होलिका दहन 2023 - Holika Dahan2023
हिंदू धर्माचे प्रमुख आणि मोठ्या सणांपैकी एक होळी ऐकताच आपण आनंदाने आणि उत्साहाने भरलेले असतो. रंगांचा हा सण आपल्या जीवनात रंग भरण्याचे काम करतो. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारी उडवून मुले रंगतात. लोक एकमेकांना भेटायला खूप दूर जातात. ते ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात. ते लहान मुलांना भेटवस्तू देतात आणि भरपूर होळी खेळतात. भाऊ आणि भावजय, वहिनी अशा नात्यात होळी वेगवेगळ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी घरातील वातावरण खूप आनंदी आणि खेळासारखे राहते. गुजिया, स्वादिष्ट पदार्थ, खीर, पुआ असे विविध प्रकारचे पदार्थ प्रत्येक घरात बनवले जातात. अशा आनंददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक इतर शहरातून आपापल्या घरी जातात आणि होळीचा सण रीतिरिवाजाने साजरा करतात.
भारतातील अवध, मगध, ब्रज, मध्य प्रदेश, राजस्थान, म्हैसूर, गढवाल, कुमाऊं, वृंदावन इत्यादी सर्व प्रदेशात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी लट्ठमार होळी खेळली जाते तर काही ठिकाणी फुलांची होळी खेळली जाते. काही ठिकाणी गुलाल आणि रंगांची होळी साजरी केली जाते तर, काही ठिकाणी घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे आयोजन केले जाते. होळी हे एकोप्याचे आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. त्यामुळेच या उत्सवाची तयारी ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. चला तर मग जाणून घेऊया की, होळी 2023 आपल्यासाठी धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून किती खास आहे. या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणते करू नये.
होलिका दहन विषयी मनात आहे काही प्रश्न सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
होळी 2023: तिथी आणि वेळ
फाल्गुन मास ची पौर्णिमा तिथीची सुरवात 6 मार्च, 2023 ला संध्याकाळी 04 वाजून 20 मिनिटांनी होईल तसेच, पौर्णिमा तिथीची समाप्ती 07 मार्च, 2023 ला संध्याकाळी 06 वाजून 13 मिनिटांनी होईल. जर होलिका दहनाच्या मुहूर्ताची गोष्ट केली असता याची सुरवात 07 मार्च, 2023 ला संध्याकाळी 06 वाजून 24 मिनिटांनी सुरु होऊन रात्री 08 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहील. 08 मार्च, 2023 बुधवारी रंगाची होळी खेळली जाईल ज्याला धूलिवंदन ही म्हणतात.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
होलिका दहन आणि शास्त्रांच्या अनुसार याचे नियम
फाल्गुन मास च्या अष्टमी तिथीपासून पौर्णिमा तिथी पर्यंत होलाष्टक मान्य असते. या काळात कोणत्या ही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. होलिका दहन म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी पेटवली जाते. यामध्ये दोन विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यांचा उल्लेख शास्त्रांमध्ये करण्यात आला आहे. होलिका दहनाच्या दिवशी भद्रा नसावी कारण, या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पौर्णिमा ही प्रदोषकाल व्यापिनी असावी म्हणजेच, होलिका दहनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर तीन मुहूर्तांमध्ये पौर्णिमा आली पाहिजे.
भद्रा पुंछा: 01:02 ते 02:19 पर्यंत
भद्रा मुखा: 02:19 ते 04:28 पर्यंत
होळी आणि भगवान भोलेनाथाचा संबंध
होळीचा सण ही कामदेवाच्या वधाशी जोडला जातो. वास्तविक माता पार्वतीला भगवान शिवाशी विवाह करायचा होता परंतु, भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते. त्याला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी कामदेवाने फुलांचा बाण सोडला. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाचा नाश केला. त्यानंतर कामदेवच्या पत्नीने भगवान शंकराकडे दयेची याचना केली आणि त्याला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. कामदेवाचा वध केल्यावर भगवान शिवाचा राग शांत झाला, त्यानंतर त्यांनी कामदेवाला जिवंत केले. म्हणूनच कामदेवाच्या अस्थिकलशाचे प्रतीक म्हणून होलिका दहन साजरे केले जाते आणि त्यांच्या अस्तित्वाच्या स्मरणार्थ होळीचा सण साजरा केला जातो.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
होलिका दहनाचा प्राचीन इतिहास
विंध्याचल पर्वताजवळील रामगढमध्ये होलिका दहनाचा संपूर्ण उल्लेख इ.स.पू. 1 मधील 300 वर्षे जुन्या शिलालेखात आढळतो. त्याच्या मान्यतेनुसार, भगवान विष्णूने श्रीकृष्णाच्या अवतारात पुतना नावाच्या राक्षसीचा वध केला. याच आनंदात ब्रजच्या गोपींनी श्रीकृष्णासोबत होळी खेळली.
होलिका दहन वेळी करा हे अचूक ज्योतीषीय उपाय
अॅस्ट्रोसेज च्या विद्वान ज्योतिषीणी तुमच्यासाठी काही ज्योतिषीय उपाय सुचवले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही आपल्या जीवनाला सुखद आणि आनंदी बनवू शकतात.
विवाहित जोडप्यांसाठी उपाय
होलिका दहनाच्या दिवशी उत्तर दिशेला तोंड करून बसावे. बसण्यासाठी पाट/चौकी/आसन वापरा. नंतर पांढरे वस्त्र पसरून त्यावर हरभरा, डाळ, तांदूळ, गहू, काळे उडीद आणि तीळ टाकून नवग्रह बनवा. पूजेत ही केशर वापरू शकता. यानंतर दिवा लावा आणि महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान करा आणि त्यांची स्तुती वाचा. वैवाहिक जीवनातील वाद कमी करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो.
विवाहित जीवन आनंदी बनवण्यासाठी उपाय
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी कोरड्या नारळात साखर भरावी. यानंतर, पुरुष ते हातात घेतो, पत्नीच्या डोक्यावर 7 वेळा मारतो आणि होलिकेच्या अग्नीत टाकतो. यानंतर तुम्ही जोडीने होलिकेची प्रदक्षिणा 7 वेळा करावी.
आर्थिक तंगीसाठी उपाय
जर तुम्हाला पैशाची समस्या असेल तर, होलिका दहनावर करा हा खास उपाय. विवाहित जोडपे चंद्राच्या प्रकाशात हातात मखणा, खजूर आणि तुपाचे दिवे घेऊन उभे असतात. यानंतर चंद्रदेवांना दूध अर्पण करून आरती करावी.
कर्जापासून मुक्तीसाठी उपाय
कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहन आणि रंगांच्या होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी. असे केल्याने उत्पन्नाचे मार्ग खुले होतील आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल.
होळी 2023: राशी अनुसार उपाय
मेष
मेष राशीच्या जातकांनी आपल्या जीवनातून नकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी तांब्याचे भांडे दान करावे. यासोबतच मसूर, केशर, लाल वस्त्र, चमेलीचे तेल दान करू शकता.
वृषभ
वृषभ राशीचे लोक लहान मुलांना पुस्तके आणि स्टेशनरी वस्तू दान करू शकतात. याशिवाय गरजू लोकांना गूळ, गहू आणि हरभरा डाळ दान करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी गाईला हिरवा चारा खायला द्यावा. याशिवाय गरजू लोकांना भाजीपाला, साखर किंवा जोडे ही दान करता येतात.
कर्क
तुमच्या घरातील कोणते ही जुने कपडे, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेट किंवा दागिने जे तुमच्या कामाचे नाहीत, ते गरिबांना दान करा.
सिंह
सिंह राशीच्या जातकांसाठी गाईच्या दुधापासून बनवलेले तूप, मसूर, पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे दान करणे फायदेशीर ठरेल.
कन्या
लहान मुलांना बेसन किंवा बुंदीचे लाडू दान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या सोबतच तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू देऊन आशीर्वाद ही घेऊ शकतात.
तुळ
तुळ राशीच्या जातकांनी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. जुन्या मेकअपच्या वस्तू, रिकाम्या परफ्यूमच्या बाटल्या, आर्टिफिशियल ज्वेलरी इत्यादी तुमच्या घरातून काढून टाका.
वृश्चिक
होळीच्या दिवशी भगव्या रंगाचे कपडे गरजू लोकांना दान करा. याशिवाय हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचे पठण करा.
धनु
धनु राशीच्या जातकांनी चंद्र देवाशी संबंधित वस्तू जसे की, चांदी, मोती, तांदूळ आणि चंदन दान करावे. त्याच्या प्रभावाने तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर होईल.
मकर
जुने कपडे, बूट आणि काळी मसूर दान करा. याशिवाय शनिदेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करावी.
कुंभ
हिरव्या भाज्या आणि फळे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. याशिवाय तुम्ही गरीब लोकांना गडद निळे कपडे किंवा ब्लँकेट दान करू शकता. शनी बीज मंत्र ॐ शं शनैश्चराय नमः चा जप करणे ही तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
मीन
होळीच्या दिवशी पिवळी हरभरा दाळ दान करा. याशिवाय तुम्ही गरिबांना पिवळ्या रंगाचे कपडे दान करू शकता. शक्य असल्यास सोन्याच्या वस्तू दान करा.
चुकून ही करू नका हे काम!
धुलेंडी म्हणजे रंगाच्या होळीच्या 8 दिवस आधी होलाष्टक लागते. हा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. या दरम्यान कोणते ही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. होळाष्टकाचा काळ अशुभ मानण्यामागे ज्योतिषशास्त्राचा तर्क अंतर्भूत आहे. मान्यतेनुसार, या काळात सूर्यमालेतील सर्व ग्रह प्रक्षुब्ध होतात आणि त्यामुळे या काळात केलेले कोणते ही कार्य शुभ फल देत नाही. या दिवसात कोणती कामे निषिद्ध आहेत हे एकदा जाणून घ्या.
-
या दिवसात विवाह, मांगलिक कार्य यासारखी शुभ कार्ये वर्ज्य आहेत.
-
मुंडन, उपनयन ही कामे ही या 8 दिवसात करू नयेत.
-
तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या 8 दिवसात असे करू नका.
-
नवीन घर खरेदी करणे किंवा नवीन घरातील गृहप्रवेश करणे या दिवसात करू नये.
-
या 8 दिवसात हवन, यज्ञ यांसारखी धार्मिक कार्ये ही केली जात नाहीत.
होळी 2023: या 4 राशींची होईल बल्ले-बल्ले!
मेष
मेष राशीतील जातकांना उत्तम धन लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही जे ही काम करण्याची सुरवात कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला नोकरीसाठी नवीन प्रस्ताव ही मिळू शकतात.
मिथुन
तुमच्या जीवनात आर्थिक सुधार येण्याची शक्यता आहे. नोकरीपेशा जातकांना आपल्या सिनिअर्स ची भरपूर साथ प्राप्त होईल. या व्यतिरिक्त, तुम्हाला नोकरीसाठी अधिक नवीन संधी ही प्राप्त होईल.
सिंह
सिंह राशीतील जातकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. जीवांसाठी सोबत तुमचे नाते उत्तम होतील. तुम्ही जर व्यवसाय करत आहे तर, हा काळ तुमच्यासाठी खूप फळदायी सिद्ध होऊ शकतो.
धनु
या काळात तुम्हाला कार्यस्थळी आपल्या साथी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरपूर सहयोग मिळेल. लोक तुमचे काम आणि प्रतिभेने प्रभावित होतील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या ही मिळू शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025