जन्माष्टमी 2023 - Janmashtami 2023 In Marathi
श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्री कृष्ण जन्मउत्सव. श्री कृष्ण जन्माष्टमीचा हा पवित्र सण भारतात अधिक उत्साहाने साजरा केला जातो. प्रतिवर्ष भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, भगवान विष्णूने द्वापार युगात भगवान कृष्णाच्या रूपात आपला आठवा अवतार धारण केला होता.
श्री कृष्ण जन्माष्टमी या वर्षी 7 सप्टेंबर, 2023 ला साजरी केली जाईल. आमच्या या विशेष ब्लॉग च्या माध्यमाने आज आम्ही जाणून घेऊ श्री कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त काय राहणार आहे, या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी ला कोणते शुभ योग बनत आहेत. या व्यतिरिक्त श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळू शकतात आणि राशी अनुसार, उपायांची माहिती ही आम्ही तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमाने प्रदान करू.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
श्री कृष्ण जन्माष्टमी 2023 (Krishna Janmashtami 2023)
सर्वात पहिले तिथी विषयी बोलायचे झाले तर, श्री कृष्ण जन्माष्टमी या वर्षी 7 सप्टेंबर 2023 गुरुवारी साजरी केली जाईल अश्यात, भगवान श्री कृष्णाचे आपल्या जीवनात आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी उपवास करू शकतात.
कृष्ण जन्माष्टमी पूजा मुहूर्त
निशीथ पूजा मुहूर्त : 23:56:25 ते 24:42:09 पर्यंत
अवधी: 0 तास 45 मिनिटे
जन्माष्टमी पारणा मुहूर्त : 06:01:46 नंतर 8, सप्टेंबर ला
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
विशेष माहिती: म्हटले जाते की, जेव्हा भगवान श्री कृष्णाचा जन्म भाद्रपद कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता त्या वेळी चंद्राचा उदय होत होता आणि रोहिणी नक्षत्र होते. या वर्षी ही श्री कृष्ण जन्माष्टमी रोहिणी नक्षत्रात साजरी केले जाईल यामुळे खूप शुभ आणि दुर्लभ संयोग मानला जात आहे. ज्योतिषचे जाणकार मानतात की, असे दुर्लभ संयोग बऱ्याच वर्षानंतर येतात अश्यात, या वर्षी शुभ जन्माष्टमी खूप खास राहणार आहे.
श्री कृष्ण जन्माष्टमीचे महत्व
श्री कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी लोक व्रत पूजन करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी व्रत ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख समृद्धी येते, जीवनात रोग, दोष आणि दुश्मनांचा नाश होतो सोबतच, संतान प्राप्तीसाठी हा दिवस खूप शुभ असतो अश्यात, तुम्ही जर संतान प्राप्तीची अपेक्षा ठेवतात तर, या कामने हेतू कृष्ण जन्माष्टमी चा व्रत नक्की ठेवा.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
श्री कृष्ण जन्माष्टमी पूजन सामग्री
म्हटले जर की, काही अश्या पूजेसाठी वस्तू असतात ज्यांना जर भगवान श्री कृष्णाच्या पूजेत शामिल केले नाही तर, लड्डू गोपाला ची उपज अपूर्ण राहते. काय आहेत त्या पूजन सामग्री चला जाणून घेऊया:
बाल गोपालासाठी झोका, भगवान कृष्णाची मूर्ती, लहान बासरी, एक नवीन आभूषण, मुकुट, तुळशीची पाने, चंदन, अक्षदा, लोणी, केशर, लहान इलायची, कलश, हळद, पान, सुपारी, गंगाजल, सिंहासन, अत्तर, शिक्के, सफेद कपडा, लाल कपडा, कुंकू, नारळ, मोळी, लवंग, दिवा, तिळीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा, फुलवात, अगरबत्ती, धूप बत्ती, फळ आणि कपूर, मोरपंख
तर, तुम्ही ही या सर्व पूजन सामग्री ला आपल्या पूजेत शामिल करा आणि लड्डू गोपालाची प्रसन्नता मिळवा.
श्री कृष्ण जन्माष्टमी पूजन विधी
या दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूप म्हणजे लड्डू गोपालाची पूजा केली जाते.
- अशा स्थितीत सकाळी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा.
- बालगोपाला ला विधींने सजवून त्याची पूजा करावी.
- बाल गोपालाचा पाळणा सजवा आणि त्यात त्याला झोका द्या.
- त्यांचा दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा.
- यानंतर त्यांना नवीन कपडे घाला.
- मुकुट आणि बासरी लावा.
- लाडू गोपाला ला चंदन आणि वैजयंती हाराने सजवा.
- तुळशीदल, फळे, मखाणा, लोणी, मिश्री भोग म्हणून अर्पण करा. तसेच मिठाई, सुका मेवा, पंजिरी वगैरे अर्पण करा.
- शेवटी, अगरबत्ती लावा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची आरती करा आणि पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा.
श्री कृष्ण जन्माष्टमीला नक्की खरेदी करा यापैकी कोणती ही वस्तू
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही खाली नमूद केलेल्या वस्तूंपैकी कोणती ही वस्तू खरेदी केल्यास तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल.
- बाल गोपाळांची अष्टधातूची मूर्ती. अष्टधातूच्या मूर्तीमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः वास करतात असे म्हणतात. अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
- लाडू गोपालासाठी पाळणा किंवा झुला. ही खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते विकत घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करू शकता.
- लाडू गोपालासाठी सुंदर पोशाख. तुमची इच्छा असेल तर, तुम्ही कपड्यांसह लाडू गोपालासाठी मोराची पिसे, हार, बासरी खरेदी करून घरी आणू शकता.
- भगवान श्री कृष्ण आणि राधा राणी यांचे सुंदर पेंटिंग जे तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी देखील लावू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे खरेदी करणे खूप शुभ आहे.
श्री कृष्ण जन्माष्टमी व्रत संबंधित महत्वपूर्ण गोष्टी आणि नियम
जर तुम्ही ही जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी काही नियम आणि खबरदारी जाणून घ्या, ज्याचे पालन करून उपवास करण्याचा सल्ला दिला जातो.
- या दिवशी सकाळी लवकर जाऊन आणि स्नान करून व्रत करावे.
- आपल्या क्षमतेनुसार अन्न आणि वस्त्र दान करा.
- सात्विक अन्न खा.
- चुकून ही कोणत्याही प्राण्याला किंवा मुक्या प्राण्याला इजा करू नका.
- चहा-कॉफी पिणे टाळा.
- मांसाहार करू नका.
- तुम्ही दूध आणि दही सेवन करू शकता.
- याशिवाय तुम्हाला हवे असल्यास फळांचे पदार्थ ही घेऊ शकता.
श्री कृष्ण जन्माष्टमीला राशी अनुसार भोग आणि मंत्राने करा लड्डू गोपालाला प्रसन्न
राशी |
भोग |
मंत्र |
मेष राशी |
या दिवशी लाडू गोपाला ला तुपाचा भोग लावा. |
'ॐ कमलनाथाय नमः' |
वृषभ राशी |
भगवान कृष्णाला लोणी चा भोग लावा. |
कृष्ण-अष्टक चा पाठ करा. |
मिथुन राशी |
भगवान कृष्णाला दही चा भोग नक्की लावा. |
'ॐ गोविन्दाय नमः' |
कर्क राशी |
कर्क राशीतील जातक या दिवशी कृष्णाला दूध केशरचा भोग लावा. |
राधाष्टक चा पाठ करा. |
सिंह राशी |
कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी बाल गोपाल ला लोणी मिश्री चा भोग लावा. |
'ॐ कोटि-सूर्य-समप्रभाय नमः' |
कन्या राशी |
लड्डू गोपालला लोणीचा भोग अर्पण करा. |
'ॐ देवकी नंदनाय नमः' |
तुळ राशी |
भगवान कृष्णाला साजूक तुपाचा भोग लावा. |
'ॐ लीला-धराय नमः' |
वृश्चिक राशी |
कृष्णाला लोणी किंवा दही चा भोग अर्पित करा. |
'ॐ वराह नमः' |
धनु राशी |
या दिवशी तुम्ही बालगोपालांना कोणता ही पिवळा पदार्थ किंवा पिवळी मिठाई अर्पण करू शकता. |
'ॐ जगद्गुरुवे नमः' |
मकर राशी |
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लड्डू गोपालाला मिश्री चा भोग लावा. |
'ॐ पूतना-जीविता हराय नमः' |
कुंभ राशी |
भगवान श्री कृष्ण ला बालूशाही चा भोग लावा. |
'ॐ दयानिधाय नमः' |
मीन राशी |
भगवान कृष्णाला बर्फी आणि केसर चा भोग लावा. |
'ॐ यशोदा – वत्सलाय नमः' |
आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहित कडून करून घ्या इच्छेनुसार ऑनलाइन पूजा आणि मिळवा उत्तम परिणाम!
कृष्ण जन्माष्टमीला राशी अनुसार उपायांनी करा बाल-गोपाल ला प्रसन्न
आता आपण पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी राशीनुसार काय उपाय केल्यास तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा आशीर्वाद कायम राहील.
मेष : या दिवशी मेष राशीच्या जातकांनी आपल्या क्षमतेनुसार गहू दान करावा आणि विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करावा.
वृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी गोपी चंदनाचे दान करावे. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल.
मिथुन : मिथुन राशीच्या जातकांनी लहान मुलींना नवीन कपडे दान करावे.
कर्क : कर्क राशीच्या जातकांनी या दिवशी गरिबांना तांदूळ आणि खीर दान करावी.
सिंह : सिंह राशीच्या जातकांनी या दिवशी गुळाचे दान करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
कन्या : कन्या राशीच्या जातकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गरजूंना धान्य दान करावे.
तुळ : तुळ राशीच्या जातकांनी गरजूंना कपडे आणि फळे दान करावीत.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या जातकांनी गरजूंना गहू दान करावा आणि शक्य असल्यास लोकांमध्ये पंजिरी वाटप करावी.
धनु: धनु राशीच्या जातकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन बासरी आणि मोराची पिसे अर्पण करावीत आणि गरीब मुलांना फळे दान करावीत.
मकर : मकर राशीच्या जातकांनी गरजूंना अन्न आणि तीळ दान करावे आणि गीता पठण करावे.
कुंभ : कुंभ राशीच्या जातकांनी भगवान श्रीकृष्णाला वैजयंती फुले किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत.
मीन : मीन राशीच्या जातकांनी या दिवशी मंदिरात जाऊन धार्मिक पुस्तकांचे दान करावे.
कृष्ण जन्माष्टमीच्या पुढील दिवशी का साजरा केला जातो दही-हंडी महोत्सव
कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडी साजरी केली जाते. द्वापार युगापासून हा दिवस साजरा केला जातो, अशी या दिवसाविषयी मान्यता आहे. मुख्यतः दहीहंडीचा हा सण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
या दिवसाविषयी अशी श्रद्धा आहे की, बाल लीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने गोपींच्या मडक्यातील लोणी आणि दही खाल्ले होते म्हणून, हा दिवस दहीहंडी म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अनेक ठिकाणी 'गोपाळ काला' या नावाने ही ओळखला जातो. 2023 सालाबद्दल बोलायचे तर दहीहंडीचा सण गुरुवार, 7 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.
दहीहंडीबद्दलच्या प्रचलित कथेनुसार असे म्हटले जाते की, लहानपणी भगवान श्रीकृष्ण गोपींच्या मडक्यातील आणि हंडी मधून लोणी चोरत असत. अशा वेळी चोरीच्या भीतीने गोपींनी आपल्या घराच्या छतावर दही-लोणी ची भांडी टांगायला सुरुवात केली. पण भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत मानवी श्रुंखला तयार करून हंडी गाठायचे आणि लोणी चोरून खात. तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाचा हा विरंगुळा दहीहंडी उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025