अंक ज्योतिष - Numerology In Marathi (9 एप्रिल - 15 एप्रिल, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (9 एप्रिल - 15 एप्रिल, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
मूलांक 1 च्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. अशा परिस्थितीत, जीवनात कोणते ही पाऊल उचलण्यासाठी किंवा कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा आठवडा योग्य आहे. या मूलांकातील जातक जे संघाचे लीडर आहेत किंवा गरीब आणि कामगार वर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल.
प्रेम जीवन: जर आपण मूलांक 1 च्या जातकांच्या प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, हा सप्ताह फारसा फलदायी ठरणार नाही. अशा स्थितीत ज्यांना एखाद्याला आवडते आणि आपल्या भावना त्यांच्या समोर मांडण्याचा विचार करत असतील, त्यांनी सध्या तरी तसे करणे टाळावे. तथापि, या मूलांकाच्या विवाहित जातकांना वैवाहिक जीवनात कोणत्या ही मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु, आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि आपल्या जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, तुमच्या जोडीदाराशी अनावश्यक वाद घालणे टाळा.
शिक्षण: मूलांक 1 मधील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. या काळात तुम्ही पूर्ण उत्साहाने अभ्यास करताना दिसतील, विशेषत: जे विद्यार्थी संवाद, माध्यम आणि मनोरंजन इत्यादींशी संबंधित आहेत. तुमची योग्यता सिद्ध करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने, हा सप्ताह या मूलांकाच्या जातकांसाठी चांगला राहील. या दरम्यान तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि प्रत्येक पावलावर नशीब तुमची साथ देईल. तथापि, आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न आणि कठोर परिश्रम करत राहणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला कामावर किंवा तुमच्या प्रोफाइलच्या संबंधात काही सकारात्मक बदल दिसू शकतात.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीकोनातून, मूलांक 1 च्या जातकांना या सप्ताहात आरोग्याशी संबंधित कोणत्या ही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. पण तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवावे लागेल कारण, तुम्हाला घसा खवखवण्याची किंवा वजन वाढण्याची तक्रार असू शकते.
उपाय: देवी दुर्गेची पूजा करा आणि त्यांना लाल फूल अर्पित करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांसाठी हा सप्ताह भावनिकदृष्टया चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. यावेळी तुम्ही खूप भावूक असाल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेणे आव्हानात्मक वाटू शकते. ही परिस्थिती या जातकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते म्हणून, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: मूलांक 2 च्या जातकांना मूड स्विंगमुळे त्यांच्या नातेसंबंधात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलले पाहिजे जेणेकरून, तुमच्या दोघांमध्ये कोणता ही गैरसमज निर्माण होऊ नये परंतु, जर तुम्हाला जास्त अस्वस्थता आणि दबाव वाटत असेल तर, तुम्हाला तुमच्या जोडीदाराची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून तुम्ही या समस्यांमधून बाहेर पडू शकाल आणि असे केल्याने तुमच्या जोडीदारासोबतचे नाते ही मजबूत होईल.
शिक्षण: मूलांक 2 च्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो कारण, या काळात तुमचे लक्ष इकडे-तिकडे फिरू शकते. परिणामी, तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला तणाव आणि दबाव जाणवू शकतो. तसेच, या आठवड्यात तुम्हाला शिक्षकांचे सहकार्य न मिळण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 2 च्या जातकांसाठी फलदायी राहील. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटणार नाही, ज्यामुळे तुम्ही तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करू शकाल. याचा परिणाम म्हणून, वरिष्ठ आणि अधिकारी तुमची दखल घेतील आणि प्रशंसा करतील. तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर, तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील परंतु, ज्या लोकांचा व्यवसाय संपत्तीशी संबंधित आहे, त्यांना या आठवड्यात चांगले व्यवहार होतील.
आरोग्य: आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, मूलांक 2 च्या जातकांना या सप्ताहात भावनिक चढ-उतारांमुळे ऊर्जेची कमतरता जाणवू शकते म्हणून, विशेषतः तुम्ही गाडी चालवत असताना या सप्ताहात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उपाय: आईला गुळाची मिठाई अर्पण करावी.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 चे जातक जे ध्यान, अध्यात्म आणि गूढ शास्त्राकडे झुकलेले आहेत ते या सप्ताहात त्यांचा बहुतेक वेळ आणि शक्ती धार्मिक कार्यात घालवताना दिसतील. दुसरीकडे, या मूलांकाचे सामान्य लोक देखील उर्जेने परिपूर्ण असतील परंतु, त्यांची ऊर्जा कोठे वापरायची याबद्दल ते थोडे गोंधळलेले दिसू शकतात.
प्रेम जीवन: मूलांक 3 च्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल आणि सहकार्य करेल. परिणामी, तुमच्या नात्यात आनंद राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते ही मजबूत होईल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर, तुम्ही तुमच्या नात्याला पुढच्या स्तरावर नेऊन गाठ बांधू शकतात.
शिक्षण: मूलांक 3 च्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे फळ मिळेल. तथापि, सप्ताहाचा पहिला भाग दुसर्या भागापेक्षा अधिक अनुकूल असेल कारण, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आणि दबाव कमी असेल.
व्यावसायिक जीवन: प्रशिक्षक, शारीरिक प्रशिक्षक, योग गुरु, क्रीडा मार्गदर्शक, सैन्य किंवा पोलिस प्रशिक्षक इत्यादी मूलांक 3 च्या जातकांसाठी हा सप्ताह चांगला राहील. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी पाहायला मिळेल. या सोबतच या सप्ताहात तुम्हाला चांगला नफा होण्याची ही शक्यता आहे.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, या सप्ताहात तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. तथापि, तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कारण, उच्च ऊर्जा पातळी तुम्हाला रक्तदाब आणि मायग्रेनशी संबंधित समस्यांनी त्रास देऊ शकते.
उपाय: हनुमानाची पूजा करा आणि त्यांना बुंदीचा प्रसाद चढवा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 च्या जातकांसाठी हा सप्ताह फारसा खास नसण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही राग, तणाव आणि अहंकाराने भरलेले दिसू शकता ज्यामुळे तुमच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या लोकांशी वाद किंवा मतभेदांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाच्या बाबतीत, मूलांक 4 च्या जातकांना त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी काही प्रकारचे वाद-विवादाला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराबाबत खूप पझेसिव्ह असू शकता किंवा तुमच्या जोडीदारासोबत कठोर शब्द वापरल्याने तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराशी बोलताना तुमची वागणूक नम्र ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षण: या सप्ताहात मूलांक 4 च्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे आव्हानात्मक वाटू शकते कारण, त्यांना त्यांचा आत्मविश्वास टिकवणे कठीण जाईल म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपण कठोर परिश्रम करत राहा आणि भविष्यात सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी प्रयत्न करा.
व्यावसायिक जीवन: मूलांक 4 चे जातक या सप्ताहात स्वाभिमानी राहतील. तथापि, कधी-कधी त्याच्या व्यक्तिमत्त्वात अहंकाराची झलक दिसून येते, ज्यामुळे तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीत, सावध राहून सर्व प्रकारच्या टीकेला सकारात्मकतेने घ्या अन्यथा, तुमचा अभिमान वाढल्याने तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. आयटी क्षेत्रात अभियंता म्हणून काम करणाऱ्या जातकांसाठी हा सप्ताह चांगला राहील.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 4 च्या जातकांसाठी फारसा अनुकूल नाही. या काळात तुम्हाला रक्तसंसर्ग किंवा स्नायू दुखणे या सारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि संपूर्ण उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करा. तसेच, व्यायाम करताना किंवा रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी लागेल कारण दुखापत होण्याची शक्यता आहे.
उपाय: चरित्र उत्तम ठेवा आणि खोटे बोलणे टाळा.
आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून इच्छेनुसार ऑनलाइन पूजा करा आणि मिळवा उत्तम परिणाम!
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 5 चे जातक त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमतेच्या आणि कठोर परिश्रमाच्या आधारावर गोष्टी व्यवस्थितपणे व्यवस्थित करू शकतील. परिणामी, कामात तुमची कामगिरी चांगली राहील. या काळात तुम्ही स्पर्धात्मक उर्जेने परिपूर्ण असाल जे तुम्हाला तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर विजय मिळवण्यास मदत करेल.
प्रेम जीवन: मूलांक 5 च्या अविवाहितांना या आठवड्यात विवाहासाठी एक आदर्श जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे मनमोहक व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीशी उर्जेने बोलत असताना आवाज वाढवणे टाळा अन्यथा, इतरांचा गैरसमज होऊ शकतो.
शिक्षण: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मूलांक 5 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. एवढेच नाही तर, हे विद्यार्थी डिस्टिंक्शनने परीक्षा उत्तीर्ण होतील. या कालावधीत विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील, विशेषत: जनसंवाद, लेखन आणि कोणत्या ही भाषेचा अभ्यासक्रम इ.
व्यावसायिक जीवन: मूलांक 5 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर, जे क्रीडा पत्रकार, फिटनेस प्रभावशाली, मीडिया व्यक्ती, गेमर, व्यावसायिक किंवा फिटनेस आणि स्पोर्ट्स गॅझेटचे डीलर आहेत किंवा ज्यांना त्यांचा विस्तार करायचा आहे त्यांच्यासाठी हा सप्ताह चांगला असेल. व्यवसायाचा विस्तार करू इच्छित आहात किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधत आहात? या काळात तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील.
आरोग्य: मूलांक 5 च्या जातकांना या सप्ताहात त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवावे लागेल आणि तुम्हाला नियमितपणे ध्यान आणि व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला जातो.
उपाय: गाईला हिरव्या पालेभाज्या खायला द्या.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक या सप्ताहात त्यांची स्वप्ने, इच्छा आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी समर्पित असतील म्हणून, तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्यासाठी सकारात्मकतेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, यश मिळविण्यासाठी तुम्हाला कोणत्या ही प्रकारचा शॉर्टकट घेणे टाळावे लागेल कारण, ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते.
प्रेम जीवन: मूलांक 6 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले दिसाल आणि अशा परिस्थितीत जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सप्ताह चांगला ठरेल. तथापि, या मूलांकाचे विवाहित त्यांच्या भागीदारांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालू शकतात परंतु, याचा तुमच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होणार नाही, उलट तुमचे वैवाहिक जीवन सुधारेल.
शिक्षण: आठवड्याच्या सुरुवातीला मूलांक 6 चे जातक अभ्यासाबाबत काहीसे चिंतेत दिसू शकतात. परिणामी, तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते कारण, तुमचे लक्ष इकडे-तिकडे फिरू शकते परंतु, सर्व चढ-उतारानंतर, सप्ताहाच्या शेवटी तुमचा अभ्यास पुन्हा रुळावर येईल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 6 च्या जातकांना सल्ला दिला जातो की, त्यांनी या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत आणि त्यांचे लक्ष व्यावसायिक जीवनाच्या विकासावर केंद्रित करावे. तुमच्याकडे प्रगती साधण्यासाठी नवीन कल्पना असतील आणि या वेळी तुम्ही नवीन धोरणे तयार करताना दिसतील परंतु, त्यांची अंमलबजावणी करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
आरोग्य: मूलांक 6 च्या जातकांना, विशेषत: महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि वैयक्तिक स्वच्छतेची देखील काळजी घ्यावी लागेल. तसेच, महिलांना हार्मोन्स आणि रजोनिवृत्तीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उपाय: नियमितपणे अत्तराचा वापर करा, विशेषत: चंदनाचा सुगंध असलेले अत्तर, कारण असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 च्या जातकांना या सप्ताहात त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे लागेल. ही शक्यता आहे की, तुम्ही इतरांशी बोलताना थोडे आक्रमक असाल आणि तुमच्या मतांबद्दल अगदी स्पष्ट असाल ज्यामुळे भविष्यात मतभेद आणि विवाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमची उर्जा नियंत्रणात ठेवण्याचा आणि इतरांशी वाद घालण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: मूलांक 7 च्या जातकांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल परंतु, तुम्हाला आक्रमक होण्यापासून आणि वादात पडणे टाळावे लागेल अन्यथा, तुम्हाला नातेसंबंधांमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
शिक्षण: मूलांक 7 चे विद्यार्थी जे पोलीस, नौदल, लष्कर किंवा हवाई दलात भरती होण्यासाठी परीक्षेची तयारी करत आहेत तर, या सप्ताहात तुम्ही परीक्षांची चांगली तयारी करू शकाल. तसेच, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणत्या ही क्षेत्रात शिकणाऱ्यांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील.
व्यावसायिक जीवन: मूलांक 7 चे जातक या सप्ताहात वचनबद्धतेने क्षेत्रात काम करताना दिसतील तसेच, भूतकाळात केलेल्या कठोर परिश्रमांबद्दल तुमचे कौतुक होईल आणि परिणामी, तुमची व्यावसायिक कारकीर्द देखील वाढीचा मार्ग मोकळा करेल.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 7 च्या जातकांसाठी फलदायी राहील. या काळात तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या ही मजबूत दिसाल. तुम्हाला पौष्टिक आहार घेण्याचा आणि फिटनेस राखण्यासाठी नियमितपणे ध्यान आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: रविवारी काल भैरवाची पूजा करावी.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांना हा सप्ताह थोडा कठीण वाटू शकतो कारण, या काळात तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळविण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत आणि शक्ती लागेल. तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला सर्वांच्या नजरेत आणू शकते, सर्वसाधारणपणे तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात येणे आवडत नाही. तथापि, निश्चित मुदती लक्षात घेऊन काम करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. पण हे लोक त्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर आव्हानांवर मात करू शकतील.
प्रेम जीवन: मूलांक 8 च्या लोकांचे प्रेम जीवन या सप्ताहात तुमच्या हातात असेल. तुमचे प्रेम जीवन पूर्णपणे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्या प्रकारची वृत्ती अंगीकारता यावर अवलंबून असते परंतु, विवाहित जातकांना त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शिक्षण: मूलांक 8 चे जातक या सप्ताहात शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक पावले उचलू शकतात, जेणेकरून, ते त्यांचा अभ्यास व्यावसायिकपणे करू शकतील. विशेषत: जे विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, ते या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि भविष्यात त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 8 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, हा सप्ताह थोडा आव्हानात्मक असेल. या दरम्यान कामावर वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. तथापि, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण, तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर या समस्यांमधून बाहेर पडू शकाल.
आरोग्य: मूलांक 8 च्या जातकांना त्यांच्या आरोग्याप्रती दुर्लक्षित राहणे टाळावे लागेल अन्यथा, तुम्हाला आरोग्याच्या समस्यांनी घेरले जाऊ शकते म्हणून, तुम्हाला निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा आणि त्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, आरोग्याशी संबंधित समस्या गांभीर्याने घ्या.
उपाय: मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींना चोला अर्पण करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. या काळात तुम्ही उर्जा आणि उत्साहाने तुमचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाल. दुसरीकडे, तुम्ही इतर लोकांवर थोडे आक्रमक आणि दबंग दिसू शकता आणि यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत या लोकांना कोणाशी ही संवाद साधताना त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवावे लागते.
प्रेम जीवन: जर आपण मूलांक 9 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोललो तर, हा सप्ताह फलदायी ठरेल किंवा या काळात तुम्हाला नात्यात कोणत्या ही प्रकारची समस्या येणार नाही. पण तुमची आक्रमक वृत्ती आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याची सवय तुमच्या त्रासात वाढ करू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचा राग आणि अहंकार नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा, तुमच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व परिस्थितीमुळे विशेषतः वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
शिक्षण: मूलांक 9 चे विद्यार्थी जे पोलीस किंवा संरक्षण दलात सामील होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांची तयारी या सप्ताहात जोरात सुरू होईल. तुम्ही कोणत्या ही प्रकारच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असाल तर, तुम्हाला त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन: मूलांक 9 च्या जातकांसाठी हा सप्ताह चांगला असेल जे अभियंते, सर्जन, पोलिस किंवा सैन्याशी संबंधित आहेत. या काळात तुम्ही उत्साही असाल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात गतिशीलता दिसून येईल ज्यामुळे इतर लोक तुमच्यावर लवकरच प्रभावित होतील. तसेच, या काळात तुम्हाला प्रसिद्धी सोबतच आर्थिक लाभ ही मिळेल.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीकोनातून, या सप्ताहात मूलांक 9 चे जातक उत्साही आणि उर्जेने परिपूर्ण असतील. तथापि, उच्च ऊर्जा पातळी तुम्हाला आवेगपूर्ण बनवू शकते आणि चुकीचे निर्णय घेऊ शकते म्हणून, तुम्हाला उर्जा पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
उपाय: रोज 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025