमण जास्त अनुकूल नसेल कारण, येथे स्थित मंगळ तुमच्या एकाग्रतेला भंग करेल आणि अभ्यासात अवरोध उत्पन्न करेल. जर तुम्ही कुणावर प्रेम करतात तर, जीवनाच्या बाबतीत ही हे संक्रमण अधिक अनुकूल नाही.
तथापि, काही विशेष स्थितीमध्ये हे संक्रमण प्रेम विवाहाच्या स्थितीमध्ये बनेल. मंगळाचे संक्रमण शारीरिक रूपात तुम्हाला चिंतीत करू शकते परंतु, आर्थिक दृष्टया हे तुम्हाला चांगले परिणाम देईल आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल. जर तुम्ही व्यापार करतात तर, व्यापाराच्या बाबतीत तुमचे खूप डोके चालेल आणि तुमच्या व्यवसायाची डील सक्सेसफुल राहील. खर्च तुमच्या नियंत्रणात राहील ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या तुमचे मन प्रसन्न राहील.
उपायः मंगळाच्या संक्रमणाचा विशेष लाभ प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी गुळाचे सेवन केले पाहिजे.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील लोकांचा स्वामी मंगळ असतो म्हणून, याचे संक्रमण तुमच्यासाठी बरेच महत्वपूर्ण राहील. हे तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीच्या चौथ्या भावात होईल जिथे याची स्थिती अधिक अनुकूल मानली जात नाही. या स्थितीमध्ये तुम्हाला कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. घरात लोक एकमेकांसोबत राग भावना ठेवतील यामुळे वाद वाढेल.
आईचे आरोग्य कमजोर राहील आणि ते आजारी ही होऊ शकतात. त्यांच्या स्वभावात उग्रता पाहण्यास मिळेल. तुम्हाला या कारणाने मानसिक रूपात अशांती वाटेल. या संक्रमणाच्या प्रभावाने कुठल्या विवादाच्या कारणाने तुम्हाला सुख मिळू शकते, विशेषकरून प्रॉपर्टी विवादात यश मिळू शकते. या अतिरिक्त तुम्ही काही चल-अचल संपत्ती खरेदी करण्याच्या दिशेमध्ये यशस्वी होऊ शकतात. मंगळाच्या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या दांपत्य जीवनात तणाव स्थिती उत्पन्न होईल म्हणून, वाद विवादापासून दूर राहणेच उत्तम असेल.
तथापि, मंगळचे संक्रमण तुमच्या कार्य क्षेत्रात उत्तम स्थितीचे निर्माण करेल आणि तुम्ही आपल्या कामात मजबूत व्हाल. तुम्हाला या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप आंशिक दृष्टया धन लाभ ही होईल तथापि, तुम्ही त्याला खर्च ही करून टाकाल यामुळे स्थिती जस्यास तशी होईल.
उपायः मंगळाचे शुभ प्रभाव मिळवण्यासाठी तुम्हाला मंगळ बीज मंत्राचा "ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" जप केला पाहिजे.
धनु राशि
धनु राशीतील लोकांसाठी मंगळ पंचम भाव तसेच द्वादश भावाचा स्वामी आहे. हे तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पतीचा मित्र आहे आणि संक्रमणाच्या वेळात तुमच्यात तिसऱ्या भावात प्रवेश करेल. मंगळाचे संक्रमण तिसऱ्या भावात अनुकूल मानले जाते म्हणून, ह्या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या उर्जेला पंख मिळतील आणि तुम्ही आपल्या कार्य कुशलता तसेच तांत्रिक क्षमतेने यश मिळवाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्ही खूप आनंदी राहाल.
ह्या वेळात तुमच्या प्रेम जीवनात आनंद येईल आणि तुमच्या जीवनात कुणी व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमचा मानसिक तणाव दूर होईल आणि तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवाल म्हणून, प्रत्येक कामाला स्वतः केले पाहिजे. यामुळे कामात प्रगती होते. तुम्ही आपल्या विरोधींना हानी पोहचवाल आणि त्यांना अजिबात घाबरणार नाही.
जर तुम्ही खेळाडू आहेत तर, तुम्हाला या संक्रमणाचा खूप चांगला परिणाम मिळेल आणि तुमच्या खेळाची क्षमता मजबूत होईल. यात्रेची शक्यता राहील तथापि, यात्रा तुम्हाला थोडा थकवा नक्कीच देईल आर्थिक दृष्ट्या लाभदायक सिद्ध होईल. कार्य क्षेत्रासाठी हे संक्रमण अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होईल.
उपायः तुम्हाला विशेष रूपात बृहस्पती वारच्या दिवशी गाईच्या फोटोची विधिवत पूजा केली पाहिजे.
मकर राशि
मकर राशीतील लोकांसाठी मंगळ सुख भाव अर्थात चतुर्थ तसेच कमाई भाव अर्थात एकादश भावाचा स्वामी आहे. मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात होईल यामुळे तुमची आर्थिक उन्नतीचे दरवाजे उघडतील आणि कमी प्रयत्नांनी आर्थिक यश प्राप्त होईल तसेच तुमचा सामाजिक स्तर ही उंचावेल. या संक्रमणाचा कमजोर पक्ष हा आहे की, कुटुंबात तणाव पाहायला मिळू शकतो आणि तुमच्या वाणीमध्ये काही कटुता पाहिली जाईल यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
प्रॉपर्टीच्या बाबतीत हे संक्रमण अनुकूल राहील आणि तुम्हाला त्यापासून लाभ होईल, शिक्षणाच्या क्षेत्रात हे संक्रमण अधिक अनुकूल सांगितले जात नाही आणि तुमच्या अभ्यासात विघ्न येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत ही अधिक अनुकूलता पाहिली जाणार नाही आणि तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमजोर असण्याने तुम्ही लगेच आजारी पडण्याची शक्यता राहील. या काळात अधिक तेल मसालेदार भोजन करू नका तसेच कुटुंबात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमचे मोठे भाऊ बहीण आवश्यक असल्यास या काळात तुमची आर्थिक मदत ही करतील यामुळे तुमचे नाते उत्तम बनतील. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्या पाहायला मिळू शकतात. त्यांची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपायः तुम्हाला मंगळवारी आपल्या घराच्या गच्चीवर लाल रंगाचा झेंडा लावला पाहिजे.
कुंभ राशि
मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीच्या प्रथम भावात होईल अर्थात तुमच्या राशीमध्ये मंगळचे संक्रमण होण्याने तुम्हाला या संक्रमणाचा विशेष प्रभाव मिळेल. मंगळ तुमच्या राशीसाठी तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या भाऊ बहिणींचे सहयोग तुम्हाला मिळेल तसेच तुमचा आत्मविश्वास अधिक राहील. तुमच्या कार्य क्षेत्रात या संक्रमणाचा चांगला लाभ तुम्हाला प्राप्त होईल.
तुम्ही आपल्या कामाला उत्तमरीत्या पार पाडाल यामुळे तुमची प्रशंसा होईल. संक्रमणाचा हा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनाला चिंतीत करेल आणि अशांत करेल तसेच कुटुंबातील प्रौढ व्यक्तींचे आरोग्य पीडित होऊ शकते विशेषकरून तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेणे तुम्हाला खुप गरजेचे आहे कारण त्या आजारी होऊ शकतात.
या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या दांपत्य जीवनावर पडेल कारण, मंगळची सप्तम दृष्टी तुमच्या दांपत्य भावावर आहे यामुळे कटू वचन आणि रागाच्या कारणाने तुम्हा दोघांमध्ये अहंकार वाढू शकतो आणि याचा प्रभाव दांपत्य जीवनाला पीडित करेल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमचे आरोग्य खराब होऊ शकते आणि तुम्ही आजारी पडू शकतात म्हणून, विशेषतः आरोग्य संबंधीत निष्काळजीपणा करू नका.
उपायः मंगळाच्या अशुभ प्रभावाने बचाव करण्यासाठी तुम्हाला तांब्याच्या पात्रात मंगळ देवाला भोग अर्पित केले पाहिजे.
मीन राशि
मीन राशीतील लोकांसाठी मंगळ दुसऱ्या आणि नवव्या भावाचा स्वामी असतो तसेच मंगळचे संक्रमण तुमच्या राशीच्या बाराव्या भावात असेल. या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुम्हाला परदेशातील स्रोतांनी लाभ होईल परंतु सध्याची परिस्थिती पाहता आता जाणे योग्य नाही. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या दांपत्य जीवनात काही आव्हाने येतील. त्याचा सामना तुम्हाला हिम्मतीने करावा लागेल.
या काळात जीवनसाथीचा व्यवहार तुम्हाला आश्चर्य चकित करू शकते कारण, तुम्हाला अश्या वागणुकीची आणि वर्तनाची अजिबात कधीच अपेक्षा नसेल. हे संक्रमण तुमच्या भाऊ बहिणींसाठी अधिक अनुकूल नाही म्हणून, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने कमाई मध्ये सामान्यतः वाढ होईल परंतु, खर्च थोडे वाढू शकतात.
तथापि, आपल्या विरोधींच्या प्रति तुम्हाला चिंतीत होण्याची आवश्यकता नाही कारण, ते तुम्हाला काहीच हानी पोहचवू शकत नाही. या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति थोडे चिंतीत व्हायला पाहिजे कारण नेत्र संबंधित त्रास किंवा झोप न येणे सारख्या समस्या या संक्रमण काळात तुम्हाला त्रास देऊ शकतात.
उपायः तुम्हाला मंगळवारी ॐ कुजाय नमः मंत्राचा जप केला पाहिजे यामुळे तुमचे भाग्य मजबूत होईल.
रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025