देव उठनी एकादशी
म्हणतात ना, जेव्हा शुभ दिवस येतात तेव्हा आपोआप शगुन दिसायला लागते, पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो आणि दिशा स्वयं आनंदी होते. अश्याच शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे देवउठनी एकादशी. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला लोक देवउठनी एकादशीच्या नावाने जाणतात. मान्यता आहे की, क्षीर सागरात चार महिन्याच्या योग निद्रे नंतर भगवान विष्णू या दिवशी उठतात.
याच्या आधी भगवान विष्णू आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात विश्राम करण्यासाठी जातात. भगवान विष्णू च्या शयनाला देवशयनी एकादशी म्हणतात. प्रभू या चार महिन्यात निद्रा करतात म्हणून, या चार महिन्याला चातुर्मास ही म्हटले जाते.
कुठला ही निर्णय घेण्यात येत आहे समस्या, तर आत्ताच करा आमच्या विद्वान ज्योतिषांना फोन!
देवउठनी एकादशी 2021: शुभ मुहूर्त
या वर्षी म्हणजे 2021 मध्ये देव उठनी एकादशी 14 नोव्हेंबर ला साजरी केली जाईल आणि यानंतर मंगल कार्यांचा आरंभ होईल.
देवउठनी एकादशी व्रत 14 नोव्हेंबर ला राहील आणि याला 15 नोव्हेंबर ला सकाळी श्री हरी चे पूजन करून समाप्त केले पाहिजे.
एकादशी तिथी आरंभ वेळ :-- 14 नोव्हेंबर सकाळी 05:48 वाजता
एकादशी तिथी समाप्त वेळ :- 15 नोव्हेंबर सकाळी 06:39 वाजता
एकादशी उपवासात पारणाचे आपले वेगळेच महत्व असते आणि म्हणून जर योग्य मुहुर्तात पारण केले तर, त्याचे फळ ही बरेच मिळतात.
पारण मुहूर्त:- 13:09:56 पासून 15:18:49 पर्यंत 15, नोव्हेंबर ला.
काळ :2 तास 8 मिनिटे
हरी वासर समाप्त होण्याची वेळ :13:02:41 ला 15, नोव्हेंबर ला.
नोट: वरती दिला गेलेला मुहूर्त दिल्ली साठी मान्य आहे. आपल्या शहराच्या अनुसार मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
चातुर्मास मध्ये वर्जित होतात हे शुभ कार्य
भगवान विष्णू जेव्हा निद्रा घेत असतात तेव्हा त्यावेळी काही ही मंगल कार्य जसे विवाह, मुंडन संस्कार, जनेऊ, गृह प्रवेश इत्यादी कार्य थांबवले जातात म्हणून, शुभ आणि मंगल कार्यासाठी भगवान विष्णूच्या उठण्याची वाट पाहतात आणि तत्पश्चात देवाच्या आशीर्वादाने शुभ कार्याची सुरवात केली जाते.
तसे तर, चार महिन्याचा काळ बराच असतो आणि आज वर्तमानात लोक म्हणू शकतात की, चार महिन्याचा इतका मोठा काळ का? तर, त्याचे लॉजिक समजावले जाऊ शकते जसे की, आपल्याकडे एक दिवसाची वेळ खूप कमी मानली जाऊ शकते तर काही जीव असे ही आहे जे पूर्ण एका दिवसात आपले पूर्ण जीवन जागून घेतात. तर काही जीव असे ही असते जे दहा वर्षाची आयु सीमा पूर्ण करतात. या प्रकारे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडे वेगवेगळा वेळ असतो.
ईश्वर तर अविनाशी आहे, अनंत आहे अश्यात, जर प्राचीन काळात भगवान विष्णूची झोपण्याची प्रथा आहे तर, त्यांची एक झोप म्हणजे त्यांच्यासाठी अशी असू शकते की, झोपताच चार महिने निघून जात असतील परंतु, आपल्यासाठी आपल्या जीवनाच्या हिशोबाने हा एक मोठा काळ असतो.
अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे आपल्या जीवनातील सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा
भगवान विष्णु ची निद्रा ने जोडलेली पौराणिक कथा
भगवान विष्णू च्या निद्रेसाठी एक जुनी कथा ही प्रचलित आहे की, एक वेळी एक राजा बली झाले जे आपल्या दान साठी खूप अहंकारी होते. त्यांचा अहंकार तोडण्यासाठी भगवान विष्णू वामन देवाच्या अवतारात प्रकट झाले आणि त्यांनी राजा बली द्वारे केलेल्या वचनाच्या अनुसार दोन पग मध्ये पूर्ण जगाला मोजले आणि मग तिसऱ्या पग मध्ये राजा बलीने श्री हरी विष्णू साठी आपल्या डोक्यावर चरण ठेवले आणि स्वतःला ही दान स्वरूप दिले.
यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांच्या द्वारे माघीतलेल्या वरदानाचा अनुसार पाताल लोक चालेले गेले. नंतर देवी लक्ष्मी ने राजा बली ला आपला भाऊ बनवले आणि त्यांना रक्षा सूत्र बांधून श्री हरी विष्णूला परत आपल्या सोबत घेऊन आली म्हणून, आज ही मान्यता आहे की, भगवान विष्णू विश्राम करण्यासाठी चार महिने पाताल लोक मध्ये जातात यामुळे मंगल कार्य थांबून जातात.
भगवान विष्णु ची पूजा: ज्योतिषीय महत्व
आता आपण जर याला ज्योतिष अनुसार पाहिले तर, भगवान विष्णूची आराधना करून आपण गुरु ग्रहाला चांगले बनवण्यासाठी आग्रह करतो म्हणजे जेव्हा जन्म कुंडली मध्ये गुरु चे फळ चांगले मिळत नसेल तर, श्री हरी विष्णू ची आराधना केली जाते आणि गुरु ग्रह किंवा बृहस्पती ग्रहाला पाहूनच सर्व मंगल कार्य संपन्न केले जातात. अश्यात, जर स्वतः श्री हरी विष्णू विश्राम अवस्थेत असेल तर मंगल कार्य कसे केले जाऊ शकते.
या प्रकारे पौराणिक कथा असो किंवा वैज्ञानिक आधाराने सर्व एकमेकांनी जोडलेल्या आहेत.
करिअर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
तुलसी विवाहाने जोडलेले महत्वाचे नियम
देवउठनी एकादशी च्या दिवशी तुलसी विवाहाचे विशेष महत्व सांगितले गेले आहे. तुलसी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी च्या दिवशी केले जाते. तुलसी विवाहाच्या माध्यमाने या दिवशी संपूर्ण लाभ घेण्यासाठी चला जाणून घेऊया तुलसी विवाहाने जोडलेले महत्वाचे नियम, शुभ मुहूर्त आणि सावधानता.
तुलसी विवाह 2021: शुभ मुहूर्त
तुलसी विवाह तिथी - सोमवार, 15 नोव्हेंबर 2021
द्वादशी तिथी प्रारंभ - 06:39 वाजता (15 नोव्हेंबर 2021) पासून
द्वादशी तिथी समाप्त - 08:01 वाजता (16 नोव्हेंबर 2021) पर्यंत
तुलसी विवाह मुहूर्त
15 नोव्हेंबर 2021: दुपारी 1:02 वाजेपासून दुपारी 2:44 वाजेपर्यंत
15 नोव्हेंबर 2021: संध्याकाळी 5:17 वाजेपासून - 5:41 वाजेपर्यंत
- ज्या ही ठिकाणी तुम्ही तुलसी विवाह करत आहे तिथे तुळशी ठेवण्याच्या आधी त्या ठिकाणाला चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.
- पूजेच्या ठिकाणी आणि तुळशीच्या कुंडीला गेरू लावा.
- तुळशी विवाहासाठी मंडप तयार करण्यासाठी ऊसाचा वापर करा.
- पूजा प्रारंभ करण्याच्या आधी स्नान नक्की करा, स्वच्छ कपडे घाला आणि तुळशी विवाहासाठी आसन टाका.
- या नंतर तुळशीवर ओढणी आणि शृंगाराचे साहित्य जसे, बांगड्या, टिकली, मेहेंदी इत्यादी देवी तुळशीला अर्पण करा.
- मंडपात तुळशीला ठेवल्यानंतर उजव्या बाजूला एक स्वच्छ चौरंगावर शालिग्राम ठेवा.
- या नंतर भगवान शालिग्रामवर हल्दी दूध मिळवून चढवा.
- शालिग्रामचे तिलक करण्याच्या वेळी तीळ चा वापर करा.
- या नंतर, या पूजेत ऊस, बोर, आवळा, सफरचंद इत्यादी फळ चढवा.
- तुलसी विवाह वेळी मंगलाष्टक नक्की वाचा.
- या नंतर कुणी घरातील पुरुष भगवान शालिग्राम ला उचलून तुलसी माताची सात वेळा परिक्रमा करा.
- या नंतर तुलसी विवाह संपन्न होतो आणि विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटा.
देवउठनी एकादशी योग आणि विवाह मुहूर्त
या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यात तीन एकादशी तिथीचे शुभ संयोग बनत आहे. ज्योतिषाचे जाणकार मानतात की, हा शुभ संयोग 25-30 वर्षात एखादी वेळाच येतो. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 01 नोव्हेंबर ला रमा एकादशी होती. या नंतर आता 14 ला देवउठनी एकादशी असेल आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 नोव्हेंबर ला उत्पन्ना एकादशी पडेल.
विवाह मुहूर्त 2021:
नोव्हेंबर महिन्याचा विवाह मुहूर्त: 20, 21, 28, 29, 30
डिसेंबर महिन्याचा विवाह मुहूर्त: 1, 7, 11, 13
अधिक माहिती: 15 डिसेंबर पासून 14 जानेवारी पर्यंत धनुर्मास असल्याने विवाह आणि मंगल कार्य वर्जित राहतील.
देवउठनी एकादशी उपाय जे देतील श्री हरी ची विशेष कृपा
तुम्ही प्रियजन ही देवउठनी एकादशी च्या दिवशी काही असे उपाय करू शकतात ज्यामुळे तुमच्या ग्रहांना मजबुती मिळेल जसे:-
या दिवशी तुलसी विवाह ही असतो म्हणून, तुलसी ची पूजा करून आपण भगवान विष्णू ला सरळतः जोडले जाऊ शकतात तर, तुम्ही विधी विधानाने या दिवशी तुलसी विवाह संपन्न करा आणि श्री हरि विष्णु चा आशीर्वाद घ्या.
- तुलसी च्या चार ही बाजूंनी रांगोळी काढा आणि नंतर दिवा लावून तुलसी मंत्र किंवा विष्णू भगवानाच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप ही 108 वेळा करतात तर तुमच्या सर्व कष्टांना श्री हरि स्वतः तारतील.
- या दिवशी जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करतात तर, तुम्हाला आरोग्य लाभ मिळेल आणि धन प्राप्ती ची इच्छा असेल तर, भगवान विष्णूला दुधात केशर टाकून त्याने देवाला अंघोळ घाला. यामुळे तुमच्या घरात धनाचे आगमन व्हायला लागेल.
- या दिवशी गाईच्या सेवेने भगवंताला अति प्रसन्नता मिळते म्हणून, जर या दिवशी गाईची सेवा केली तर, गाईला आपल्या हातांनी खाऊ घातले तर, प्रत्येक प्रकाराने भगवंताची कृपा होईल आणि विशेषकरून ज्यांचा विवाह अडचणीत आहे त्यांनी जर असे केले तर, निश्चितच त्यांचा विवाह लवकर संपन्न होईल.
- संतान न होणे किंवा संतान उशिराने होणे एक मोठी समस्या आहे म्हणून, या दिवशी जो ही व्यक्ती नारायण समोर तुपाचा दिवा लावून संतान गोपालाचे 108 वेळा पाठ करेल त्याला लवकरच संतान प्राप्ती होईल.
- एकादशी च्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळे फळ व पिवळे अन्न आधी भगवान विष्णूला अर्पण करा या नंतर, सर्व वस्तू गरिबांना आणि गरजू लोकांना दान करा असे केल्याने भगवान विष्णू ची कृपा तुमच्यावर कायम राहील.
- या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे ही विशेष महत्व आहे. जर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावला आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घातले तर, कर्जापासून लवकर मुक्ती मिळेल.
- एकादशीच्या दिवशी सात कन्यांना घरी बोलावून भोजन द्या. भोजनात खीर असणे गरजेचे आहे. यामुळे काही ही वेळात तुमच्या मनातील मनोकामना नक्की पूर्ण होईल.
- अविवाहित कन्या लगेचच विवाहासाठी किंवा मनासारख्या पती साठी देवी तुलसीला शृंगाराचे सामान भेट करू शकते.
आपल्या सर्वांना देव उठनी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आचार्य मनीष पांडे सोबत सरळ संपर्क करण्यासाठी /फोन किंवा चॅट माध्यमाने जोडण्यासाठी येथे क्लिक करा
रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025