अंक ज्योतिष - Numerology In Marathi (18 जून - 24 जून, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (18 जून - 24 जून, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 1 चे जातक दृढता आणि सुहासाने भरलेले राहतील याच्या परिणामस्वरूप, तुम्ही कठीण परिस्थितींचा सामना करण्याच्या स्थितीत असाल. जे लोक मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन च्या क्षेत्राने जोडलेले आहे ते या सप्ताहात उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी होतील आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी राहतील. तुम्ही आपल्यासाठी उच्च मूल्य किंवा मानक स्थापित कराल. या काळात तुम्ही करिअरच्या क्षेत्रात कुठल्या ही विशेष मार्गावर चालणे पसंत करू शकतात.
प्रेम जीवन: प्रेम संबंधाच्या दृष्टीने पाहिल्यास, हा सप्ताह तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. या काळात तुम्हा दोघांमध्ये उत्तम ताळमेळ दिसेल. या कारणाने तुम्ही आपल्या पार्टनर सोबत आनंदाचे क्षण घालवाल. सोबतच, तुम्ही दोघे कुठे बाहेर फिरायला जाऊ शकतात आणि ही यात्रा तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल. या सप्ताहात तुम्ही अधिकात अधिक जबाबदारी आपल्यावर घ्याल आणि सोबतच, जुन्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी व्हाल. खास गोष्ट ही आहे की, तुम्ही आपल्या जीवनसाथी ला अधिक महत्व द्याल आणि तुम्हा दोघांचे नाते दुसऱ्यांसाठी एक उदाहरण बनेल.
शिक्षण: शिक्षणाची गोष्ट केली असता हा सप्ताह मूलांक 1 च्या जातकांसाठी उत्तम परिणाम घेऊन येणारा आहे. तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात बरेच सकारात्मक पाऊल उचलण्यात यशस्वी व्हाल. ज्या विद्यार्थ्यांनी या सप्ताहात स्पर्धा परीक्षेत हिस्सा घेतलेला आहे ते ही उत्तम गुण मिळवण्यात यशस्वी राहतील आणि आपल्या साथींपेक्षा पुढे जाण्यात सक्षम होतील.
व्यावसायिक जीवन: नोकरीपेशा जातक कार्य क्षेत्रात उत्तम प्रदर्शन घेतील आणि जे लोक पब्लिक सेक्टर ने जोडलेले आहे त्यांच्यासाठी जूनचा हा सप्ताह उत्तान राहणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत आहे तर, तुम्हाला आउटसोर्स डीलिंगने धन लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच, तुम्ही व्यापारात कुठली नवीन भागीदारी करू शकतात जे तुम्हाला अपेक्षेपेक्षा बराच फायदा देईल.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील. तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल आणि याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसेल सोबतच, जर तुम्ही नियमित रूपात व्यायाम आणि योग कराल तर, हे तुमच्यासाठी अधिक लाभदायक सिद्ध होईल.
उपाय: नियमित 21 वेळा “ॐ भास्कराय नमः” मंत्राचा जप करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 चे जातक महत्वाचे निर्णय घेतांना भ्रमित होऊ शकतात आणि हे तुमच्या विकासात बाधा निर्माण करू शकते. उत्तम परिणामांसाठी तुम्हाला योजना बनवून चालावे लागेल सोबतच, तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की, या काळात लांब दूरच्या यात्रा करू नका अथवा, तुमच्यासाठी हे चिंतेचे आणि फलदायी नसल्याचे सिद्ध होत आहे.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाच्या दृष्टीने, जून चा हा सप्ताह तुमच्यासाठी आव्हानात्मक सिद्ध होऊ शकतो कारण, जीवनसाथी सोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे अश्यात, आपल्या पार्टनर सोबत नाते उत्तम बनवण्यासाठी एक उत्तम ताळमेळ स्थापित करण्याची आवश्यकता असेल सोबतच, या वेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत तीर्थ यात्रेवर ही जाऊ शकतात यामुळे तुम्हाला संतृष्टी वाटेल. एकूणच, प्रेम संबंधाच्या बाबतीत हा सप्ताह तुमच्यासाठी अधिक अनुकूल म्हणता येणार नाही.
शिक्षण: मूलांक 2 च्या जातकांना या सप्ताहात शिक्षणात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण, या काळात तुम्हाला एकाग्रतेमध्ये कमी वाटेल. अश्यात, तुम्हाला तुमच्या शिक्षणावर अधिक लक्ष देण्याची आणि योजना बनवून चालण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच, तार्किक होऊन शिक्षण करणे तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल तेव्हाच तुमच्या साथींमध्ये तुमची जागा बनवण्यात यशस्वी असाल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 2 च्या नोकरीपेशा जातकांना या सप्ताहात काही कमतरतेचा सामना करावा लागू शकतो आणि या कमतरता तुमच्या करिअर मध्ये प्रगती करण्यात बाधा निर्माण करू शकते म्हणून, पुढे जाण्यासाठी तुम्हाला अधिकात अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल म्हणजे तुम्ही आपल्या सहयोगींपेक्षा पुढे जाण्यात सक्षम होऊ शकतात. जर तुमचा स्वतःचा व्यापार आहे तर, या काळात प्रतिद्वंदीसोबत चांगला मुकाबला होऊ शकतो यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुम्हाला खोकला चिंतीत करू शकतो. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला गुढगा आणि झोपेच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
उपाय: नियमित 20 वेळा 'ॐ चन्द्राय नम:' चा जप करा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
लांक 3 चे जातक या सप्ताहात सहासिक निर्णय घेतांना दिसतील. जे तुमच्या फायद्यासाठी सिद्ध होतील. तुम्ही या काळात आत्मविश्वासाने भरलेले राहाल आणि या सोबतच, तुम्ही आत्मसंतृष्ट ही असाल. तुमचा कल अध्यात्मिकतेकडे अधिक असेल. आत्म प्रेरणा तो गुण आहे ज्याच्या बळावर तुम्ही समाजात मान सन्मान मिळवण्यात सक्षम असाल.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेम सोबत रोमांस करतांना दिसाल आणि तुम्ही आपल्या मनातील गोष्ट आपल्या प्रिय ला सांगाल. या सोबतच, तुम्ही दोघे काही कौटुंबिक समारोहाच्या प्लॅनींग मध्ये ही व्यस्त राहू शकतात. हा कार्यक्रम तुमच्या जीवनात ही सकारात्मक बदल आणण्याचे कार्य करेल आणि तुम्ही आपल्या पार्टनर च्या अधिक जवळ याल.
शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टीने, पाहिल्यास हा सप्ताह जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहणार आहे. या सप्ताहात तुम्ही प्रोफेशनलरित्या आपल्या शिक्षणात पुढे जाण्यात यशस्वी असाल. मॅनेजमेंट आणि कॉमर्स सारख्या विषयाचे अध्ययन करणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. या विषयांनी तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही सर्व निर्णय योग्य प्रकारे घेण्यात ही सक्षम असाल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 3 च्या जातकांना या सप्ताहात नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील आणि यामुळे तुम्ही बरेच उत्साहित असाल सोबतच, तुम्ही आपल्या कार्यस्थळी पूर्ण कौशल्याने कार्य करण्यात यशस्वी व्हाल. जर तुमचा स्वतःचा व्यापार आहे तर, तुम्ही एक नवीन व्यवसाय खोलू शकतात. जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही आपल्या प्रतिद्वंदीना कठीण आव्हाने देण्यात सक्षम असाल.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही उत्साह आणि ऊर्जेने भरलेले असाल. या उत्साहाच्या कारणाने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील.
उपाय: नियमित 21 वेळा “ॐ नमः शिवाय” चा जप करा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 चे जातक या सप्ताहात असुरक्षेच्या भावनेने ग्रस्त होऊ शकतात. या कारणाने तुम्ही या सप्ताहात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात ही असमर्थ होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त, या काळात तुम्हाला काही लांब दूरची यात्रा करण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण, असे होऊ शकते की, तुमची यात्रा यशस्वी होणार नाही. या सप्ताहात तुम्हाला काही मोठे निर्णय घेण्यासाठी आपल्या मोठ्यांचा सल्ला घेतला पाहिजे.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाची गोष्ट केली असता या सप्ताहात विनाकारण गैरसमज आणि अहंकाराच्या कारणाने जीवनसाथी सोबत वाद किंवा विवाद होण्याची शक्यता आहे. अश्यात, आपल्या प्रेम संबंधांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही दोघे परस्पर ताळमेळ स्थापित कारण्याची आवश्यकता असेल.
शिक्षण: या सप्ताहात एकाग्रतेच्या अभावामुळे तुमचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. या काळात तुम्हाला काही नवीन प्रकल्प मिळू शकतात आणि तुम्ही त्यात व्यस्त राहू शकता. जूनच्या सप्ताहात अभ्यासात काही अडथळ्यांमुळे तुम्हाला चांगली कामगिरी करता येणार नाही.
व्यावसायिक जीवन: ही शक्यता आहे की, या सप्ताहात तुम्हाला कठोर परिश्रम करून ही प्रशंसा मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही नोकरीमध्ये असमाधानी असू शकता आणि तणावाखाली येऊ शकता. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या जातकांना चांगला सौदा मिळण्यात अडचण येऊ शकते आणि त्याच वेळी व्यवसायातील भागीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर, ते तुमच्यासाठी अनुकूल नसण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तुम्ही डोके, पाय आणि खांदे दुखण्याची तक्रार करू शकता, म्हणून तुम्हाला वेळेवर खाण्याचा आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय झोपेशी संबंधित समस्या देखील या सप्ताहात तुम्हाला त्रास देऊ शकतात.
उपाय: मंगळवारी देवी दुर्गेसाठी हवन/यज्ञ करा.
आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून इच्छेनुसार ऑनलाइन पूजा करा आणि मिळवा उत्तम परिणाम!
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 चे जातक या सप्ताहात स्वतःला विकसित करण्याच्या दिशेत काही सकारात्मक पाऊल उचलू शकतात. तुमची रुची संगीत आणि ट्रॅव्हलिंग मध्ये असेल. शेअर्स आणि ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याने उत्तम रिटर्न मिळू शकते. या काळात तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या भविष्याला उत्तम करण्यात असेल सोबतच, तुम्ही कठीणात कठीण निर्णय सहजरित्या घेण्यात सक्षम असाल.
प्रेम जीवन: या सप्ताहात जीवनसाथी सोबत तुमचे संबंध मधुर होतील. तुमच्या दोघांमध्ये उत्तम ताळमेळ दिसेल आणि दुसऱ्यांसाठी एक मिसाल कायम ठेवण्यात सक्षम असाल. याच्या व्यतिरिक्त, तुम्ही नात्याला मजबूत ठेवण्यासाठी पार्टनर सोबत मिळून उच्च मूल्यांची स्थापना करू शकतात.
शिक्षण: शिक्षणाची गोष्ट केली असता हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल राहील आणि या काळात तुमचे प्रदर्शन उत्तम राहील. अश्यात, तुम्ही उत्तम गुण मिळवण्यात यशस्वी असाल. जे लोक स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत आहे त्यांना परीक्षेत उत्तम गुण प्राप्त होऊ शकतात आणि जे लोक फायनांस, अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट इत्यादीचे शिक्षण घेत आहे त्यांना या क्षेत्रात साकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात नोकरदार जातक कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. तसेच, केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी बदल घडवू शकाल. या व्यतिरिक्त, तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना या काळात चांगला फायदा होईल. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देऊ शकाल.
आरोग्य: मूलांक 5 च्या जातकांना या सप्ताहात त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त, चिंताग्रस्त समस्या देखील असू शकतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीत समस्या दिसू शकतात.
उपाय: नियमित 41 वेळा “ॐ नमो नारायणाय” चा जप करा.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक या सप्ताहात धन लाभ कमावण्यात सक्षम असतील आणि सोबतच, ट्रॅव्हल संबंधित लोकांना ही चांगला लाभ होईल. या काळात तुम्ही पैश्याची बचत करण्यात सक्षम असाल सोबतच, तुम्ही बऱ्याच गोष्टींना शिक्षणात सक्षम असाल ज्यामुळे तुमचा विकास होईल तसेच, जे लोक संगीत शिकत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहणार आहे.
प्रेम जीवन: प्रेम संबंधाची गोष्ट केली असता या काळात तुम्ही आपले नाते मधुर बनवण्यात सक्षम असाल. तुम्हा दोघांमध्ये परस्पर समज चांगला राहील. या काळात तुम्ही आपल्या पार्टनर सोबत बऱ्याच ठिकाणी फिरायला ही जाऊ शकतात आणि ही तुमच्यासाठी खूप अविस्मरणीय वेळ राहील.
शिक्षण: जर तुम्ही कम्युनिकेशन इंजीनियरिंग, अकाउंटिंग किंवा सॉफ्टवेयरचे शिक्षण घेत आहेत तर, या सप्ताहात तुम्हाला अधिक उत्साहवर्धक परिणाम प्राप्त होतील. या काळात तुम्ही आपली विशेष ओळख बनवण्यात आणि साथी विद्यार्थ्यांमध्ये एक मिसाल कायम ठेवण्यात यश प्राप्त कराल सोबतच, तुमची एकाग्रता वाढेल. जे शिक्षणात नवीन कौशल्याचा विकास करण्यात मार्गदर्शन करेल.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुम्ही तुमच्या कामात थोडे व्यस्त असाल परंतु, तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर, हा कालावधी व्यवसाय विस्तारासाठी चांगला आहे. या काळात तुम्ही नवीन भागीदारी करू शकता आणि या संबंधात तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीकोनातून, या सप्ताहात मूलांक 6 च्या जातकांचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्हाला कोणत्या ही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. या काळात फक्त तुमचा आनंद तुम्हाला फिट ठेवेल.
उपाय: नियमित 33 वेळा “ॐ भार्गवाय नम:” चा जप करा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 चे जातक या सप्ताहात असुरक्षा भावनेने घेरलेले राहू शकतात आणि आपल्या विषयांना घेऊन चिंतीत होऊ शकतात. परस्पर समज कारणाने तुम्हाला स्थिरता मिळवणे थोडे कठीण वाटू शकते. या परिस्थितींपासून निघण्यात तुम्हाला अध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: या सप्ताहात कुटुंबात चालत आलेल्या समस्यांच्या कारणाने तुम्ही पार्टनर सोबत संबंधात आनंद घेऊ शकणार नाही यामुळे तुमच्या नात्यात आनंद राहणार नाही. या काळात तुम्हाला सल्ला दिला जातो की, या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा पार्टनर सोबत नात्यात गोडवा कायम ठेवण्यासाठी साथी सोबत ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: लॉ आणि फिलॉसफी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अधिक अनुकूल राहणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणात समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि याच्या परिणामस्वरूप, त्यांना उत्तम गुण मिळू शकतात. तथापि, या काळात तुम्ही आपल्यात असलेल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यात सक्षम असाल परंतु, तुम्ही वेळेच्या कमीच्या कारणाने याचा फायदा घेऊ शकणार नाही.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनात तुम्हाला या सप्ताहात सकारात्मक परिणामांची प्राप्ती होईल. या काळात तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या कामाची प्रशंसा मिळेल. तथापि, या काळात व्यावसायिक जातकांना नुकसान सहन करावे लागू शकते म्हणून, तुम्हाला तुमच्या व्यवसायावर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
स्वास्थ्य: आरोग्याच्या बाबतीत, या सप्ताहात तुम्हाला ऍलर्जीमुळे त्वचेची जळजळ आणि पचन समस्या येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या आहाराची काळजी घ्या आणि वेळेवर खा. तथापि, या काळात तुम्हाला कोणत्या ही मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
उपाय: नियमित 43 वेळा “ॐ केतवे नमः” चा जप करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा सप्ताह फारसा फलदायी नसण्याची शक्यता आहे. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. स्थानिक जातकांचा अध्यात्माकडे कल वाढण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात तुम्ही धार्मिक प्रवासाला ही जाऊ शकता. या काळात तुम्ही जास्त व्यस्त असाल आणि त्यामुळे तुमचा संयम कमी होऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रेम जीवन: कौटुंबिक कलहामुळे या सप्ताहात तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात काही दुरावा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या नात्यातला आनंद नाहीसा होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून, तुमच्यात संबंध चांगले व्हावेत.
शिक्षण: शिक्षणात यश मिळविण्यासाठी, या काळात तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल जेणेकरून, तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये बसू शकता ज्या तुम्हाला कठीण वाटू शकतात त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम करणे चांगले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, अशावेळी तुम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
व्यावसायिक जीवन: कामात समाधान न मिळाल्याने या सप्ताहात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी होऊ शकता आणि यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करणार्या जातकांना नफा कमावण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच, तुम्हाला या कालावधीत तुमच्या व्यवसायात किमान गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे अन्यथा, नुकसान होण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तणावामुळे पाय आणि सांधे दुखू शकतात. अशा परिस्थितीत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नियमित 44 वेळा “ॐ मंदाय नमः” चा जप करा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा सप्ताह सामान्य राहील. या काळात तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू मध्ये नवीन आणि उत्तम संधी प्राप्त होईल जसे, करिअर, धन, लाभ आणि नाते.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाची गोष्ट केली असता हा सप्ताह तुमच्यासाठी अधिक उत्तम राहणार आहे. तुमच्या साथी सोबत उत्तम ताळमेळ राहील आणि तुमचे नाते चांगले होतील. जर तुम्ही प्रेमात आहेत तर, तुम्ही आपल्या प्रेमी सोबत आनंदाचा अनुभव कराल. तसेच, जर तुम्ही विवाहित आहेत तर, तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या नात्यात अधिक मजबुती येईल.
शिक्षण: हा आठवडा तुमच्यासाठी अभ्यासाच्या क्षेत्रात खूप चांगला जाईल आणि तुम्ही चांगले गुण मिळवू शकाल. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि केमिस्ट्री सारख्या विषयात तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. या क्षेत्रांमध्ये तुम्ही स्वत:साठी खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 9 च्या जातकांसाठी या सप्ताहात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर, या सप्ताहात तुम्हाला उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी ही हा सप्ताह चांगला जाणार आहे. या दरम्यान, तुम्हाला नवीन डीलमधून फायदा होण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य अनुकूल राहील आणि यामुळे तुमच्यात सकारात्मकता राहील. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ध्यानाचा सराव करू शकता.
उपाय: नियमित 27 वेळा “ॐ भूमि पुत्राय नम:” चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025