गुरु बृहस्पतीचे मकर राशीमध्ये संक्रमण (29 मार्च, 2020)
देवतांचा गुरु सांगणारा बृहस्पती ग्रह 29 मार्च 2020, रविवारच्या रात्री 7:08 वाजता मकर राशीमध्ये प्रवेश करेल. जिथे ह्या मकर राशीचा स्वामी शनीची युती ही करेल. वैदिक ज्योतिषाच्या अनुसार गुरुचे राशि परिवर्तन बरेच अनुकूल मानले जाते कारण, देव गुरुची दृष्टी अमृत समान मानली गेली आहे. गुरु नैसर्गिक रूपात एक शुभ ग्रह आहे आणि सर्वांसाठी चांगले परिणाम देण्यासाठी सामर्थ्य ठेवतात. गुरुच्या मकर राशींमधील संक्रमणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर कुठल्या न कुठल्या रूपात नक्की होईल. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीवर गुरु संक्रमणाचा काय प्रभाव दिसणार आहे.
हे राशि भविष्य चंद्र राशि वर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
गुरु संक्रमण - मेष राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या दशम भावात प्रवेश करेल. हे तुमच्या नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. मकर राशीमध्ये गुरु संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या कार्य क्षेत्रात काही चढ-उताराची स्थिती बनेल. काही लोकांना ट्रान्सफर मिळण्याची शक्यता राहील आणि हे बृहस्पती तुमच्याशी बरीच मेहनत करून घेईल. कार्य क्षेत्रात बृहस्पतीचे संक्रमण विशेष रूपात तुम्हाला आपल्या बाबतीत विचार करण्यास मजबूत करेल की, तुम्ही योग्य काम करत आहे की, नाही. तुमच्या योजना फलीभूत होतील परंत्तू, कार्य क्षेत्रात तुमचा अति आत्मविश्वास तुम्हाला चिंतेत टाकू शकतो म्हणून, आपल्या कामाशी काम ठेवा आणि दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे बंद करा. बृहस्पतीच्या या संक्रमणाने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि तुम्ही समाजात सन्मानित बनाल. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल आणि कुटुंबात वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद ही मिळेल तसेच जीवनात तुम्ही खूप प्रगती कराल. याच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल आणि तुमची अटकलेली कामे ही पूर्ण होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल आणि तुम्हाला आपला सामाजिक स्तर उंचावण्यात यश मिळेल. तुम्हाला आपल्या कामावर पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता असेल.
उपाय: गुरुवारच्या दिवशी गाईला चण्याची दाळ खाऊ घाला.
गुरु संक्रमण - वृषभ राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या राशीच्या नवव्या भावात होणार आहे. हे तुमच्या राशीच्या आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. बृहस्पतीचे हे संक्रमण वृषभ राशीतील जातकांसाठी मिश्रित परिणाम घेऊन जाईल. या संक्रमणाच्या प्रभावाने सामाजिक रूपात तुमची बरीच प्रगती होईल आणि तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. तुम्हाला अचानक काही पूर्वजांची संपत्ती प्राप्त होण्याचे योग बनू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुमच्या गुरूंना किंवा गुरु तुल्य व्यक्तीला मिळण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि त्यांचा सल्ला जीवनात तुमच्या खूप कामी येईल. आर्थिक दृष्ट्या हे संक्रमण सामान्य राहणार आहे. ह्या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या मनात आर्थिक विचार राहतील आणि तुम्ही धार्मिक गोष्टींमध्ये खूप उत्साहाने शामिल व्हाल. हे संक्रमण तुमच्या मध्ये आळस वाढवेल यामुळे तुमच्या बऱ्याच महत्वाच्या योजना निष्फळ होऊन तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतात म्हणून, थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या संतान साठी हे संक्रमण खूप अनुकूल राहील आणि त्यांची उन्नती होईल. जर तुम्ही आता अविवाहित आहेत आणि कुठल्या प्रेम संबंधात आहे तर, हे संक्रमणाचा अनुकूल परिणाम मिळेल आणि तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप चांगली वेळ असेल. या संक्रमण काळात तुम्ही लांब यात्रेवर ही जाऊ शकतात.
उपाय: गुरुवारच्या दिवशी गाईला चारा खाऊ घाला.
शुक्राचे वृषभ राशीमध्ये संक्रमण वाचण्यासाठी येथे - क्लिक करा
गुरु संक्रमण - मिथुन राशि भविष्यवाणी
तुमच्या राशीतील जातकांसाठी बृहस्पती सातव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. सातव्या भावाचा स्वामी असण्याच्या कारणाने हा मारक ही आहे आणि या संक्रमण काळात तुमच्या अष्टम भावात प्रवेश करेल. मिथुन राशीतील लोकांसाठी बृहस्पतीचे हे संक्रमण जास्त अनुकूल मानले जात नाही कारण, याचे काही प्रतिकूल परिणाम ही समोर दिसतील. गुरु संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या खर्चात वाढ होईल यामुळे तुमची आर्थिक स्थिती बरीच बिघडू शकते आणि तुम्हाला खूप जास्त तणावाचा सामना करावा लागू शकतो. तथापि, जे लोक अध्यात्मिक गोष्टींमध्ये आहेत त्यांच्यासाठी बृहस्पतीचे संक्रमण बरेच अनुकूल सिद्ध होईल. तरी ही या संक्रमण काळात तुम्हाला आरोग्य संबंधित मोठ्या समस्या समोर येऊ शकतात म्हणून, आरोग्य संबंधित कुठल्या ही समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा. जे लोक ध्यान, मेडिटेशन आणि योग करतात त्यांच्यासाठी हे संक्रमण उत्तम अनुभव घेऊन येईल. तुम्हाला काही खर्चांपासून मुक्ती मिळेल, अथवा तुम्ही बरेच चिंतीत व्हाल. विनाकारण यात्रा तुमच्या धन आणि आरोग्यावर वाईट प्रभाव टाकू शकतो म्हणून, यापासून दूर राहणेच उत्तम असेल. या संक्रमण काळात आपल्या सासरच्या पक्षासंबंधावर थोडा प्रभाव पडू शकतो आणि ते मानसिक तणावाचे कारण ही बनू शकतात.
उपाय: बृहस्पतिवारच्या दिवशी शुद्ध तुप दान करा.
गुरु संक्रमण - कर्क राशि भविष्यवाणी
तुमच्या राशीसाठी देव गुरु बृहस्पतीचे संक्रमण सदैव महत्वाचे असते कारण, हे तुमच्या नवम भाव अर्थात भाग्य स्थानाचा स्वामी ही आहे आणि सहाव्या भावाचा स्वामी ही आहे. आपल्या या संक्रमण काळात बृहस्पती देव तुमच्या सातव्या भावात प्रवेश करेल. कर्क राशीतील लोकांसाठी देव गुरु बृहस्पतीचे हे संक्रमण बऱ्याच गोष्टींमध्ये खूप अनुकूल सिद्ध होईल कारण, देव गुरु बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या कमाई मध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळेल आणि तुमची आर्थिक शिटी सुधृढ बनेल. व्यापाराच्या बाबतीत ही तुमचे चांगले संपर्क स्थापित होतील जे तुम्हाला पुढे जाण्यात मदत करेल. या काळात तुम्ही आपल्या व्यापाराला गती देण्यात यशस्वी व्हाल. एका गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की, या वेळी तुमच्या बिझनेस पार्टनर सोबत तुमचे नाते खराब होऊ शकतात म्हणून, त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा. या संक्रमणात दांपत्य जीवनात मिळते-जुळते परिणाम घेऊन येईल. जिथे एकीकडे तुमच्या नात्यामध्ये परस्पर समज वाढेल तसेच, दुसरीकडे तुमच्या जीवनसाथीचा व्यवहार थोडा बदलू शकतो आणि ते अहंकाराच्या भावनेत ग्रस्त होऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या दांपत्य जीवनावर पडेल. आरोग्याच्या दृष्टीने बृहस्पतीचे संक्रमण थोडे कमजोर होऊ शकते म्हणून, विशेष रूपात काळजी घ्या. लहान-मोठी यात्रा तुमच्या कुटुंबासाठी वृद्धी प्रदान करेल. ज्या लोकांचा विवाह झालेला नाही त्यांना या संक्रमणाचे अनुकूल परिणाम मिळतील आणि विवाह होण्याचे योग बनतील.
उपाय: प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडाचे पूजन करा.
गुरु संक्रमण- सिंह राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पतीचे संक्रमण सिंह राशीतील जातकांच्या सहाव्या भावात असेल. हे तुमच्या राशी स्वामीचा जवळचा मित्र आहे आणि तुमच्या कुंडली मध्ये पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी ही आहे. या संक्रमण प्रभावाने तुमच्या खर्चात वाढ पाहायला मिळू शकते. हा तो वेळ असेल जेव्हा तुम्ही आरोग्य क्षेत्रात कमजोर होऊ शकतात आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते. काही मोठा आजार ही सुरु होऊ शकतो म्हणून विशेष काळजी घ्या. या वेळात तुम्हाला वाहन सावधानी पूर्वक चालवले पाहिजे. कुणी अन्य व्यक्तीच्या वादात पडू नका अन्यथा नुकसान उचलावे लागू शकते. कठीण मेहनतीने कार्य क्षेत्रात आंशिक यश मिळण्याची अपेक्षा तुम्ही ठेऊ शकतात. या वेळी जर तुम्ही प्रयत्न कराल तर, तुम्हाला आपल्यावर असलेल्या कर्जाला चुकवण्यात यश मिळेल परंतु, शक्यता आहे की, तुम्ही कुणाकडून कर्ज घेऊन मागील कर्ज चुकवू शकतात. जर तुमच्या जवळ अधिक धन आहे तर, कुणाला आपले धन उधार देऊ नका कारण, त्याची परत फेड होण्याची अपेक्षा नसेल. जेवणात तेलकट तुपकट जेवण केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.
उपाय: बृहस्पति बीज मंत्राचा जप करा "ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:"
गुरु संक्रमण - कन्या राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या राशीच्या पाचव्या भावात होईल. कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी बृहस्पती चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे तसेच हा सप्तम भावाचा स्वामी असण्याने याला मारक ही म्हटले जाते. पंचम भावात बृहस्पतीचे संक्रमण तुमच्यासाठी काही बाबतीत काही चांगले आणि काही बाबतीत चिंता जनक परिणाम घेऊन येईल. जर कुंडली मध्ये स्थिती अनुकूल असेल तर, या संक्रमण प्रभावाने तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते आणि तुमची वर्षातील इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या कुटुंबात सुख आणू शांतीमध्ये वाढ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल. जर तुम्ही काही व्यापार करतात तर ही ती वेळ असेल जेव्हा आपल्या व्यापारात उन्नतीचा प्रसार होईल परंतु, तुमचे काही निर्णय चुकीच्या दिशेत ही जाऊ शकतात. येथे बृहस्पती आपल्या नीच राशीमध्ये आहे तथापि, राशीचा स्वामी शनी ही सोबत असण्याच्या कारणाने तुम्हाला सुरवाती मध्ये काही अनुकूल परिणाम मिळण्यात उशीर होऊ शकतो तरी ही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. याच्या व्यतिरिक्त, या संक्रमण काळात शिक्षणाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील आणि तुमचे शिक्षण पुढे वाढेल. तुमच्या मध्ये ज्ञान प्रति जिज्ञासेची भावना जागेल जी तुम्हाला पुढे नेण्यास मदत करेल. जर तुम्ही कुणाच्या प्रेम संबंधात आहे तर, हे संक्रमण तुमच्यासाठी चढ-उताराची स्थिती बनवेल. तुम्ही हा निर्णय घेण्यास चिंतीत व्हाल ज्यावर तुम्ही प्रेम करतात, काय ते वास्तवात तुमचे जीवनसाथी बनतील की, नाही. या असामंजस्या पासून बचाव करण्यासाठी तुम्हाला कुठल्या समजदार आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे. जर तुम्ही नोकरी करतात तर, या वेळेत तुमची नोकरी जाण्याची शक्यता बनू शकते.
उपाय: नियमित आपल्या घरामध्ये कपूरचा दिवा लावा.
गुरु संक्रमण - तुळ राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या चौथ्या भावात होईल म्हणून, ज्या लोकांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतलेला आहे त्यांना बृहस्पतीच्या या संक्रमणाच्या प्रभावाने विशेष रूपात कौटुंबिक जीवन पाहायला मिळू शकतो. बृहस्पती तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी ही आहे. चतुर्थ भावात बृहस्पतीचे संक्रमण कुटुंबात तणाव वाढवू शकतो. लोकांमध्ये एकमेकांना समजण्याची कमतरता होऊ शकते याचे कारण, कुटुंबातील एकता खतऱ्यात पडू शकते परंतु, हे संक्रमण कार्य क्षेत्रात तुमच्या स्थितींना बलवान बनवेल आणि तुमच्या पक्षात परिणाम यायला लागतील. तुमच्या कामाचे कौतुक ही होईल. या संक्रमण काळात तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींचे आरोग्य ही पीडित होऊ शकते परंतु, या संक्रमणाचे चांगले फळ हे असेल की, या काळात तुम्ही काही प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी व्हाल आणि आपल्या प्रयत्नांनी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या आईच्या व्यवहारात काही बदल येऊ शकतात आणि त्यांच्या आरोग्य संबंधी समस्या राहतील आणि आपले घरगुती खर्च ही वाढतील. या काळात तुम्ही कुठला ही वाद करण्यापासून सावध राहिले पाहिजे. जे विशेष रूपात तुमच्या कुटुंबाच्या संबंधित असू शकते कारण, त्यामुळे तुम्हाला दुःख होईल आणि तुम्हाला आतून तुटल्यासारखे वाटेल.
उपाय: प्रत्येक गुरुवारी तुप दान करणे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
काही समस्यांनी तुम्ही चिंतीत असाल तर, समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा
गुरु संक्रमण - वृश्चिक राशि भविष्यवाणी
वृश्चिक राशीतील लोकांसाठी बृहस्पती दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे म्हणून, हे दुसऱ्या भावाचा स्वामी होण्याने वृश्चिक राशीतील लोकांसाठी ही मारक बनते. संक्रमणाच्या ह्या स्थितीमध्ये बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावातून संक्रमण करेल आणि या कारणाने तुम्हाला यात्रेवर सतत जावे लागेल. तुमच्या बऱ्याच यात्रा होतील आणि ही यात्रा मुख्य रूपात कुठल्या तीर्थ स्थळी किंवा आर्थिक परियोजनांनी होऊ शकते. सुरवातीच्या काही यात्रा अनुकूल राहणार नाही आणि तुम्हाला शारीरिक कष्ट आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल परंतु, नंतर स्थिती उत्तम होईल हा संक्रमण काळ तुमच्या दांपत्य जीवनासाठी खूप अनुकूल आणि प्रभावशाली राहील. जर तुमच्या नात्यामध्ये काही तणाव असेल तर, ते ही आत्ता दूर होईल आणि तुमच्या नात्यामध्ये घनिष्टता येईल. तुमच्या भाऊ बहिणींना तुम्ही आर्थिक दृष्ट्या मदत द्याल आणि त्यांची यथा संभव तुम्ही मदत कराल. तुमच्या संतानसाठी बृहस्पतीचे संक्रमण बरेच अनुकूल राहील आणि या वेळेत त्यांना चांगला लाभ मिळेल. जर तुम्ही आत्ता पर्यंत सिंगल आहे आणि कुणावर प्रेम करतात तर, हे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहील आणि तुम्ही आपल्या प्रियतमला विवाहासाठी प्रस्ताव देऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची उत्तम शक्यता असेल.
उपाय: भगवान शंकराचे रुद्राभिषेक करणे तुमच्यासाठी फळदायी राहील.
गुरु संक्रमण - धनु राशि भविष्यवाणी
बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या राशीसाठी खूप महत्वाचे आहे कारण, गुरु हा धनु राशीचा स्वामी ग्रह आहे आणि वर्तमान संक्रमणात तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल. बृहस्पतीच्या दुसऱ्या भावात जाणे तुमच्या कुटुंबात वृद्धी आणि संकेत करते यामुळे कुटुंबात कुणी एका व्यक्तीचे आगमन होऊ शकते. मग तुमच्या कुटुंबात कुणाचा विवाह असो किंवा संतान जन्म असो, कुटुंबात आनंद येईल आणि तुम्ही पूजा पाठ तसेच शुभ कार्य संपन्न कराल. याच्या व्यतिरिक्त कुटुंबात काही शुभ आयोजन होऊ शकते यामुळे लोकांसोबत भेटणे होईल आणि समाजात तुम्हाला उच्च स्थान मिळेल. तुमची कुटुंबात इज्जत वाढेल. या वेळात तुमच्या वाणीमध्ये गंभीरता येईल आणि तुम्ही गोष्टींना विचार करून करणे सुरु कराल यामुळे तुम्ही प्रभावशाली बनाल. तुम्ही आपल्या कुटुंबाला मजबुती द्याल तसेच व्यापार तसेच प्रॉपर्टी पासून उत्तम धन लाभ अर्जित कराल. हे संक्रमण तुमच्या कार्य क्षेत्राला प्रभावित करेल आणि तुमची विचार करण्याची शक्ती आणि तुमचे अंतज्ञान तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात मजबूत बनवेल. तुम्हाला गोड खाण्याची खूप इच्छा होईल यामुळे तुमचे वजन वाढू ही शकते.
उपाय: घरात गुरु बृहस्पती यंत्राची स्थापना करा आणि नियमित याची पूजा करा.
गुरु संक्रमण - मकर राशि भविष्यवाणी
मकर राशीसाठी बृहस्पती तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी असतो आणि आपल्या या संक्रमण काळात ते मकर राशीमध्ये संक्रमण करत आहे.अर्थात तुमच्या प्रथम भावात बृहस्पतीचे संक्रमण होईल, यामुळे तुम्हाला एका गोष्टीचा सर्वात जास्त फायदा होईल, हे तेच की, तुम्हाला सहज ज्ञानाची प्राप्ती होईल आणि तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटसाठी खूप चांगले-चांगले निर्णय घ्याल जे तुमच्या कामी येतील. गुरु बृहस्पतीच्या या संक्रमण प्रभावाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल आणि तुमचे दांपत्य जीवन सुधरेल. जर यात स्थिती बिघडलेली असेल तर, ती आता हळू हळू सुधारण्याकडे जाईल. एकमेकांपासून जवळीकता वाढेल आणि भागीदारीचा विकास होईल. व्यापाराच्या बाबतीत हे संक्रमण तुमच्यासाठी बरेच अनुकूल राहील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मुलांना ही या वेळेत उत्तम परिणाम मिळतील. काही लोकांना संतान रत्नाची प्राप्ती ही होऊ शकते. जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर, बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या शिक्षणात प्रगतीच्या संधी घेऊन येईल आणि तुमची मेहनत तुमच्या कामी येईल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला लांब यात्रेवर जाण्याची रुची वाढेल आणि आध्यत्मिक रूपात तुम्ही बरेच मजबूत बनाल. तुमचा सामाजिक स्तर उत्तम होईल आणि लोक तुमचे कौतुक करतील. तुम्ही समाजात लोकप्रिय बनाल परंतु, तुम्हाला आपला आळस कमी केला पाहिजे कारण, हे तुमच्या अपेक्षेवर पाणी फेरू शकते.
उपाय: आपल्या खिश्यात नेहमी पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवा आणि कपाळावर नेहमी केशराचा टिळा लावा.
गुरु संक्रमण - कुंभ राशि भविष्यवाणी
कुंभ राशीतील जातकांसाठी बृहस्पतीचे संक्रमण बाराव्या भावात होईल. तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी बृहस्पती तुमच्यासाठी मारक ही बनतो. द्वादश भावात बृहस्पतीचे हे संक्रमण तुम्हाला शारीरिक दृष्ट्या त्रास देऊ शकतो कारण, या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि तुम्ही आजारी ही होऊ शकतात. आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली तर स्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. तुमची जमा पुंजी कमी व्हायला लागेल आणि तुमचे खर्च एकएकी वाढेल. तुम्ही परोपकाराच्या कार्यात प्रमाणापेक्षा जास्त आनंद घ्याल. तुम्ही चांगले आणि धार्मिक कार्यात खूप मन खोलून खर्च कराल परंतु, लक्षात ठेवा अधिक खर्च ही तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकतो. या संक्रमण काळात तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबातील स्थिती उत्तम राहील. लोकांमध्ये एकमेकांच्या प्रति प्रेमाची भावना वाढेल. वाद विवाद तसेच कोर्ट कचेरी संबंधित गोष्टींसाठी ही वेळ थोडी कमजोर राहू शकते परंतु, जे लोक कायद्याच्या क्षेत्रात आहे त्यांना हे संक्रमण बरेच अनुकूल परिणाम देईल.
उपाय: गुरुवारी सकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला पाणी वहा. या वेळात पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करू नका.
गुरु संक्रमण - मीन राशि भविष्यवाणी
देव गुरु बृहस्पती मीन राशीचा स्वामी आहे म्हणून, याचे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल. याच्या अतिरिक्त हे तुमच्या कर्म भाव अर्थात दशम भावाचा स्वामी ही आहे आणि आपल्या या संक्रमण काळात तुमच्या एकादश भावात प्रवेश करेल. गुरूच्या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कमाई मध्ये उत्तरोत्तर वाढ होईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची समाजात बुद्धिमान आणि हुशार व्यक्तीं सोबत होण्याची शक्यता असेल आणि त्यांच्या पासून बनणारे संपर्क तुम्हाला भविष्यात खूप लाभ देतील. कुणी खास व्यक्तीचा सल्ला तुमच्या कामी येईल. तुमचा सामाजिक स्तर वाढेल. तुमच्या संतानला ही या संक्रमणाचा चांगला लाभ मिळेल तसेच दांपत्य जीवनात ही हे संक्रमण अनुकूल परिणाम प्रदान करतील. नात्यामध्ये तणाव कमी होईल यामुळे तुम्ही मोकळ्या पणाने श्वास घ्याल. व्यापाराच्या दृष्टिकोनाने ही हे संक्रमण बरेच चांगले राहील आणि जर तुम्ही नोकरी करतात तर, तुमची आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत खूप जमेल यामुळे तुम्हाला फायदे नक्कीच मिळतील. जर तुम्ही आता पर्यंत सिंगल आहे तर, हे संक्रमण प्रेम जीवनाला विवाहात बदलण्याचे संकेत ही देत आहे. अश्यात तुमच्या विवाहाचे योग ही बनू शकतात म्हणून, तुमच्यासाठी संक्रमण बरेच अनुकूल राहणार आहे.
उपाय: गुरुवारच्या दिवशी पुखराज रत्न सोन्याची अंगठी बनवून तर्जनी अंगठीत धारण करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025